17
येशूचे रूपांतर
1
एका आठवड्यानंतर येशूने, पेत्र, याकोब, आणि याकोबाचा लहान भाऊ योहान यांना घेतले, आणि त्यांना एका उंच डोंगरावर जेथे ते इतर लोकांपासून दूर होते तो तेथे घेऊन गेला.
2
ते तेथे असता, येशूचे रूप पालटतांना त्या तीन शिष्यांनी पाहिले, त्याचे मुख सुर्यासारखे तेजस्वी झाले होते, आणि त्याची वस्त्रे चमकत होती आणि प्रकाशासारखी उज्वल झाली होती.
3
तेव्हा अचानक मोशे आणि एलीया, जे फार वर्षापूर्वी महत्वपूर्ण संदेष्टे होते, ते दिसू लागले आणि त्याच्याशी बोलू लागले.
4
पेत्राने त्यांना पाहिले व येशूला म्हणाला, “प्रभू, आपण येथे असणे हे आम्हांसाठी उत्कृष्ठ आहे! तुमची इच्छा असेल, तर मी येथे तीन धार्मिक स्थळांचे मंडप तयार करतो, एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी, आणि एक एलीयासाठी.”
5
पेत्र हे बोलत असतांना, एक तेजस्वी ढग त्यांच्यावर आले. त्यांनी देवाला येशूबद्दल ढगातून बोलतांना ऐकले. तो त्यांना म्हणाला, “हा माझा पुत्र आहे, मी त्याच्यावर प्रेम करितो. तो मला फार संतुष्ट करतो. त्यामुळे तुम्ही त्याचे ऐकलेच पाहिजे!”
6
त्या तीन शिष्यांनी देवाला बोलतांना ऐकले, तेव्हा ते फार घाबरले. परिणामी, ते आपल्या मुखावर जमिनीवर पालथे पडले.
7
परंतु येशू त्यांच्याकडे गेला आणि त्यांना त्याने स्पर्श केला आणि त्यांना म्हणाला, “उभे राहा! आता अजिबात भिऊ नका!”
8
आणि त्यांनी वर पाहिले, तेव्हा येशू हा केवळ एकटाच असून तो तेथे अजनूही उभा आहे असे त्यांनी पाहिले.
9
ते डोंगराहून खाली उतरत असतांना, येशू त्यांना सुचना देत होता की, “मनुष्याचा पुत्र, मेल्यानंतरही देव त्याला पुन्हा उठवेल तोपर्यंत पर्वतावरच्या माथ्यावर पाहिलेले कोणास ही सांगू नका.”
10
त्या तीन शिष्यांनी येशूला विचारले, “तू जे बोलतोस ते खरे आहे, तर मसीहा येण्याअगोदर एलीयाने त्यापूर्वी परत येणे गरजेचे आहे असे यहूदी नियम शिकवणारे पुरुष का म्हणतात?”
11
येशूने त्यांना उत्तर दिले, “मसीहाच्या येण्यासाठी एलीया अनेक लोकांना तयार करेल हे देवाने दिलेले अभिवचन सत्य आहे.
12
परंतु हे लक्षात घ्या: एलीया हा आधीच आला आहे आणि आमच्या पुढाऱ्यांनी त्याला पाहिले देखील आहे, परंतु मशीहाच्या आधी येणाऱ्या त्या एकाला ते ओळखू शकले नाही. त्याऐवजी, त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला वाईट वागणूक दिली आणि तेच पुढारी लवकरच जो स्वर्गातून येतो, त्याप्रमाणेच तशीच वागणूक ते लवकरच मलाही देतील.”
13
तो एलीया विषयी बोलत होता तेव्हा तो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला संबोधित होता हे त्या तीन शिष्यांना समजले.
भूतग्रस्त मुलगा
14
येशू आणि ते तीन शिष्य जमलेल्या लोक समुदायाच्या आणि शिष्यांच्या विसावा घेण्याच्या ठिकाणी परत आले तेव्हा, एक मनुष्य येशू जवळ आला आणि त्याच्या समोर येऊन गुडघ्यावर बसला.
15
तो त्याला म्हणाला, “गुरूजी, माझ्या पुत्रावर दया करा आणि त्याला बरे करा! त्याला अपस्माराचा आजार आहे आणि तो फार यातना भोगत आहे. आणि या आजारामुळे, तो अनेक वेळा आग्निमध्ये आणि पाण्यामध्ये पडला आहे.
16
मी त्याला तुमच्या शिष्यांकडे आणले होते जेणेकरून कदाचित ते त्याला बरे करतील, परंतु ते त्याला बरे करण्यास असमर्थ राहिले.”
17
येशूने उत्तर दिले, “तुम्ही या वेळेचे लोक देवाच्या सामर्थ्यात पूर्णपणे विश्वास करत नाहीत. किती गोंधळलेले तुम्ही आहात! जे मी करतो ते करण्यास तुम्ही कधी सक्षम व्हाल, मी कोठवर तुमच्या सोबत राहू! मुलाला माझ्या जवळ येथे घेऊन या!”
18
त्या मुलाला त्यांनी येशूकडे घेऊन आले तेव्हा, ज्या भूतामुळे त्याला अपस्माराचा आजार झाला होता त्याला येशूने दटावले. परिणामी, त्या मुलामधून ते भूत बाहेर निघून गेले, आणि त्याच क्षणापासून तो मुलगा बरा झाला.
19
नंतर, काही शिष्यांनी येशू त्यांच्या शेजारी एकटाच होता तेव्हा त्याच्याजवळ ते आले आणि त्याला विचारले, “आम्हांला त्या भूताला बाहेर काढता का आले नाही?”
20-21
त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाच्या सामर्थ्यामध्ये तुम्ही अधिक विश्वास ठेविला नाही त्यामुळे ते गेले नाही. यावर विचार करा: मोहरीचे दाणे फार लहान असतात, परंतु ते वाढतात आणि मोठ्या वनस्पतीची निर्मिती करतात. त्याच प्रकारे, तुम्ही देखील थोडासा विश्वास ठेविला तर जे काही तुम्ही देवाने करावे म्हणून विनंती करता तो ते करेल, आणि तुम्ही काहीही करण्यास समर्थ व्हाल! तुम्ही या डोंगराला देखील असे म्हणू शकता की, ‘येथून तेथे सरक!’ आणि तुम्ही जेथे त्याला जायला सांगाल तेथे ते जाईल.
आपल्या मृत्युबद्दल येशूने दुसऱ्यांदा केलेले भविष्य
22
गालील जिल्ह्यात सर्व शिष्य एकत्रित राहत होते तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राला, कोणी एक, मला धरून अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करेल.
23
ते माझा वध करतील, परंतु माझा वध झाल्यानंतर देव मला पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत करेल.” शिष्यांनी हे बोलणे ऐकले, तेव्हा ते फार दु:खी झाले.
परमेश्वराच्या मंदिराचा कर
24
कफर्णहूम शहरात येशू आणि त्याचे शिष्य आले, तेव्हा मंदिराचा कर गोळा करणारा मनुष्य पेत्राजवळ आला व त्याला म्हणाला, “तुमचा गुरु मंदिराचा कर देत नाही का?”
25
त्याने त्यांना उत्तर दिले, “होय, तो देतो.” मग ते येशूच्या घरात आले, तेव्हा पेत्र आपले बोलणे सुरू करण्याअगोदर येशू त्याला म्हणाला, “शिमोना, तुला काय वाटते अधिकारी कोणाकडून महसूल किंवा कर घेतात? आपल्या देशातील त्यांच्या नागरिकांकडून, किंवा त्यांनी काबीज केलेल्या देशातील नागरिकांकडून ते गोळा करतात?”
26
पेत्राने त्याला उत्तर दिले, “इतर देशांच्या नागरिकांकडून.” तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तर मग आपल्या देशातील त्यांच्या नागरिकांना कर देण्याची काही गरज नाही.
27
तर मग पुढे जा आणि कर भरून टाक जेणेकरून मंदिराचे कर गोळा करणारे आपल्याबद्दल क्रोधीत होणार नाहीत. कर भरण्यासाठी पैसे मिळावे, यासाठी गालील समुद्राकडे जा, तुझी मासे पकडण्याची काठी आणि गळ घे, आणि जो पहिला मासा तू पकडशील त्या माशाला घे, त्याचे तोंड तू उघडशील, तेव्हा तुला एक चांदीचे नाणे सापडेल त्याची किंमत तुझा आणि माझा कर भरणे होईल इतकी पुरी आहे. त्या नाण्याला घे आणि मंदिराचा कर गोळा करणाऱ्यांना तो देऊन टाक.”