16
चिन्हासाठी विनंती व येशूचा नकार

1 काही परूशी आणि सदूकी येशूकडे आले आणि ते त्याला म्हणाले, “देवाने खरोखर तुला आम्हांसाठी पाठवले आहे! ह्याची खात्री आम्हांला पटावी म्हणून तू त्याच्या सामर्थ्याने एखादा चमत्कार करून आम्हांस दाखव!” 2 त्याने त्यांना उत्तर दिले, “आमच्या देशामध्ये, संध्याकाळी आभाळ लाल असेल, तर आम्ही म्हणतो की, “उद्याचे हवामान चांगले राहील.’

3 परंतु सकाळी आभाळ लाल असेल तर आम्ही म्हणतो की, ‘आजचे हवामान वादळी असेल’. आभाळाकडे पाहून, हवामान कसे असेल असे तुम्ही सांगू शकता, परंतु तुमच्या अवतीभोवती आता ज्या सर्व गोष्टी घडतांना तुम्ही पाहता, तेव्हा देव काय करत आहे हे तुम्हांला समजत नाही. 4 मी केलेले चमत्कार तुम्ही दुष्ट लोकांनी पाहिले, पण तरीही तुम्ही विश्वासूपणाने देवाची उपासना केली नाही. म्हणून योना संदेष्टा जो एका मोठ्या माशाच्या आत तीन दिवस राहिला आणि परत बाहेर आला ह्या घडलेल्या चमत्कारा व्यतिरिक्त कुठलाही चमत्कार, मी तुमच्यासाठी करणार नाही.” मग येशूने त्यांना सोडले, आणि तेथून आपल्या शिष्यांसोबत दूर निघून गेला.
असमंजसपणाबद्दल शिष्यांचा निषेध

5 ते सर्व गालील समुद्राच्या दुसऱ्या बाजूस गेले. तेव्हा आपल्यासोबत खाण्यासाठी काहीही घेतले नाही आपण ते विसरलो आहोत हे शिष्यांच्या लक्षात आले. 6 त्या वेळी, येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी जे खमिर तुम्हांला देऊ इच्छितात त्याविषयी सावध राहा ते घेऊ नका.” 7 येशूने त्यांना जे सांगितले त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न ते करू लागले, आणि ते एकमेकांस म्हणू लागले की, “आपण खाण्यासाठी सोबत काहीच घेतले नाही म्हणून नक्कीच हा असा बोलला आहे!” 8 परंतु ते काय म्हणत आहेत हे येशूला माहित होते म्हणून त्यांने उत्तर दिले, “तुम्ही खाण्यासाठी भाकरी घेण्यास विसरला ह्या कारणांसाठी मी तुम्हांला परूशी आणि सदूकी यांच्या खमिराविषयी सांगितले असा विचार तुम्ही करत आहात आणि त्यामुळे मी फार निराश झालो आहे. मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो पण तुम्ही तर केवळ थोडाच विश्वास धरिता.

9 अन्न नाही म्हणून मी चिंतीत आहे असा विचार करू नका. तर पाच हजारांना पाच भाकरीने मी कसे जेवू घातले, किंवा किती अन्नाच्या भरलेल्या टोपल्या तुम्ही गोळा केल्या हे तुम्ही खरोखर विसरला आहात काय? 10 अथवा सात लहान भाकरी मी वाढवल्या तेव्हा चार हजार लोक जेवले नाहीत काय? आणि त्यानंतर किती तुकड्यांच्या टोपल्यां तुम्ही गोळा केल्या त्याबद्दल काय?

11 खरोखर मी भाकरीविषयी बोलत नव्हतो हे तुम्हांला समजायला पाहिजे होते. तर परूशी व सदूकी जे खमिर तुम्हांला देऊ इच्छितात त्याविषयी सावध राहा ते घेऊ नका.” 12 तेव्हा येशू भाकरीमध्ये असलेल्या खमिंराबद्दल बोलत नव्हता तर त्याऐवजी, तो परूशी व सदूकी यांच्या शिकवणुकीबद्दल बोलत होता हे शिष्यांच्या लक्षात आले.
येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली

13 येशू व त्याच्या शिष्यांनी कैसरिया फिलिप्पै शहराजवळील प्रदेशात प्रवेश केला तेव्हा, त्याने त्यांना विचारले, “मी जो मनुष्याचा पुत्राला, म्हणजे मला, लोक खरोखर कोण म्हणून म्हणतात?” 14 त्यांनी उत्तर दिले, “तुम्ही बाप्तिस्मा करणारे योहान आहात, जो जिवंत होऊन पुन्हा परत आला आहे असे काही लोक म्हणतात. इतर लोक म्हणतात की तुम्ही एलीया संदेष्टा आहात, जो देवाच्या अभिवचनाप्रमाणे स्वर्गातून परत आला आहे. आणखी काही म्हणतात की तुम्ही यिर्मया संदेष्टा आहात किंवा फार पूर्वी जे संदेष्टे जगत होते त्यांच्यापैकी एक, जो जिवंत होऊन पुन्हा परत आला आहे.” 15 मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? मी कोण आहे याबद्दल तुम्ही काय म्हणता?” 16 शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “तुम्ही ख्रिस्त आहात! तुम्ही सर्वसमर्थ देवाचे पुत्र आहात.”

17 तेव्हा येशूने त्याला म्हटले, योनाच्या मुला, शिमोना देव तुझ्यासोबत संतुष्ट आहे. आताच जे तू बोललास--कोणत्याही मनुष्याने हे तुला प्रकट केले नाही. त्याऐवजी, माझ्या स्वर्गात राहणाऱ्या पित्याने हे तुला प्रकट केले आहे. 18 आणखी मी तुला हे देखील सांगतो: तू पेत्र आहेस, ज्याचा अर्थ ‘खडक’ असा होतो. एक मोठा खडक एका मोठ्या इमारतीसाठी आधार असतो तसा माझ्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्या समूहांचा आधार तू होशील. आणि मृत्यु देखील त्याला नष्ट करण्यास समर्थ नसेल.”

19 मग तो म्हणाला, “देव ज्याच्यांवर राज्य करणार आहे त्या लोकांप्रती मार्ग उघडण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी मी तुला सक्षम करेन. पृथ्वीवर जी काही परवानगी तू देशील, देव स्वर्गात त्याला परवानगी देईल. पृथ्वीवर जे काही तू प्रतिबंधित करशील, देव स्वर्गात त्याला प्रतिबंधित करेल.” 20 मग येशूने शिष्यांना तो ख्रिस्त आहे हे त्यांनी यावेळी कोणालाही सांगू नये अशी सक्तीने ताकीद दिली.
स्वतःचे मरण व पुनरुत्थान याविषयीचे येशूचे भविष्य

21 त्या वेळेपासून येशूने शिष्यांना शिकवण्यास सुरूवात केली की, यरुशलेम शहरात जाणे हे त्याला गरजेचे आहे. कारण तेथे सत्ताधारी वडील, मुख्य याजक, आणि यहूदी नियम शिकवणारे पुरूष याच्यांकडून येशूला दुःख सोसावे लागेल आणि मरावे लागेल. मग त्या नंतर तिसऱ्या दिवशी, तो पुन्हा जिवंत होईल. 22 पण पेत्र त्याला एका बाजूला घेऊन गेला आणि त्याच्या ह्या बोलण्याचा निषेध करू लागला. तो म्हणाला, “प्रभूजी, देवाने आपल्यासोबत तसे घडून येण्याची परवानगी कधीच न देवो!” 23 तेव्हा येशू वळला व पेत्राला पाहू लागला, आणि त्याला म्हणाला, “माझ्या बाजुपासून दूर हो, कारण सैतान तुझ्याद्वारे बोलत आहे. मी पाप करावे म्हणून तू प्रयत्न करत आहेस. देव जो विचार करतो तसा तू विचार करत नाहीस, परंतु तू तर केवळ लोकांसारखे विचार करतोस!”
आत्मत्यागाचे आमंत्रण

24 तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जर कोणी तुमच्यापैकी माझा शिष्य होऊ पाहतो, तर ज्या गोष्टी तो करू इच्छित नाही त्यांनी त्या आवश्य कराव्या. हे अशासारखे आहे जो कोणी त्याचा वधस्तंभ उचलतो आणि त्याच्या मरणाच्या ठिकाणापर्यंत घेऊन चालतो. हे जे काही जो करतो तो माझा शिष्य होतो हा याचा अर्थ होतो. 25 इतर जे माझ्या अनुयायांवर हल्ला करतात तेव्हा जो कोणी त्याचा जीव वाचवू पाहतो- तो त्याला गमावील. परंतु जो कोणी माझ्यासाठी मरण्याची इच्छा धरेल तो सर्वकाळासाठी जगेल. 26 लोकांना या जगात जे काही पाहिजे असते ते सर्वकाही ते कदाचित मिळवू शकतील, परंतु ते माझे शिष्य झाले नाहीत तर, खरोखरच ते काहीच मिळवत नाहीत कारण त्यांना अनंतकाळचे जीवन मिळणार नाही. एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या मोबदल्यात देव काही स्वीकार करेल असे काही नाही.

27 लक्षपूर्वक ऐका. मी, मनुष्याचा पुत्र, ही पृथ्वी सोडून जाईन, पण मी परत येईन, आणि स्वर्गातील देवदूत माझ्याबरोबर येतील. त्या वेळी जसा माझ्या पित्याकडे गौरवी प्रकाश आहे तसाच माझ्यात ही असेल, आणि प्रत्येकजण जे या जगात जिवंत होते तेव्हा त्यांनी केलेल्या कामाप्रमाणे मी प्रतिफळ देईन. 28 लक्षपूर्वक ऐका! तुमच्यातील काहीजण जे आता येथे असे आहेत की ते स्वर्गातून येणाऱ्या त्या एकाला, मी राजा म्हणून परत येईन तेव्हा तुम्ही मला पाहाल, तुमच्या मरण्यापूर्वी हे तुम्हांला दिसेल!”