18
नम्रतेविषयी धडा

1 अगदी त्याच वेळेस शिष्य येशूकडे आले आणि त्याला विचारु लागले, “देव तुम्हांला राजा बनवेल तेव्हा आमच्यांपैकी सर्वात महत्त्वाचा कोण असेल?” 2 तेव्हा एका बालकाला येशूने आपल्याजवळ बोलावले आणि त्याने त्या बालकाला त्यांच्या मधोमध उभे केले. 3 तो म्हणाला, “मी तुम्हांला सत्य सांगतो: तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीला जर तुम्ही बदलणार नाहीत आणि ह्या लहान बालकासारखे नम्र होणार नाहीत. तर नक्कीच देव तुमच्यावर राज्य करण्यास सहमत होणार नाही.

4 ह्यास्तव ह्या बालकासारखे जे लोक स्वतःला नम्र करतील त्यांच्यावर मी राज्य करेन, तेव्हा त्या सर्वांपैकी ते महत्वाचे असतील. 5 आणि, त्यांचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून लोक यासारख्या एखाद्या बालकाचे स्वागत करतील तेव्हा ते माझेच स्वागत करत आहेत असा विचार देव करेल.”
दुसऱ्यांस अडखळविणाऱ्यांना इशारा

6 माझ्यामध्ये जो कोणी विश्वास ठेवतो आणि तू जर त्याला पाप करण्यास कारणीभूत होत असशील, अगदी जरी ह्या लहान बालकाप्रमाणे लोक त्याला कमी लेखत असले तरी, देव तुला नक्कीच शिक्षा करेल. एखाद्याला त्याच्या गळ्यात एक वजनदार दगड बांधून समुद्राच्या खोल पाण्यात त्याला फेकून दिले त्यापेक्षाही वाईट शिक्षा देव तुला देईल!

7 माझ्यामध्ये विश्वास ठेवण्यास इतरांना जे थांबवतील त्याच्यांसाठी हे किती भयंकर होईल. माझ्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांना थांबवणारे तेथे आवश्य असतीलच, पंरतु जे असे करतील त्या सर्वांसाठी हे किती भयंकर होईल. 8 म्हणून तुझा एखादा हात किंवा पाय देखील पाप करण्याची इच्छा धरीत असेल, तर त्या हाताला किंवा पायाला वापरणे बंद कर! पाप करणे टाळण्यासाठी तुला त्याला कापून टाकावा जरी लागत असेल तर ते देखील कर! समजा दोन्ही हात आणि दोन्ही पाय आहे आणि तरीही देवाने नरकाच्या सर्वकाळच्या अग्नीत तुम्हाला टाकले तर त्यापेक्षा तुम्ही एक हात किंवा एक पाय असला आणि तरी सुद्धा देवासोबत राहत आहात; ते तुमच्यासाठी आधिक बरे होईल.

9 होय, आणि तुमचे डोळे जे पाहतात आणि त्यामुळे पापात पडत असाल, तर त्या गोष्टीकडे पाहण्याचे थांबवा! पाप करण्यापासून दूर ठेवण्यासाठी तुम्हांला एखादा डोळा छिद्र पाडण्याच्या हत्याराने उपटून काढावा लागला तरी, ते करा! समजा दोन्ही डोळे आहे आणि तरीही देवाने नरकाच्या सर्वकाळच्या अग्नीत तुम्हाला टाकले तर त्यापेक्षा तुम्ही एक डोळा असला आणि तरी सुद्धा तुम्ही देवासोबत सर्वकाळासाठी राहत आहात; ते तुमच्यासाठी आधिक बरे होईल.”

10 “यातील एखाद्या मुलाला देखील कमी लेखू नका ह्याची खात्री बाळगा. कारण मी तुम्हांला खरोखर सांगतो की, जर तुम्ही मुलांशी वाईट वागलात तर जे देवदूत त्यांचे रक्षण करतात ते नेहमी माझ्या पित्याकडे जातात व त्याला ती माहिती कळवतात.
भटकलेल्या मेंढराचा दृष्टांत

12 तुम्ही ह्या परिस्थितीत काय केले असते तुम्हांला काय वाटते? जर तुमच्या जवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंढरू हरवले, तर तुम्ही नक्कीच नव्याण्णव मेंढरे टेकडीवर सोडून द्याल आणि त्या हरवलेल्या एका मेंढराला शोधायला जानार की नाही? 13 आणि जर तुम्हांला ते सापडले, मी तुम्हांला खात्री देतो की, तुम्ही खूप आनंदित व्हाल. नव्याण्णव मेंढरे हरवले नाहीत म्हणून तुम्ही आंनदी व्हाल. पंरतु ते हरवलेले मेंढरू तुम्हांला सापडले म्हणून त्या एकासाठी तुम्हांला जास्त आनंद होईल. 14 मेंढपाळाला आपले एखादे मेंढरू हरवून दूर जावे अशी इच्छा तो करत नाही म्हणून तशाच प्रकारे देव, आमचा स्वर्गातील पिता, त्याच्या ह्या मुलांपैकी एखाद्याने देखील नरकात जावे अशी इच्छा तो करत नाही.”
अपराध करणाऱ्या बरोबर कसे वागावे

15 “तुझ्या विश्वासणाऱ्या एका सोबतीने जर तुझ्याविरूद्ध अपराध केला, तर तुम्ही त्याच्यासोबत एकटे असतांना जा आणि तुझ्याविरूद्ध त्याने पाप केले आहे म्हणून त्याला समज दे, तुझ्याविरूद्ध त्याने पाप केले आहे हे जर त्याने तुझे ऐकले व त्याबद्दल त्याने तुला क्षमा मागीतली, तर तुम्ही आणि तो पुन्हा एकदा चांगले बंधू व्हाल. 16 तथापि, त्या व्यक्तीने जर तुझे ऐकले नाही, तर एक किंवा दोन इतर विश्वासणाऱ्यांना मिळवण्यासाठी जा अशासाठी की, नियमशास्त्र असे सांगते, ‘प्रत्येक आरोपाची पुष्टी करण्यासाठी दोन किंवा तीन साक्षीदार असणे आवश्यक आहे.’ म्हणून ते तुझ्यासोबत येतील आणि साक्ष देतील. 17 आणि जर तुझ्याविरूद्ध अपराध केला आहे त्याने त्यांचेही ऐकले नाही तर संपूर्ण प्रकरण मंडळीला सांग जेणेकरून ते त्याला ठीक करतील. आणि जर तो व्यक्ती मंडळीचेही ऐकणार नाही, तर मूर्तींपूजक आणि जकातदारांना त्यांच्या पापांविषयी आशेला जागा नाही असे म्हणून तुम्ही त्यांना वगळता, तसेच तुमच्यामधून त्याला वेगळे करा.

18 हे तुमच्या लक्षात असू द्या: मंडळीतील एका सदस्याला शिक्षा द्यायची किंवा शिक्षा नाही द्यायची असा जो काही निर्णय पृथ्वीवर तुम्ही निश्चीत कराल तोच निर्णय देव स्वर्गातही निश्चित करेल.
सामुदायिक प्रार्थना

19 आणखी हे देखील तुमच्या लक्षात असू द्या: पृथ्वीवर राहणांऱ्या किमान दोघांनी एकमेकांशी सहमत होऊन देवाला जे काही त्यांनी मागीतले तर माझा स्वर्गात असणारा पिता ज्याबद्दल तुम्ही मागीतले ते तुम्हांला देईल. 20 आणि हे सत्य आहे, कारण जिथे कुठे किमान दोन किंवा तीन माझ्यावर विश्वास धरून तुम्ही एकत्रित येता तर तिथे मी तुमच्याबरोबर आहे.”
कृतघ्न चाकराचा दृष्टांत

21 नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याला म्हणाला, “जो माझ्याविरुद्ध पाप करत राहतो असा त्या माझ्या विश्वासू सोबतीला मी किती वेळा क्षमा करणे आवश्यक आहे? जर तो मला क्षमा करण्यास सांगत असेल तर मी त्याला हव्या तितक्यांदा म्हणजेच सात वेळा क्षमा करणे आवश्यक आहे काय?” 22 येशूने त्याला म्हटले, “मी तुला सांगतो की, तुम्ही एखाद्याला क्षमा केवळ सात गणती वेळे पर्यंतच करावी असे आवश्यक नाही तर उलट तुम्ही त्याला साताच्या सत्तरवेळा क्षमा करणे आवश्यक आहे--क्षमा करण्याला कुठलीही वेळेची संख्या नाही.

23 हे आम्ही का करावे याचे स्पष्टीकरण करण्यासाठी, मी तुम्हांला एक बोधकथा सांगतो. त्यात देव एका राजासारखा आहे आणि त्याचे अधिकारी आहेत. त्या राजाने आपल्या काही सेवकांना सांगितले की, जे काही पैसे आधिकाऱ्यांना त्याने दिले होते ते त्याला हवे होते. 24 त्याच्याबरोबर आपल्या खात्याचा हिशोब करावा म्हणून ते अधिकारी राजाजवळ आले. त्यांच्यापैकी एका अधिकाऱ्याकडे राजाचे दशलक्ष रूपयांचे कर्ज होते त्याला त्याच्याकडे आणण्यात आले. 25 परंतु, त्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पुरेसा पैसा त्याच्याकडे नव्हता म्हणून तो, त्याची बायको, त्याची मुले आणि त्याच्याजवळ असलेले सर्व काही दुसऱ्यांना विकून टाका आणि येणाऱ्या पैशाने त्याला दिलेल्या कर्जाची परतफेड व्हावी अशी आज्ञा राजाने दिली.

26 त्या प्रचंड कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याच्याजवळ पैसे नाही हे त्याला लक्षात आले, म्हणून तो अधिकारी राजासमोर आपल्या गुडघ्यावर गेला आणि तो त्याला गयावया करू लागला, ‘माझ्याविषयी धीर धरा, आणि अखेरीस मी तुमचे सर्व कर्ज परत करीन.’ 27 राजा जाणून होता की, तो अधिकारी ते सर्व प्रचंड कर्ज कधीच फेडू शकणार नाही, म्हणून त्याचा कळवळा त्याला आला. मग त्याने त्याचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडून दिले.

28 मग तोच अधिकारी बाहेर गेल्यावर राजाच्या दुसऱ्या एका अधिकाऱ्याकडे ज्याने त्याच्याकडून एका वर्षाकरता थोडेसे कर्ज घेतले त्याच्याकडे तो गेला. त्याचा गळा धरून त्याने त्याला पकडले, तो त्याची नरडी आवळू लागला, आणि त्याला म्हणाला, ‘माझ्याकडून जे कर्ज तू घेतले होते ते मला परत कर!’ 29 तो अधिकारी त्याच्या गुडघ्यावर गेला आणि त्याला असे बोलून त्याला गयावया करत म्हणाला, ‘माझ्याशी धीर धरा, आणि अखेरीस, मी तुमचे सर्व कर्ज परत करीन.’

30 परंतु त्या पहिल्या अधिकाऱ्याने त्या मनुष्याला दिलेले लहानसे कर्ज रद्द करण्याचे नाकारत राहिला. त्याऐवजी, त्याने त्या अधिकाऱ्याला तुरूंगात टाकले आणि त्याने त्याच्याकडून घेतलेले सर्व पैसे जे त्याने कर्ज म्हणून घेतले ते परत करेपर्यंत त्याला तेथे राहावे लागणार होते. 31 घडलेला हा प्रकार इतर अधिकाऱ्यांना समजला तेव्हा ते अतिशय दुःखी झाले. म्हणून ते राजाकडे गेले आणि जे काही घडले त्याची सविस्तर माहीती कळवली.

32 तेव्हा राजाने ज्या अधिकाऱ्याकडे लाखो रूपयांची थकबाकी होती त्याला बोलावून तो त्याला म्हणाला, ‘अरे दृष्ट दासा! माझ्याकडून घेतलेले प्रचंड कर्ज मी माफ करावे म्हणून तू मला गयावया केली होती आणि ते मी रद्द ही केले होते! 33 म्हणून जसे मी तुझ्याशी दयाळूपणे वागलो आणि तुझे कर्ज रद्द केले तसेच अगदी तू देखील तुझ्या सोबती अधिकाऱ्याशी दयाळूपणे वागायचे होते आणि ते कर्ज माफ करायचे होते!’

34 राजा फार संतापला होता. त्याने ह्या अधिकाऱ्याला काही तुरूंग अधिकाऱ्याच्या स्वाधीन केले जे त्याने घेतलेले सर्व कर्ज परत करत नाही तोपर्यंत त्याचा छळ ते करणार होते.” 35 मग येशू पुढे बोलला, “तुमच्याविरूद्ध जर एखाद्या सोबती विश्वासणाऱ्याने अपराध केला असेल तर तुम्हीदेखील त्याच्याशी दयाळूपणाने वागला नाहीत आणि मनापासून क्षमा केली नाही तर माझा स्वर्गातील पिता तुमच्या सोबतही तसेच करेल.”