11
बाप्तिस्मा करणारा योहान
1
येशूने त्याच्या बारा शिष्यांना त्यांनी काय करावे ह्याच्या सूचना सांगणे संपविल्यानंतर, इस्राएलातील विविध गावांमध्ये जाण्यासाठी त्याने त्यांना पाठवून दिले. आणि मग तो स्वतः इस्राएलातील इतर गावांमध्ये उपदेश करण्यासाठी आणि शिक्षण देण्यासाठी निघून गेला.
2
बाप्तिस्मा करणारा योहान तुरूंगात असतांना, ख्रिस्त काय करत आहे याविषयी त्याने ऐकले. म्हणून त्याने त्याच्या काही शिष्यांना त्याच्याकडे
3
असे विचारण्यासाठी पाठवले की, “संदेष्ट्यांनी ज्याच्या विषयी सांगितले होते तो येणारा ख्रिस्त तूच आहेस काय, किंवा आम्ही इतर कोणाच्या येण्याची वाट पाहावी?”
4
येशूने योहानाच्या शिष्यांना उत्तर दिले, “मी लोकांना काय सांगत आहे. ते तुम्ही जाऊन योहानाला सांगा. तसेच मी काय करत आहे असे तुम्हाला दिसते ते देखील त्याला सांगा.
5
आंधळ्या लोकांनी पुन्हा पाहावे आणि लंगड्या लोकांनी चालावे असे मी करत आहे. ज्या लोकांना कुष्ठरोग झाला आहे त्यांना मी बरे करत आहे. बहिऱ्या लोकांना ऐकता यावे असे मी त्यांना बरे करत आहे. आणि जे लोक मेलेले होते त्यांना मी पुन्हा जिवंत करत आहे. गरीब लोकांना मी देवाची चांगली बातमी सांगत आहे.
6
मी जे काही कार्य करत आहे, ते ज्या लोकांना आवडत नाही त्यांच्यासारखेच जे माझ्यावर विश्वास ठेवणे थांबवत नाहीत; अशा लोकांवर देव प्रसन्न आहे.”
7
योहानाचे शिष्य निघून गेल्यानंतर, येशू योहानाविषयी लोकांच्या समूहासोबत बोलू लागला. तो त्यांना म्हणाला, “अरण्यामध्ये तुम्ही योहानाला पाहण्यासाठी गेला होता, तेव्हा तुम्ही तेथे काय पाहण्याच्या अपेक्षेने गेला होता? वाऱ्याने ऊंच गवत हालवले जात आहे ते पाहण्यासाठी तुम्ही तेथे गेला होता काय?
8
मग तुम्ही कोणत्या प्रकारची व्यक्ती दृष्टीस पडणार अशा अपेक्षेने गेला होता? भरजरी वस्त्रे महाग कपडे घालणारा व्यक्ती तुमच्या दृष्टीस पडेल अशा अपेक्षेने तुम्ही तेथे नक्कीच गेला नव्हता. होय की नाही! तुम्हाला तर चांगले ठाऊक आहे, की असे महाग वस्त्रे घालणारे लोक रानावनात राहत नाहीत, तर ते राजाच्या महलामध्ये राहत असतात.
9
तर मग खरे सांगा, कोणत्या प्रकारचा व्यक्ती तुमच्या दृष्टीस पडण्याची तुम्हास अपेक्षा होती? एक संदेष्टा? हा, होय! परंतु मला तुम्हाला सांगू द्या: योहान हा काही सर्वसाधारण संदेष्टा नव्हे.
10
शास्त्रवचनांमध्ये कोणीतरी लिहिले आणि म्हटले की, देव ज्याला संदर्भ देत होता हा तोच आहे,
‘ऐका! माझ्या येण्यासाठी लोकांनी तयार व्हावे म्हणून तूझ्यासमोर मी माझ्या एका संदेश वाहकाला पाठवत आहे’ तोच हा संदेश वाहक होय.
11
याची नोंद घ्या. आतापर्यंत जेवढे सर्व लोक जिवंत होते, त्यामध्ये कोणीही बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाऐवढा महान देवाच्या दृष्टीत झाला नाही. परंतु त्याच वेळेस, देव ज्या सर्व लोकांवर राज्य करण्यास सहमत आहे, त्यांच्यातील अगदी लहानही योहानापेक्षा महान आहे.
12
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने उपदेश करण्यास सुरूवात केली तेव्हापासून, काही लोकांनी देवाने त्यांच्यावर राज्य करावे यासाठी देवाला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्याने राज्य करावे असे त्याच्यावर जोर टाकला आहे. जेणेकरून त्यांना त्यातून काहीतरी फायदा व्हावा.
13
संदेष्टांनी शास्त्र लेखांमध्ये जे लिहिले आहे. आणि नियमशास्त्र बाप्तिस्मा करणारा योहान येईपर्यंत जे काही सांगत होता. ते सर्व तुमच्या वाचनात आहे. आणि तेच मी तुम्हाला योहानाविषयी ही सांगत आहे.
14
केवळ एवढेच नाही, परंतु तुम्ही हे समजून घेण्यास तयार असणार, तर मी तुम्हाला सांगतो की योहान हा दुसरा एलिया आहे, हा तोच संदेष्टा होता जो भविष्यामध्ये येणार होता.
15
तुम्हाला हे समजून घ्यायचे असेल, तर मी आता जे काही बोललो त्याविषयी तुम्हाला फार लक्षपूर्वक विचार करणे गरजेचे आहे.
16
परंतु तुम्ही आणि सध्या जे लोक जिवंत आहेत, ते बाजारामध्ये एकत्र येऊन खेळणाऱ्या मुलांसारखे आहेत. त्यांच्यापैकी काही त्याच्या मित्रांना एकत्र करून त्यांना असे म्हणतात,
17
‘आम्ही बासूरीवर तुम्हासाठी फार आनंददायक असे संगीत वाजवले, परंतु तुम्ही त्या संगीताच्या तालावर नाच केला नाही! त्यानंतर आम्ही तुम्हासाठी प्रेतक्रियेमध्ये जे गीत गातात ते ही गायले, परंतु तुम्ही आमच्यासोबत रडला नाही!’
18
मी असे म्हणतो कारण तुम्ही योहान आणि मी आम्हा दोघांपासून ही समाधानी नाहीत! योहान तुम्हाकडे आला आणि त्याने तुम्हाला उपदेश केला, तेव्हा जसे बहुतेक लोक करतात, तसे तो उत्तम भोजन खात नसेल किंवा द्राक्षरस ही पीत नसेल. परंतु तुम्ही त्याचा नाकार केला आणि असे म्हणाला, ‘एक दुरात्मा त्याचे नियंत्रण करत आहे!’
19
मी, मनुष्याचा पुत्र, योहानासारखा नाही. इतर लोक खातात त्याप्रमाणे मी जेवण केले आणि द्राक्षरस प्यालो. परंतु तुम्ही माझा देखील नाकार केला आणि मला म्हणालात, ‘पाहा! हा मनुष्य तर खूप जेवण करतो आणि भरपूर द्राक्षरस पितो, आणि त्याचे मित्र जकात गोळा करणारे आणि इतर पापी लोक ही आहेत!’ परंतु तुम्हामध्ये कोणी खरोखर ज्ञानी असेल तर तो आपल्या उत्तम कृत्यांनी ते दर्शवून देईल.”
पश्चात्ताप न करणाऱ्या शहरांविषयी काढलेले दुःखोद्गार
20
येशू त्या भागातील ज्या गावांमध्ये जात होता, तेथे राहणाऱ्या लोकांनी त्याला अनेक चमत्कार करताना पाहिले. परंतु ते आपल्या पापी जीवनापासून वळले नाहीत. म्हणून येशू त्यांना असे बोलून रागावू लागला.
21
“खोराजीन शहरात राहणाऱ्या आणि बैथसैदा शहरात राहणाऱ्या लोकांनो, तुम्हाला किती मोठ्या प्रमाणात दुःख सहन करावे लागणार! मी तुमच्या शहरांमध्ये फार मोठे चमत्कार केले, परंतु तुम्ही पाप करणे थांबवले नाही. मी सोर किंवा सीदोन या शहरांमध्ये फार पूर्वी जर हेच चमत्कार केले असते, तर त्या दुष्ट लोकांनी नक्कीच पाप करणे बंद केले असते; त्यांनी आपल्या अंगावर खरबरीत कपडे घातले असते आणि राखेमध्ये बसून, आपल्या पापांबद्दल दुःख प्रकट केले असते.
22
मला तुम्हाला हे सांगू द्या: सोर आणि सीदोन या दोन शहरांमध्ये जे दुष्ट लोक राहत होते त्यांना देव नक्की शासन करणार आहे, परंतु सर्व लोकांना शेवटल्या दिवशी जेव्हा न्यायालयासमोर जावे लागेल. त्या दिवशी तो तुम्हाला त्यांच्या ही पेक्षा अधिक कठोर रीतीने शासन करणार आहे.
23
कफर्णहूम नगरात राहणाऱ्या लोकांना मला तुम्हाला देखील काही तरी सांगायचे आहे. तुम्हाला असे वाटते का? की इतर लोक तुमची एवढी स्तुती करतील की तुम्ही सरळ स्वर्गात प्रवेश कराल? असे घडणार नाही! त्याउलट, लोक मरण पावल्यानंतर जेथे देव त्यांना शिक्षा देतो तेथे खाली तुम्ही जाणार आहात! बऱ्याच काळापूर्वी जर सदोमामध्ये हेच चमत्कार मी केले असते, तर त्या दुष्ट लोकांनी नक्कीच आपल्या पापांना थांबवले असते, आणि ते शहर आजही तुम्हामध्ये असते. परंतु तुम्ही पाप करणे थांबवले नाही.
24
मला तुम्हाला हे सांगायचे आहे की सदोमामध्ये राहणाऱ्या दुष्ट लोकांना देव शिक्षा करणार आहे, परंतु शेवटच्या दिवशी देव सर्व लोकांचा न्याय करेल तेव्हा तो तुम्हाला त्यांच्याही पेक्षा अधिक कठोर अशी शिक्षा देईल.”
बालसदृश मनोवृत्ती
25
येशूने त्याच वेळेस अशी प्रार्थना केली, “हे पित्या, स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर सर्व गोष्टींमध्ये तू राज्य करत आहेस. ज्या लोकांना ते फार ज्ञानी आणि अतिशय जास्त शिक्षित आहेत, अशांना ह्या गोष्टी जाणून घेण्यापासून तू थांबवले आहेस म्हणून मी तुझे आभार मानतो. त्याऐवजी, लहान लेकरांप्रमाणे जे मोठ्यांनी सांगितलेल्या गोष्टींना सत्य म्हणून स्वीकारतात अशा लोकांना तू ह्या गोष्टी प्रकट केल्या आहेस.
26
होय, माझ्या पित्या, तुझ्या दृष्टीने हे उत्तम आहे म्हणून तू असे होऊ दिले.”
27
मग येशूने लोकांना असे म्हटले, “देवाने, माझ्या पित्याने, माझे काम करण्यासाठी मला जाणणे आवश्यक आहे म्हणून मला या सर्व गोष्टी प्रकट केल्या आहेत, मी खरोखर कोण आहे हे केवळ माझ्या पित्यालाच ठाऊक आहे. शिवाय, केवळ मी आणि ज्या लोकांनी त्याला ओळखावे अशी माझी खरोखर इच्छा आहे. अशांवरच मी त्याला प्रकट करणार आहे.
येशूची स्वतःची कामगिरी
28
तुमच्या पुढाऱ्यांनी जे सर्व नियम तुम्हाला शिकवले त्यांचे पालन करण्याचा प्रयत्न करून खूप थकलेल्या लोकांनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. ह्या सर्व गोष्टी करण्यापासून मी तुम्हाला विसावा देईन.
29
एक बैल जसा त्याच्यावरील जु स्वीकारतो, तसेच तुम्ही मला अधीन व्हा, आणि मला तुम्हाला जे काही शिकवायचे आहे ते शिका. मी नम्र आणि सौम्य आहे, आणि खरोखर तुम्ही विसावा पावाल.
30
कारण मी तुम्हाला जे ओझे देतो ते फार हलके आहे, आणि तुम्ही ते अगदी सहज घेऊन चालू शकता.”