Matthew 20

Matthew 20:1

पहाटेस कामाला लावलेल्या कामक-यांना किती मजुरी देण्याचे धन्याने ठरविले होते?

पहाटेस कामाला लावलेल्या कामक-यांना प्रत्येकी एक दिनार देण्याचे धन्याने ठरविले होते [२०:१-२].

Matthew 20:3

तिस-या, सहाव्या, नवव्या आणि अकराव्या तासाच्या कामका-यांना किती मजुरी देईन असे धन्याने ठरविले होते?

जे योग्य ते तो त्यांना देईल असे धन्याने त्यांना सांगितले [२०:४-७].

Matthew 20:8

अकराव्या तासास कामाला लावलेल्या कामक-यांना किती मजुरी मिळाली?

अकराव्या तासास कामाला लावलेल्या कामक-यांना प्रत्येकी एक दिनार मजुरी मिळाली [२०:९].

Matthew 20:11

पहाटेस कामाला लावलेल्या कामक-यांची कोणती तक्रार होती?

त्यांची तक्रार अशी होती की त्यांनी पूर्ण दिवस काम केल्यावरहि त्यांना ज्यांनी एक तास काम केले त्यांच्यासारखीच मजुरी मिळाली [२०:११-१२].

Matthew 20:13

धन्याने कामका-यांच्या तक्रारीला कसा प्रतिसाद दिला?

धन्याने म्हटले की पहाटेस कामाला लागलेल्या कमक-यांना त्याने जी मजुरी ठरविली होती त्याप्रमाणे त्यांना त्याने प्रत्येकी एक दिनार दिले, आणि दुस-या कमक-यांना देखील तीतकीच मजुरी देण्याची त्याची मर्जी आणि अधिकार आहे [२०:१३-१५].

Matthew 20:17

वर यरूशलेमेस जात असतांना येशूने त्याच्या शिष्यांना कोणत्या घटनेबद्दल अगोदरच सांगितले?

येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले की त्याला मुख्य याजक आणि शास्त्र्यांच्या हाती धरून देण्यांत येईल, ते त्याला मरणदंड ठरवितील, वधस्तंभावर खिळतील, आणि तिस-या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल [२०:१७-१९].

Matthew 20:20

जब्दीच्या मुलांच्या आईने येशूला कोणती विनंती केली होती?

येशूने त्याचं राज्यांत तिच्या दोन मुलांना म्हणजे एकाला त्याच्या उजवीकडे आणि दुस-याला त्याच्या डावीकडे बसण्याची आज्ञा करावी अशी तिची इच्छा होती [२०:२०-२१].

Matthew 20:22

त्याच्या उजव्या आणि डाव्या हाताला कोणाला बसवायचे हे कोणी ठरविले होते असे येशूने सांगितले?

पित्याने त्या जागा ज्याच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांस तो त्या देईल असे येशूने सांगितले [२०:२३].

Matthew 20:25

त्याच्या शिष्यांमध्ये कोणीएक कसा श्रेष्ठ होईल असे येशूने सांगितले?

येशूने म्हटले जो कोणी श्रेष्ठ पाहू इच्छितो त्याने सेवक झालेच पाहिजे [२०:२६].

तो कशासाठी आला आहे असे येशूने म्हटले?

येशूने म्हटले की तो सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करावयास आला आहे [२०:२८].

Matthew 20:29

येशू रस्त्याने जात असतांना रस्त्याच्या बाजूला बसलेल्या दोन आंधळ्यांनी काय केले?

ते दोन आंधळे ओरडून म्हणाले, "हे प्रभो, दाविदाचे पुत्र, आम्हांवर दया करा" [२०:३०].

Matthew 20:32

येशूने त्या दोन आंधळ्यांना का बरे केले?

येशूला त्यांचा कळवला आला म्हणून त्याने त्या दोन आंधळ्यांना बरे केले [२०:३४].