Matthew 21

Matthew 21:1

त्यांच्या समोरील गावांत त्याच्या दोन शिष्यांना काय आढळेल असे येशूने सांगितले?

येशूने म्हटले की, त्यांना बांधलेली एक गाढवी आणि तिचे शिंगरू आढळतील [२१:२].

Matthew 21:4

ह्या घटनेविषयी संदेष्ट्याने काय भविष्यवाणी केली होती?

संदेष्ट्याने असे सांगितले होते की, राजा हा गाढवावर, आणि गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे [२१:-४-५].

Matthew 21:6

येशूने यरूशलेमेच्या ज्या रस्त्यावरून प्रवास केला त्या रस्त्याचे लोकसमुदायाने काय केले?

लोकसमुदायाने त्यांचे बाह्य कपडे आणि झाडांच्या डहाळ्या रस्त्यावर पसरविल्या [२१:८].

Matthew 21:9

येशू जात असतांना लोकसमुदाने काय गजर केला?

लोकांनी गजर केला की, "दाविदाच्या पुत्राला होसांना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित, उर्ध्वलोकी होसांना!" [२१:९].

Matthew 21:12

यरूशलेमेच्या मंदिरांत जेंव्हा येशू गलातेंव्हा त्याने काय केले?

मंदिरांत जे क्रयविक्रय करीत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालवून दिले, सराफाचे चौरंग आणि कबूतरे विकणा-यांच्या बैठकी पालथ्या केल्या [२१:१२].

देवाच्या मंदिराला व्यापा-यांनी काय केले होते असे येशूने म्हटले?

येशूने म्हटले की व्यापा-यांनी देवाच्या मंदिराला लुटारूंची गुहा केले आहे [२१:१३].

Matthew 21:15

येशूबद्दल जी मुले गजर करीत होती त्यांना मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांनी जेव्हा मना केले तेव्हा येशूने त्यांना काय सांगितले?

येशूने संदेष्ट्याचे शब्द उद्धृत केले की बाळकें आणि तान्ही मुलें ह्यांच्या मुखांतून देवाने स्तुति पूर्ण करविली [२१:१५-१६].

Matthew 21:18

अंजिराच्या झाडाला येशूने काय केले व का केले?

त्या अंजिराच्या झाडावर फळ नव्हते म्हणून येशूने त्या झाडाला सुकवून टाकले [२१:१८-१९].

Matthew 21:20

सुकलेल्या अंजिराच्या झाडावरून येशूने त्याच्या शिष्यांना प्रार्थनेबद्दल काय शिकविले?

येशूने त्याच्या शिष्यांना शिकविले की ते विश्वास धरून प्रार्थनेमध्ये जे कांही मागतील ते त्यांना प्राप्त होईल [२१:२०-२१].

Matthew 21:23

येशू शिकवीत असतांना, मुख्य याजक आणि वडिलांनी त्याला कोणता प्रश्न विचारला?

येशूने ह्या गोष्टीं कोणत्या अधिकाराने केल्या हे मुख्य याजक आणि वडिलांना जाणू घ्यावयाची इच्छा होती [२१:२३].

Matthew 21:25

येशूने त्याबदल्यांत मुख्य याजक आणि वडिलांना कोणता प्रश्न विचारला?

येशूने त्यांना विचारले की त्यांना काय वाटते की योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून किंवा माणसापासून होता[२१:२५]. प? योहानाचा बाप्तिस्मा हा स्वर्गातून होता हे उत्तर मुख्य याजक व शास्त्री लोकांनी का दिले नाही?

त्यांना हे ठाऊक होते की येशू त्यांना विचारेल की मग त्यांनी योहानावर विश्वास का ठेवला नाही [२१:२५].

योहानाचा बाप्तिस्मा हा माणसांपासून होता हे उत्तर मुख्य याजक व शास्त्री लोकांनी का दिले नाही?

कारण लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली कारण लोक योह्नाला संदेष्टा मानीत होते [२१:२६].

Matthew 21:28

येशूच्या कथेमध्ये दोन मुलांपैकी कोणी पित्याच्या इच्छेप्रमाणे केले?

पहिला मुलगा ज्याने तो जाऊन काम करणार नाही असे म्हटले होते, परंतु नंतर त्याने त्याचा विचार बदलला आणि तो गेला [२१:२८-३१].

Matthew 21:31

येशूने म्हटले की ते देवाच्या राज्यांत प्रवेश करतात कारण त्यांनी योहानावर विश्वास ठेवला, परंतु मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांनी योहानावर विश्वास ठेवला नाही [२१:३१-३२].

Matthew 21:35

द्राक्षमळ्याच्या धन्याने ज्या दासांना द्राक्षे आणण्यासाठी माळ्यांकडे पाठविले होते त्यांना त्यांनी काय केले?

माळ्यांनी त्या दासांना ठोक दिला, कोणाला जिवे मारले, व कोणाला धोंडमार केला [२१:३५-३६].

शेवटी धन्याने कोणाला पाठविले?

शेवटी धन्याने त्याच्या स्वत:च्या पुत्राला पाठविले [२१:३७].

Matthew 21:38

धन्याने शेवटी पाठविलेल्या व्यक्तीला माळ्यांनी काय केले?

माळ्यांनी त्याच्या पुत्राला जिवे मारले [२१:३८-३९].

Matthew 21:40

मग द्राक्षमळ्याच्या धन्याने काय केले पाहिजे असे लोकांनी म्हटले?

धन्याने पहिल्या माळ्यांचा नाश करून जे त्याला हंगामी पीक देतील अशा दुस-या माळ्यांना ठेवावे असे लोकांनी म्हटले [२१:४०-४१].

Matthew 21:42

येशूने उल्लेख केलेल्या शास्त्रभागांत बांधणा-यांनी नापसंत केलेल्या दगडाचे काय झाले?

बांधणा-यांनी जो दगड नापसंत केला होता तोच कोनशिला झाला [२१:४२].

Matthew 21:43

येशूने उल्लेख केलेल्या शास्त्रभागावर आधारित, काय होईल असे त्याने सांगितले?

येशूने सांगितले की देवाचे राज्य मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांच्याकडून काढून घेतले जाईल व जे राष्ट्र त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल [२१:४३].

Matthew 21:45

मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांनी येशूवर लगेच हात का टाकले नाहीत?

त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली कारण लोक येशूला संदेष्टा मानीत होते [२१:४६].