Matthew 19

Matthew 19:3

येशूची परीक्षा पाहाण्याकरिता परूशी लोकांनी त्याला कोणता प्रश्न विचारला/

"कोणत्याहि कारणावरून बायकोला टाकणे सशास्त्र आहे काय?" असे परूशी लोकांनी येशूला विचारले [१९:३].

सृष्टीच्या निर्मितीपासून काय खरे होते असे येशूने सांगितले?

येशूने सांगितले की सृष्टीच्या निर्मितीपासून देवाने त्यांना नरनारी असे केले [१९:४].

Matthew 19:5

देवाने त्यांना नरनारी असे निर्माण केल्यामुळे परुषाने काय करावयास हवे असे येशूने सांगितले?

पुरुषाने त्याच्या बापाला आणि आईला सोडून आपल्या पत्नीशी जडून राहिले पाहिजे [१९:५].

जेंव्हा पती आपल्या पत्नीशी जडून राहतो तंव्हा काय होते असे येशूने सांगितले?

जेंव्हा पती आपल्या पत्नीशी जडून राहातो तेंव्हा ते दोघे एकदेह होतात असे येशूने सांगितले [१९:६].

देवाने जे जोडले आहे ते माणसाने काय करू नये असे येशूने सांगितले?

देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये असे येशूने सांगितले [१९:६].

Matthew 19:7

सूटपत्र देण्याची आज्ञा मोशेने देण्याचे काय कारण होते असे येशूने सांगितले?

यहूदी लोकांच्या अंत:करणाच्या कठीणपणामुळे मोशेने सूटपत्र देण्याची आज्ञा दिली असे येशूने सांगितले [१९:८].

कोण व्यभिचार करतो असे येशूने सांगितले?

येशूने म्हटले की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय सूटपत्र देतो व दुस-या स्त्रीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो, आणि जो कोणी सूटपत्र दिलेल्या स्त्रीशी लग्न करतो तो सुद्धा व्यभिचार करतो [१९:९].

Matthew 19:10

नपुंसक ह्या नात्याने कोण स्वीकार करू शकेल असे येशूने म्हटले?

ज्याला दान दिले गेले आहे तो नपुंसक म्हणून स्वीकार करू शकतो [१९:१०-१२].

Matthew 19:13

जेंव्हा कांही लहान मुलांना येशूकडे आणण्यांत आले तेंव्हा शिष्यांनी काय केले?

जेंव्हा कांही लहान मुलांना येशूकडे आणण्यांत आले तेंव्हा शियांनी त्यांना दाटाविले [१९:१३].

येशूने लहान मुलांना जेव्हा पाहिले तेव्हा त्याने काय म्हटले?

येशूने म्हटले, बाळकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेचआहे [१९:१४].

Matthew 19:16

सार्वकालिक जीवनांत प्रवेश करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे असे येशूने त्या तरुण माणसाला सांगितले?

सार्वकालिक जीवनांत प्रवेश करण्यासाठी आज्ञा पाळ असे येशूने त्या तरुण माणसाला सांगितले [१९:१७].

Matthew 19:20

जेंव्हा त्या तरुण माणसाने आज्ञा पाळल्याचे सांगितले तेंव्हा येशूने त्याला काय करण्यांस सांगितले?

जेव्हा त्या तरुण माणसाने मी आज्ञा पाळल्या आहेत असे सांगितले तेंव्हा येशूने त्याला त्याचे सर्व विकून टाकून गरिबांना देण्यांस सांगितले [१९:२१-२२].

तुझे सर्व कांही विकून टाक ह्या येशूच्या आज्ञेच्या प्रती त्या तरुण माणसाचा काय प्रतिसाद होता?

तो तरुण माणूस खिन्न होऊत्न निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती [१९:२२].

Matthew 19:23

स्वर्गाच्या राज्यांत श्रीमंत माणसांच्या प्रवेशाबद्दल येशूने काय सांगितले?

येशूने म्हटले की धनवानांना स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश करणे कठीण आहे, परंतु देवाला सर्व कांही शक्य आहे [१९:२३-२६].

Matthew 19:28

ज्यांनी येशूला अनुसरले त्या शिष्यांना येशूने कोणते प्रतिफळ देण्याचे वचन दिले आहे?

येशूने त्याच्या शिष्यांना वचन दिले की नव्या जन्माठायी ते बारा राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्याय करतील [१९:२८].

Matthew 19:29

आता जे पहिले आणि शेवटचे आहेते त्यांच्याबद्दल येशूने काय सांगितले?

येशूने सांगितले की जे आता पहिले आहेत ते शेवटचे होतील आणि जे आता शेवटचे आहेत ते पहिले होतील [१९:३०].