Matthew 16

Matthew 16:1

येशूची परीक्षा पाहण्याकरिता परूशी आणि सदूकी ह्यांनी येशूकडून कोणत्या चिन्हाची मागणी केली?

स्वर्गातून त्यांना येशूने चिन्ह दाखवावे अशी परूशी आणि सदूकी ह्यांनी मागणी केली होत [१६:१].

Matthew 16:3

येशू परुशी आणि सदूकी ह्यांना काय देईल असे त्याने सांगितले?

परुशी आणि सदूकी ह्यांना तो केवळ योनाचे चिन्ह देईल असे येशूने सांगितले [१६:४].

Matthew 16:5

कशापासून सावध राहाण्यांस येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले?

परुशी आणि सदूकी ह्यांच्या खामिरापासून सावध राहाण्यांस येशूने त्याच्या शिशांना सांगितले [१६:६].

Matthew 16:11

येशूने जेंव्हा त्याच्या शिष्यांना सावध राहाण्यांस सांगितले तेंव्हा खरे पाहिल्यांस तो कशाबद्दल होलात होता?

येशू त्याच्या शिष्यांना परुशी आणि सदूकी ह्याच्या शिकवणीपासून सावध राहाण्यांस सांगितले [१६:१२].

Matthew 16:13

फिलीप्पाच्या कैसरीयाकडल्या आल्यावर येशूने त्याच्या शिशांना कोणता प्रश्न विचारला?

"मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात" असा पश्न येशूने त्याच्या शिष्यांना विचारला [१६:१३].

येशू कोण होता असे कांही लोकांना वाटले?

कांही लोकांना वाटले की येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान, किंवा एलीया, किंवा यिर्मया, किंवा संदेष्ट्यांतील कोणी एक [१६:१४].

पेत्राने येशूच्या प्रश्नाचे काय उत्तर दिले?

"आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा" असे येशूने उत्तर दिले [१६:१६:१६].

Matthew 16:17

पेत्राला येशूच्या प्रश्नाचे उत्तर कसे माहित?

पेत्राला येशूच्या प्रश्नाचे उत्तर माहित होते कारण स्वर्गीय पित्याने त्याला ते प्रकट केले होते [१६:१७].

Matthew 16:19

येशूने पेत्राला पृथ्वीवर कोणता अधिकार दिला?

येशूने पेत्राला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या दिल्या, जेणेकरून तो पृथ्वीवर बांधू आणि मोकळे करू शकेल, आणि ते स्वर्गांत बांधले किंवा मोकळे केले जाईल [१६>१९].

Matthew 16:21

त्या वेळेपासून, येशूने त्याच्या शिष्यांना काय स्पष्टपणे सांगण्यांस सुरूवात केली?

त्याने यरूशलेमेस जावे, पुष्कळ दु:खे सोसावी, आणि जिवे मारले जावे, आणि तिस-या दिवशी पुन्हा उठविले जावे ह्याचे अगत्य आहे ह्याबद्दल येशूने त्याच्या शिष्यांना सांगण्यांस सुरूवात केली [१६:२१].

Matthew 16:24

येशूला अनुसरण्याची ज्या कोणाची इच्छा असेल त्याने काय केले पाहिजे?

येशूला अनुसरण्याची ज्या कोणाची इच्छा असेल त्याने स्वत:चा त्याग करावा आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा [१६:२४].

मनुष्याला कशाने लाभ होत नाही असे येशूने सांगितले?

येशूने असे म्हटले की, मनुष्याने सर्व जागा मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय अलाभ [१६:२६].

Matthew 16:27

मनुष्याचा पुत्र कसा येईल असे येशूने सांगितले?

येशूने सांगितले की, मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरावानिशी आपल्या दूतांसह येईल [१६:२७].

मनुष्याचा पुत्र जेंव्हा येईल तेंव्हा तो प्रत्येकाला कसे देईल?

मनुष्याचा पुत्र जेंव्हा येईल तेंव्हा तो प्रत्येकला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल [१६:२७].