Matthew 15

Matthew 15:4

परुशी लोकांनी त्यांच्या संप्रदायेद्वारे देवाचे वचन कसे रद्द केले ह्याचे येशूने कोणते उदाहरण दिले?

मुलें त्यांच्या आई-बापाना जे पैसे देत होते ते पैसे परुशी लोकांनी त्यांच्याकडून "देवाला अर्पण" म्हणून घेतले आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांना त्यांच्या आई-बापांना साहाय्य करण्यास प्रतिबंधित केले [१५:३-६].

Matthew 15:7

यशयाची भविष्यवाणी परुशी लोकांच्या ओठांबद्दल आणि त्यांच्या अंत:करणा बद्दल काय सांगते?

यशयाने अशी भविष्यवाणी केली की परुशी लोक त्यांच्या ओठांनी देवाचा सन्मान करतील परंतु त्यांचे अंत:करण देवापासून दूर असेल [१५:७-८].

देवाचे वचन शिकविण्या ऐवजी परूशी लोक शास्त्र म्हणून काय शिकवीत होते?

परूशी लोक शास्त्र म्हणून मनुष्याचे नियम शिकवित होते [१:९].

Matthew 15:10

मनुष्याला काय विटाळवीत नाही असे येशूने म्हटले?

येशूने म्हटले की मनुष्य जे कांही खातो ते त्याला विटाळवीत नाही [१५:११, १७, २०].

मनुष्याला काय विटाळविते असे येशूने म्हटले?

मनुष्याच्या तोंडातून जे कांही बाहेर पडते ते त्याला विटाळविते असे येशूने म्हटले [१५:११, १८, २०].

Matthew 15:12

येशूने परूशी लोकांना काय नाव दिले, आणि त्यांचे काय होईल असे त्याने सांगितले?

येशूने परूश्यांना आंधळे वाटाडी असे नाव दिले, आणि ते खड्ड्यांत पडतील असे सांगितले [१५:१४].

Matthew 15:18

माणसाला विटाळविणा-या अशा कोणत्या गोष्टीं हृदयांतून बाहेर निघतात?

हृदयातून दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्म, चो-या, खोट्या साक्षी आणि शिव्या गाळी निघतात [१५:१९].

Matthew 15:21

काननी बाईने मोठ्याने ओरडून येशूकडे मदत मागितली तेव्हा प्रथम येशूने काय केले?

येशूने एका शब्दानेहि तिला उत्तर दिले नाही [१५:२३].

Matthew 15:24

त्या कनानी बाईला मदत न करण्याचे येशूने काय स्पष्टीकरण दिले?

येशूने हे स्पष्ट करून सांगितले की त्याला फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढरांकडेच पाठविण्यांत आले होते [१५:२४].

Matthew 15:27

जेंव्हा कानांनी बाईने स्वत:ला नम्र केले तेंव्हा येशूने तिला काय म्हटले व तिच्यासाठी काय केले?

येशूने म्हटले की त्या बाईचा विश्वास फार मोठा होता, आणि त्याने तिची इच्छा पूर्ण केली [१५:२८].

Matthew 15:29

गालीलमध्ये येशुजवळ लोकांचे थव्यांचे थवे आले होते त्यांचे त्याने काय केले?

येशूने मुके, व्यंग, लंगडे आणि आंधळ्यांना बरे केले [१५:३०-३१].

Matthew 15:32

शिष्यांकडे लोकसमुदायास खाऊ घालण्यासाठी कितो भाकरी आणि मासे होते?

शिष्यांजवळ सात भाकरी आणि कांही लहान मासे होते [१५:३४].

Matthew 15:36

येशूने भाकरी आणि मास्यांचे काय केले?

येशूने भाकरी व मासे घेऊन उपकारस्तुति केली, त्या भाकरी मोडल्या आणि त्याने त्या त्याच्या शिष्यांना दिली [१५:३६].

त्या भाकरी आणि मासे खून किती लोक तृप्त झाले?

चार हजार पुरूष शिवाय कांही स्त्रियां आणि मुलें ह्यांनी भाकरी खाल्ल्या आणि ते तृप्त झाले [१५:३८].

सगळ्यांनी खाऊन झाल्यानंतर किती भोजन उरले होते?

सगळ्यांनी खाऊन झाल्यानंतर सात टोपल्या भोजन उरले होते [१५:३७].