पेत्र, योकोब व योहान हे येशूबरोबर उंच डोंगरावर गेले होते [१७:१].
त्याचे रूप पालटले जेणेकरून त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले, आणि त्याची वस्त्रें प्रकाशासारखी शुभ्र झाली [१७:२].
मोशे आणि एलीया येऊन येशूशी बोलत होते [१७>३].
तीन माणसांसाठी तीन मंडप बांधण्याचे पेत्राने सुचविले [१७:४].
"हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याविषयी मी संतुष्ट आहे; ह्याचे तुम्ही ऐका" असे मेघांतून येणा-या वाणीने सांगितले [१७:५].
मनुष्याचा पुत्र मेलेल्यांतून उठेपर्यंत ह्या दृष्टांताबद्दल कोणालाहि सांगू नये असे येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले [१७:९].
येशूने म्हटले की एलीया येऊन सर्वकांही यथास्थित करील हे खरे [१७:११].
येशूने म्हटले की बाप्तिस्मा करणारा योहान हा एलीया होता आणि लोकांनी त्याला न ओळखता त्यांना वाटले तसे त्यांनी त्याचे केले [१७:१०-१३].
त्या फेफरेकरी मुलाला शिष्य बरे करू शकले नव्हते [१७:१४-१६].
येशूने त्या भूतला दटाविले, आणि तो मुलगा त्या घटकेपासून बारा झाला [१७:१८].
येशूने म्हटले की त्यांच्या अल्पविश्वासामुळे ते त्या फेफरेकरी मुलाला बरे करू शकले नव्हते [१७:२०].
येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले की, मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाईल, ते त्याला जिवे मारतील, आणि तिस-या दिवशी तो उठविला जाईल [१७:२२-२३].
येशूने पेत्राला सांगितले जाऊन समुद्रांत गळ टाक आणि प्रथम जो मासा सापडेल त्याच्या तोंडांत कर देण्यासाठी एक शेकेल असेल [१७:२७].