Matthew 12

Matthew 12:1

येशूच्या शिष्यांनी असे काय केले होते की परुश्यांनी त्यांच्याबद्दल येशूकडे तक्रार केली?

परुश्यांनी तक्रार केली की येशूचे शिष्य कणसे तोडून खात होते आणि परुश्यांचा असा विश्वास होता की शब्बाथ देवाशी असे करणे नियमशास्त्राविरुद्ध होते [१२:२].

Matthew 12:5

मंदिरापेक्षा थोर कोण होता असे येशूने म्हटले?

तो मंदिरापेक्षा थोर होता असे येशूने म्हटले [१२:६].

Matthew 12:7

मनुष्याचा पुत्र, येशू ह्याला कोणता अधिकार आहे?

मनुष्याचा पुत्र, येशू हा शब्बाथाचा धनी आहे [१२:८].

Matthew 12:9

सभास्थानामध्ये वाळलेल्या हाताच्या मनुष्यासमोर परुश्यांनी येशूला काय प्रश्न विचारला?

"शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?" असा प्रश्न परुश्यांनी येशील विचारलं [१२:१०].

Matthew 12:11

शब्बाथ दिवशी काय करणे योग्य आहे असे येशूने म्हटले?

शब्बाथ दिवशी चांगले करणे योग्य आहे असे येशूने म्हटले [१२:१२].

Matthew 12:13

वाळलेल्या हाताच्या मनुष्याला येशूने बरे केले हे परुश्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी काय केल?

पररूशी बाहेर गेले व त्याचा घात कसा करावा ह्याविषयी त्यांनी मसलत केली [१२:१४].

Matthew 12:19

येशू बद्दलच्या यशयाच्या भविष्यवाणीत येशू काय करणार नव्हता?

येशू भांडणार नाही, मोठ्याने ओरडरणार नाही, आणि चपलेला बोरू तो मोडणार नाही, किंवा मिणमिणती वात तो विझाविणार नाही [१२:१९-२०].

येशू बद्दलच्या यशयाच्या भविष्यवाणीत कोण देवाच्या न्यायाकडे कान देतील आणि येशूची आशा धरतील?

परराष्ट्रीय देवाच्या न्यायाकडे कान देतील आणि येशूची आशा धरतील [१२:१८-२१].

Matthew 12:26

येशू हा बाल्जबूलच्या साहाय्याने भूतें काढतो ह्या त्याच्यावरील आरोपाला येशूने काय उत्तर दिले?

येशूने उत्तर दिले की जर सैताना सैतानाला काढीत असेल तर त्यांचे राज्य कसे टिकणार? [१२"२६].

Matthew 12:28

जर तो देवाच्या आत्म्याच्या साहायाने भूतें काढीत आहे तर काय घडत होते असे येशूने म्हटले?

येशूने म्हटले की जर तो देवाच्या साहायाने भूतें काढीत आहे तर देवाचे राज्य त्यांच्या जवळ आले आहे [१२:२८].

Matthew 12:31

कोणत्या पापाची क्षमा केली जाणार नाही असे येशूने सांगितले?

येशूने म्हटले की पवित्र आत्म्याच्या विरुद्ध दुर्भाषण क्षमा केले जाणार नाही [१२:३१].

Matthew 12:33

कशावरून झाडाची परीक्षा होते?

झाडाच्या फळांवरून झाडाची परीक्षा होते [१२:३३].

Matthew 12:36

कशाने परूश्यांचा न्याय होईल व त्यांना दोषी ठरविले जाईल असे येशूने म्हटले?

येशूने म्हटले की परूश्यांचा त्यांच्या बोलण्यावरून न्याय होईल आणि त्यांना दोषी ठरविले जाईल [१२:३७].

Matthew 12:38

त्याच्या पिढीला कोणते चिन्ह देईल असे येशूने सांगितले?

येशूने सांगितले की तो त्याच्या पिढीला योनाचे देईल की तो तीन दिवस आणि तीन रात्री पृथ्वीच्या पोटांत होता [१२:३९-४०].

Matthew 12:41

योना पेक्षा थोर असा कोण होता असे येशूने सांगितले?

येशूने म्हटले की तो स्वत: योना पेक्षा थोर होता [१२:४१].

निनवेचे लोक आणि दक्षिणेकडची राणी येशूच्या पिढीच्या लोकांना का दोषी ठरवितील?

निनवेचे लोक आणि दक्षिणेकडची राणी येशूच्या पिढीच्या लोकांना दोषी ठरवितील कारण त्यांनी योना आणि शलमोनाद्वारे त्यांनी देवाच्या वचनाकडे कान दिला, परंतु येशूच्या पिढीच्या लोकांनी योना आणि शलमोनापेक्षा थोर अशा मनुष्य पुत्राचे वचन ऐकले नाही [१२:४१-४२].

Matthew 12:42

शलमोनापेक्षा थोर कोण होता असे येशूने म्हटले?

येशू स्वत: शलमोना पेक्षा थोर होता असे त्याने म्हटले [१२:४२].

Matthew 12:43

येशूच्या वेळेची पिढी कशी अशुद्ध आत्मा निघून गेलेल्या माणसासारखी होईल?

येशूच्या वेळेची पिढी अशुद्ध आत्मा निघून गेलेल्या माणसासारखी आहे, कारण तो अशुद्ध आत्मा दुस-या सात आत्म्यांना घेऊन येतो आणि मग त्या माणसाची शेवटली दशा पहिल्यापेक्षा वाईट होते [१२:४३-४५].

Matthew 12:48

येशूचे भाऊ, बहिण आणि आई कोण असे येशूने म्हटले?

येशूने म्हटले की जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहिण आणि आई [२:४६-५०].