जाण्याअगोदर येशूने त्याच्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केले [११:१].
योहान बाप्तिस्मा देणा-या योहानाने असा संदेश पाठविला, "जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुस-याची वाट पाहावी?" [११:३].
येशूने संगीअले, रोगी बरे होतात, मेलेले उठविले जातात, आणि गरिबांना सुवार्ता सांगण्यांत येते [११:५].
जे कोणी त्याच्यासंबंधाने अडखळत नाहीत त्यांना येशूने आशीर्वाद देण्याचे अभिवचन दिले [११:६].
जो येणारा त्याचा मार्ग सिद्ध करणारा ज्याच्याबद्दल भविष्य केले होते तो बापिस्मा देणारा योहानचा होता असे येशूने म्हटले [११:९-११].
बाप्तिस्मा देणारा योहान हा एलीया होता असे येशूने सांगितले [११:१४].
बाप्तिस्मा देणा-या योहानाला भूत लागले आहे असे ती पिढी म्हणत होती [११:१८].
येशू हा खादाड, व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र असे ती पिढी त्याच्याबद्दल बोलत होती [११:१९].
ज्या नगरांत त्याची महत्कृत्यें घडली तरीहि त्यांनी पश्चात्ताप केला नाही त्यांच्याविषयी येशूने भयंकर न्यायास जाहीर केले [११:२०-२४].
स्वर्गाचे राज्य ज्ञानी व विचारवंत ह्यांपासून गुप्त ठेवल्याबद्दल येशूने पित्याची स्तुति केली [११:२५].
जे बाळकांसारखे अज्ञानी आहेत त्यांना स्वर्गाचे राज्य प्रगट केल्याबद्दल येशूने पित्याची स्तुति केली [११:२५].
येशू म्हटला की तो स्वत: आणि ज्या कोणाला तो पित्यास प्रगट करतो तो पित्याला ओळखतो [११:२७].
ते सर्व जे कष्टी व भाराक्रांत लोक आहेत त्यांना येशूने विश्रांती देण्याचे अभिवचन दिले [११:२८].