Matthew 10

Matthew 10:1

येशूने त्याच्या बारा शिष्यांना कोणता अधिकार दिला?

येशूने त्याच्या बारा शिष्यांना अशुद्ध आत्म्यांना काढून टाकण्याचा व सर्व प्रकारचे रोग बरे करण्याचा अधिकार दिला [१०:१].

Matthew 10:2

येशूचा विश्वासघात करणार होता त्या शिष्याचे नाव काय होते?

येशूचा विश्वासघात करणार होता त्या शिष्याचे नाव यहूदा इस्कर्योत होते [१०:४].

Matthew 10:5

ह्या वेळेस येशूने त्याच्या शिष्यांना कोठे पाठविले होते?

येशूने त्याच्या शिष्यांना फक्त इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे पाठविले होते [१०:६].

Matthew 10:8

शिष्यांनी त्यांच्या सोबत पैसे किंवा अतिरिक्त कपडे घ्यावयाचे होते का?

नाही, शिष्यांनी त्यांच्यासोबत पैसे किंवा अतिरिक्त कपडे घ्यावयाचे नव्हते [१०:९-१०].

Matthew 10:11

गावोगावी जातांना शिष्यांनी कोठे राहावयाचे होते?

शिष्यांनी कोण योग्य आहे हे शोधन काढून तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहावयाचे होते [१०:११].

Matthew 10:14

जी नगरे शिष्यांचे स्वागत करणार नाहीत किंवा त्यांची वचनें ऐकणार नाहीत त्यांच्यावर येणा-या न्यायाचे स्वरूप कसे असेल?

जी नगरे शिष्यांचे स्वागत करणार नाहीत किंवा त्यांची वचनें ऐकणार नाहीत त्यांचा न्याय सदोम आणि गमोरा ह्या नगरांपेक्षा भयंकर स्वरूपाचा असेल [१०:१४-१५].

Matthew 10:16

लोक शिष्यांशी कसा व्यवहार करतील असे येशूने सांगितले?

येशूने सांगितले की लोक शिष्यांना न्यायसभांच्या स्वाधीन करतील, त्यांना फटके मारतील, व त्यांना त्याच्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यांत येईल [१०:१७-१८].

Matthew 10:19

शिष्यांना धरून दिल्यावर त्यांच्या द्वारे कोण बोलेल?

शिष्यांना धरून दिल्यानंतर पित्याचा आत्माच त्यांच्या द्वारे बोलेल [१०:२०].

Matthew 10:21

शेवटपर्यंत कोण तरेल असे येशूने म्हटले?

शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल असे येशूने म्हटले [१०:२२].

Matthew 10:24

ज्यांनी येशूचा द्वेष केला ते येशूच्या शिष्यांना कशी वागणूक देतील?

ज्यांनी येशूचा द्वेष केला ते त्याच्या शिष्यांचा देखील द्वेष करतील [१०:२२, २४-२५].

Matthew 10:28

आपण कोणाला भिऊ नये असे येशूने म्हटले?

जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका असे येशूने म्हटले [१०:२८].

आपण कोणाला भ्यावे असे येशूने म्हटले?

आत्ग्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकांत नाश करण्यांस जो समर्थ आहे त्याला आपण भ्यावे असे येशूने महाले [१०:२८].

Matthew 10:32

जो कोणी माणसांसमोर येशूला पत्करील त्याला येशू काय करील?

येशू त्याला स्वर्गाच्या पित्यासमोर पत्करील [१०:३२].

जो कोणी माणसांसमोर येशूला नाकारील त्याला येशू काय करील?

येशू त्याला स्वर्गाच्या पित्यासमोर नाकारील [१०:३३].

Matthew 10:34

कोणत्या प्रकारचे विभाग करण्यांस येशू आला असे त्याने सांगितले?

तो घरांमध्ये सुद्धा विभाग करण्यास आला असे येशूने सांगितले [१०:३४-३६].

Matthew 10:37

जो येशूसाठी त्याचा जीव गमावील तो काय राखील?

जो येशूसाठी त्याचा जीव गमावील तो त्याला राखील [१०:३९].

Matthew 10:42

जो कोणी नगण्य अशा शिष्याला गार पाण्याचा प्याला पाजितो त्याला काय प्राप्त होईल?

जो कोणी नगण्य अशा शिष्याला गार पाण्याचा प्याला पाजितो त्याला प्रतिफळ प्राप्त होईल [१०:४२].