त्याला ह्या पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे दाखविण्यासाठी येशूने त्या पक्षघाती मनुष्याला त्याच्या पापांची क्षमा झाली आहे असे सांगितले [९:५-६].
ते पाहून ते भ्याले आणि ज्या देवाने माणसाला एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले [९:८].
येशूच्या मागे जाण्याअगोदर माती जकातदार होता [९:९].
येशू आणि त्याचे शिष्य जकातदार आणि पापी लोकांबरोबर जेवले होते [९:१०].
पापी जनांना पश्चात्ताप करण्यास बोलाविण्यासाठी तो आला आहे असे येशूने म्हटले [९:१३].
त्याचे शिष्य उपास करी नव्हते असे येशूने म्हटले कारण तो अजूनहि त्यांच्याबरोबर होता [९:१५].
येशूने म्हटले की जेंव्हा त्याला त्याच्या शिष्यांपासून काढून घेतले जाईल तेंव्हा त्याचे शिष्य उपास करतील [९१५].
भयंकर रक्तस्रावाने पिडीत स्त्रीने येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले कारण तिने स्वत:शी म्हटले की केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली तर ती बरी होईल [९:२०-२१].
त्या भयंकर रक्तस्रावी स्त्रीला तिच्या विश्वासाने बरे केले असे येशूने म्हटले [९:२२].
लोक येशूकडे पाहून हसले कारण तो म्हणाला होता की मुलगी मेली नसून झोपली आहे [९:२४].
येशूने त्या मुलीला मेलेल्यातून जिवंत केले हे वर्तमान त्या सर्व देशांत पसरले [९:२६].
"अहो दाविद्पुत्र, आम्हांवर दया करा" असे ते दोन आंधळे ओरडत होते [९:२७].
येशूने दोन आंधळ्या माणसांना त्यांच्या विश्वासाप्रमाणे बरे केले [९:२९].
हा भुतांच्या अधिपतीच्या साहायाने भूतें काढतो असा परुशांनी येशूवर आरोप लाविला [९:३४].
येशूला लोकसमुदायाचा कळवला आला कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे गांजलेले व पांगलेले होते [९:३६].
पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा असे येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले [९:३८].