त्याना प्रमाण पटावे म्हणून येशूने ब-या झालेल्या कुष्ठरोग्यास याजकाकडे जाण्यांस सांगितले [८:४].
तो शताधिपतिच्या घरी जाऊन त्याच्या चाकराला बरे करील असे येशूने म्हटले [८:७].
शताधिपतिने म्हटले की येशूने त्यःच्या घरी यावे अशी त्याची योग्यता नाही तर येशू केवळ एक शब्द उच्चारून त्याच्या चाकराला बरे करू शकतो [८:८].
येशूने म्हटले की शताधिपतीमध्ये असलेला एव्हढा विश्वास त्याला इस्राएलामध्ये सुद्धा आढळला नाही [८:१०].
पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यांत मेजावर बसतील असे येशूने म्हटले [८:११].
राज्याचे पुत्र बाहेरील अंधारांत टाकले जातील जेथे रडणे व दांत खाणे चालेल असे येशूने म्हटले [८"१२].
पेत्राच्या घरांत प्रवेश केल्यानंतर येशूने पेत्राच्या सासूला बरे केले '८:१४-१५].
"त्याने स्वत: आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले" ही यशयाची भविष्यवाणी पूर्ण झाली [८:१७].
येशूने सांगितले की त्याला राहाण्याचे कायमचे स्थान नाही [८:२०].
येशूने त्या शिष्याला म्हटले की तू माझ्या मागे ये, आणि मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू डे [८:२१-२२].
समुद्रांत जेंव्हा मोठे वादळ उठले होते तेंव्हा येशू तारवामध्ये झोपला होता [८:२४].
येशूने शिष्यांना म्हटले, अहो, अल्पविश्वासी, तुम्ही कशाला भिता? [८:२६].
वारा आणि समुद्राने येशूची आज्ञा पाळली म्हणून शिष्यांना येशूचे आश्चर्य वाले [८:२७].
येशूची दोन अक्राळ-विक्राळ भूतग्रस्त व्यक्तींशी भट झाली [८:२८].
नेमलेल्या समयापूर्वी येशू त्यांना पीडावयास आला होता ही त्या दुष्टात्म्यांची काळजी होती [८:२९].
येशूने जेंव्हा दुष्टात्म्यांना काढून टाकले तेंव्हा ते डुकरांत शिरली आणि तो डुकरांचा कळप कड्यावरून समुद्रांत धडक धावत जाऊन पाण्यांत बुडून मेला [८:३२].
त्यांनी येशूला त्यांच्या हद्दीबाहेर जाण्याची विनंती केली [८:३४].