आपल्या भावाला मदत करू शकण्यापूर्वी आपण प्रथम आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून टाकले पाहिजे [७:१-५].
जे पवित्र ते जर तुम्ही कुत्र्यांना टाकले तर कदाचित ते त्यांना पायांखाली तुडवितील आणि उलटून तुम्हांला फाडून तुमचे तुकडे तुकडे करतील [७:६].
स्वर्गीय पित्यापासून प्राप्त करण्यासाठी आपण मागिणे, शोधणे आणि ठोकणे, आवश्यक आहे [७:८].
जे स्वर्गीय पित्याजवळ मागतात त्यांना तो चांगल्या गोष्टीं देतो [७:११].
लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा असे नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ आपल्याला शिकवितात [७:१२].
रुंद दरवाजा नाशाकडे जातो [७:१३].
अरुंद दरवाजा जीवनाकडे जातो [७:१४].
त्यांच्या जीवनातील फळावरून आपण त्यांना ओळखू शकतो [७:१५-२०].
जो स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश होईल [७:२४].
येशू त्यांना म्हणेल की, "मला तुमची कधीच ओळख नव्हती! अहो अनाचार करणा-यांनो माझ्यापुधून निघून ज" [७:२२-२३].
जो येशूची वचनें ऐकतो आणि त्यांचे पालन करतो तो सुज्ञ मनुष्यासारखा आहे [७:२४].
जो येशूची वचनें ऐकतो आणि त्यांचे पालन करीत नाही तो मूर्ख मनुष्यासारखा आहे [७:२६].
येशू लोकांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवीत होता [७:२९].