Matthew 6

Matthew 6:1

स्वर्गातील पित्याकडून आपल्याला प्रतिफळ मिळावे म्हणून आपले धर्माचरण कसे असावे?

आपण आपले धर्माचरण गुप्तपणे करावे [६:१-४].

Matthew 6:5

जे गुप्तपणे प्रार्थना करतात त्यांना कोणाकडून प्रतिफळ मिळते?

जे गुप्तपणे प्रार्थना करतात त्यांना स्वर्गीय पित्याकडून प्रतिफळ मिळते [६:६].

Matthew 6:8

पित्याची इच्छा कोठे पूर्ण होवो असे आपण मागितले पाहिजे?

जशी स्वर्गांत त्याची इच्छा अगोदरच पूर्ण झाली आहे त्याप्रमाणे पृथ्वीवर देखील त्याची इच्छा पूर्ण होवो असे आपण मागितले पाहिजे [६:१०].

Matthew 6:14

जर आपण इतरांच्या अपराधांची क्षमा केली नाही तर स्वर्तीय पिता काय करील?

जर आपण इतरांच्या अपराधांची क्षमा केली नाही तर स्वर्गीय पिता आपल्या अपराधांची क्षमा करणार नाही [६:१५].

Matthew 6:16

आपण कसा उपास केला पाहिजे म्हणजे आपल्याला स्वर्गीय पित्याकडून प्रतिफळ मिळेल?

आपण उपास करीत आहोत हे लोकांना कळू नये अशा रीतीने आपण उपास केला पाहिजे मगच आपला स्वर्गीय पिता आपल्याला प्रतिफळ देईल [६:१६-१८].

Matthew 6:19

आपण आपली संपत्ती कोठे सांठवून ठेवली पाहिजे, व का?

आपण आपली संपत्ती स्वर्गांत सांठवून ठेवली पाहिजे कारण तेथे तिचा नाश होत नाही व तिची चोरीहि होत नाही [६:१९-२०].

जेथे आपला खजाना आहे तेथे आपले काय असेल?

जेथे आपला खजाना आहे तेथे आपले मन असेल [६:२१].

Matthew 6:22

कोणत्या दोन धन्यांमध्ये आपण निवड करावी?

आपण देव आणि संपत्ती ह्यामध्ये आपल्या धन्याची निवड करावी [६:२४].

Matthew 6:25

आपण अन्न, पाणी, आणि कपड्यांविषयी चिंता का करू नये?

आपण अन्न, पाणी, आणि कपड्यांविषयी चिंता करू नये कारण आपला स्वर्गीय पिता पक्षांची देखील काळजी घेतो तर त्यांच्यापेक्षा आपले मोल अधिक आहे [६:२५-२६].

Matthew 6:27

आपण चिंता करून काय करू शकत नाही ह्याची येशू आपल्याला आठवण करून देतो?

चिंता केल्याने आपण आपल्या आयुष्यांत एका तासाची जास्त भर घालू शकत नाही ह्याची येशू आपल्याला आठवण करून देत आहे [६:२७].

Matthew 6:32

आपण प्रथम काय प्राप्त करण्यांस झटले पाहिजे, आणि मग आपल्या सर्व जगिक गरजां पुरविल्या जातील?

आपण प्रथम राज्य व स्वर्गीय पित्याचे नीतीमत्व प्राप्त करण्यांत झटले पाहिजे, आणि मग आपल्या सर्व जगिक गरजां भागविल्या जातील []६:३३].