जे आत्म्याने दीन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे [५:३].
जे शोक करतात ते धन्य कारण त्यांचे सांत्वन करण्यांत येईल [४:४].
जे सौम्य ते धन्य कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील [५:५].
जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य कारण ते तृप्त होतील [५:६].
येशूकरिता ज्यांचा अपमान व छळ होतो ते धन्य कारण स्वर्गांत त्यांचे प्रतिफळ मोठे आहे [५:११-१२].
सत्कर्में करण्याद्वारे विश्वासणा-यांनी त्यांचा प्रकाश लोकांसमोर पाडावा [५:१५-१६].
जुन्या कराराचे नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ येशू पूर्ण करावयास आला [५:१७].
जे कोणी देवाच्या आज्ञा पाळतील आणि त्यां इतरांना शिकावितील त्यांना स्वर्गाच्या राज्यांत मोथा म्हणतील [५:१९].
जे कोणी खून करितील तेच केवळ नव्हे तर, जो कोणी आपल्या भावार उगाच रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल [५:२१-२२].
आपल्या भावाचे आपल्या विरुद्ध कांही असेल तर प्रथम आपण जाऊन त्याच्याशी समेत करावा असे येशूने शिकविले [५:२३-२४].
न्यायालयांत जाण्याअगोदर आपण आपल्या वादीशी सलोखा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे येशूने शिकविले [५:२५].
केवळ व्यभिचार करणेच चुकीचे आहे असे नाही तर एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहणे सुद्धा चुकीचे आहे असे येशूने शिकविले [५:२७-२८].
आपल्याला पाप करण्यांस प्रवृत्त करणा-या प्रत्येक गोष्टींपासून आपण आपली सुटका करून घेतली पाहिजे असे येशूने शिकविले [५:२९-३०].
जर तिचा पती तिला घटस्फोट देतो व ती पुन्हा विवाह करते तर तो तिला व्यभिचारिणी करतो [५:३२].
ह्या सर्वांची शपथ घेण्यापेक्षा आपले बोलणे "होय, होय," किंवा "नाही, नाही" असावयास पाहिजे [५:३३-३७].
जो आपल्याशी दुष्टपणाने वागतो त्याला आपण प्रतिकार करू नये असे येशूने शिकविले [५:३८-३९].
आपल्या वै-यांवर व जे आपला छळ करतात त्यांच्यावर आपण प्रीति केली पाहिजे व त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे असे येशूने आपल्याला शिकविले [५:४३-४४].
येशूने सांगितले की जे आपल्यावर प्रीति करतात केवळ त्यांच्यावरच आपण प्रीति केली तर आपल्याला प्रतिफळ मिळत नाही कारण परराष्ट्रीय अगोदरच जे करीत आहेत तेच केवळ आपण करीत आहोत [५:४६-४७].