सैतानाकडून त्याची परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्म्याने येशूला अरण्यांत नेले [४:१].
अरण्यामध्ये येशूने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला [४:२}.
धोंड्याची भाकर करावी ही पहिली परीक्षा सैतानाने येशूला टाकली [४:३].
येशूने म्हटले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणा-या प्रत्येक वचनाने जगेल [४:४].
येशूने स्वत:ला मंदिरावरून खाली फेकावे अशी सैतानाने त्याला परीक्षा टाकली [४:५-६].
येशूने म्हटले परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहूं नको [४:७].
जर येशूने त्याला नमन केले तर तो जगातील सर्व राज्यें येशूला देईल अशी सैतानाने त्याला परीक्षा टाकली [४:८-९].
येशूने म्हटले तुझा देव परमेश्वर ह्याला नामंकर,व केवळ त्याचीच उपासना कर [४:१०].
यशयाने केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली जेथे असे म्हटले आहे की एक मोठा प्रकाश पाहातील [४:१५-१६].
"पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे" [४:१७].
तो पेत्र आणि अंद्रियाला माणसे धरणारे करील असे येशूने म्हटले होते [४:१९].
पेत्र, अंद्रिया, याकोब, आणि योहान हे सर्व मासे धरणारे होते [४:१८-२१].
येशू गालीलाच्या सभास्थानात शिकविण्यासाठी गेला होता [४:२३].
नाना प्रकारच्या रोग्यांना आणि भूतग्रस्तांना येशूकडे आणण्यांत आले होते आणि त्याने सर्वांना बरे केले [४:२४].
ह्या वेळेस लोकांचे थव्यांचे थवे येशूच्यामागे चालले [४:२५].