Matthew 3

Matthew 3:1

प? बाप्तिस्मा देणारा योहान रानामध्ये कोणता संदेश देत होता?

योहानाने संदेश दिला की, 'पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे' [३:२].

बाप्तिस्मा देणारा योहान येईल आणि तो काय करील असे यशयाच्या भविष्यवाणीने संगीअले?

बाप्तिस्मा देणारा योहान येईल आणि तो प्रभूचा मार्ग सिद्ध करील असे यशयाच्या भविष्यवाणीने सांगितले [३:३].

Matthew 3:7

परुशी आणि सदूकी लोकांना बाप्तिस्मा देणा-या योहानाने काय करावयास सांगितले?

पश्चात्तापास योग्य असे फळ द्या असेच बाप्तिस्मा देणा-या योहानाने परुशी आणि सदूकी लोकांना सांगितले [३:८].

बाप्तिस्मा देणा-या योहानाने परुशी आणि सदूकी लोकांना आपल्या मनांत कोणती कल्पना न करण्याची चेतावणी दिली?

अब्राहाम त्यांचा बाप होता अशी त्यांनी आपली मनांत कल्पना आणू नये अशी चेतावणी योहानाने परुशी आणि सदूकी लोकांना दिली [३:९].

Matthew 3:10

योहानानुसार जे प्रत्येक झाड चांगले फळ देत नाही त्यांचे काय होते?

जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते झाड तोडून अग्नीत टाकले जाते असे योहान म्हणतो [३:१०].

योहानाच्या मागून येणारा कशा प्रकारे बापिस्मा देणार होता?

योहानाच्या मागून येणारा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने बाप्तिस्मा देईल [३:११].

Matthew 3:13

येशूने योहानाला असे काय सागितले की योहान येशूला बाप्तिस्मा देण्यास सहमत झाला?

येशूने म्हटले की येशूला बाप्तिस्मा देउन योहान योग्य तेच करीत होता कारण अशा प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे उचित होते [३:१५].

Matthew 3:16

येशू पाण्यातून बाहेर आला तेंव्हा त्याने काय पाहिले?

जेंव्हा तो पाण्यातून बाहेर आला तेंव्हा येशूने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरतांना व आपणांवर येतांना पाहिला [३:१६].

येशूला बापिस्मा दिल्यानंतर आकाशातून काय वाणी झाली?

आकाशातून अशी वाणी झाली की, "हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे"[३:१७].