Matthew 2

Matthew 2:1

  • येशूचा जन्म कोठे झाला?

यहूदीयातील बेथलेहेमांत येशूचा जन्म झाला [२:१].

पूर्वेकडील विद्वान लोकांनी येशूला कोणते शीर्षक दिले?

पूर्वेकडील विद्वान लोकांनी येशूला "यहूद्यांचा राजा" हे शीर्षक दिले [२:२].

यहूद्यांचा राजा जन्मला आहे हे विद्वान लोकांना कसे माहित झाले?

विद्वान लोकांनी पूर्वेकडे यहूद्यांच्या राजाचा तारा बघितला होता [२:२].

विद्वान लोकांकडून मिळालेल्या बातमीच्या प्रती हेरोद राजाचा काय प्रतिसाद होता?

हेरोद राजाने जेंव्हा विद्वान लोकांकडून बातमी ऐकली तेंव्हा तो अस्वस्थ झाला [२:३].

Matthew 2:4

  • ख्रिस्त कोठे जन्मणार हे मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांना कसे ठाऊक होते?

यहूदीयातील बेथलेहेमात ख्रिस्त जन्मणार होता ही भविष्यवाणी त्यांना माहित होती [२:५-६].

Matthew 2:9

येशू कोठे होता हे विद्वान लोकांनी कसे शोधून काढले?

पूर्वेकडील तारा त्यांच्या पुढे गेला आणि जेथे येशू होता त्या जागेच्या वर तो थांबला [२:९].

Matthew 2:11

  • विद्वान लोक जेंव्हा त्याला भेटावयास आले तेंव्हा येशू किती वर्षाचा होता?

विद्वान लोक जेंव्हा येशूला भेटावयास आले तेंव्हा तो एक बालक होता [२:११].

विद्वान लोकांनी येशूला कोणती दानें अर्पिली?

विद्वान लोकांनी येशूला सोने, उद, आणि गंधरस ही दानें अर्पिली [२:११].

विद्वान लोक कोणत्या मार्गाने त्यांच्या घरी परतले, आणि त्या मार्गाने ते का गेले?

विद्वान लोक त्यांच्या घरी दुस-या मार्गाने गेले, कारण देवाने स्वप्नामध्ये त्यांना हेरोद्कडे जाऊ नका अशी चेतावणी दिली होती [२:१२].

Matthew 2:13

स्वप्नामध्ये योसेफाला कोणती सूचना मिळाली?

येशू आणि मरीयेला घेऊन त्याने मिसर देशांत पळून जावे अशी योसेफाला स्वप्नांत सूचना मिळाली, कारण हेरोद येशूला ठार मारण्याचा प्रयत्न करीत होता [२:१३].

मिसर देशातून येशूच्या परत येण्यानंतर कोणती भविष्यवाणी पूर्ण झाली?

'मी माझ्या पुत्राला मिसर देशातून बोलाविले आहे' ही भविष्यवाणी मिसर देशातून येशूच्या परत येण्यानंतर पूर्ण झाली [२:१५].

Matthew 2:16

ते लोक पुन्हा परतले नाही हे समजल्यानंतर हेरोदने काय केले?

हेरोदाने बेथलेहेम क्षेत्रातील दोन वर्षे आणि त्या खालील सर्व पुरुष मुलांना तहात मारून टाकले [२:१६].

Matthew 2:19

हेरोद मेल्यानंतर योसेफाला स्वप्नात कोणती सूचना मिळाली?

स्वप्नामध्ये इस्राएल देशांत परतण्याची सूचना योसेफाला मिळाली [२:१९-२०].

Matthew 2:22

मरीया आणि येशूबरोबर योसेफाने कोठे राहाण्याचा निर्णय घेतला?

गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या गावी योसेफ मारीया आणि येशू बरोबर राहू लागला [२:२२-२३]. प? योसेफ त्यांच्या नवीन जागी राहाण्यास गेल्यानंतर कोणती भविष्यवाणी पूर्ण झाली?

'ख्रिस्ताला नासोरी म्हणतील' ही भविष्यवाणी पूर्ण झाली [२:२३].