वाटेवर पडलेल बी पांखरांनी येऊन खून टाकले [१३:४].
खडकाळीवर पडलेल्या बी लवकर उगवले; आणि सूर्य वर आला तेंव्हा ते करपले व वाळून गले [१३:५-६].
कांटेरी झाडांमध्ये पडलेले बीस कांटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटविली [१३:७].
जे बी चांगल्या जमिनीत पडले होते त्याने त्या बीचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट पीक आले [१३:८].
यशयाच्या भविष्यवाणीने सांगितले की लोक ऐकतील परंतु समजणार नाहीत, ते पाहतील परंतु त्यांना दिसणार नाही [१३:१४].
लोकांनी येशूचे ऐकले परंतु त्यांचे अंत:करण जड झाले होते, ते कानांनी मंद झाले होते आणि त्यांनी आपले डोळे झाकून घेतले होते [१३:१५].
वाटेवर पेरलेले बी हा अशा प्रकारचा मनुष्य आहे की जो देवाच्या राज्याचे वचन ऐकतो परंतु समजत नाही, आणि मग तो दुष्ट येऊन त्याच्या अंत:करणांत पेरलेले ते हिरावून घेतो [१३:१९].
खडकाळीवर पेरलेले बी हा अशा प्रकारचा मनुष्य आहे की जो देवाच्या राज्याचे वचन ऐकतो परंतु व ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो, परंतु छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो [१३:२०-२१].
कांटेरी झाडांमध्ये पेरलेले बी हा अशा प्रकारचा मनुष्य आहे की जो देवाच्या राज्याचे वचन ऐकतो परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवितात [१३:२२].
चांगल्या जमिनीत पेरलेले बी हा अशा प्रकारचा मनुष्य आहे की जो वचन ऐकून ते समजतो आणि तो फळ देतोच डतो [१३:२३].
शेतामध्ये वै-याने निदण पेरले [१३:२८].
घरधन्याने दासांना सांगितले की कांपणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या, आणि नंतर जाळण्यासाठी निदण गोळा करा आणि गहू कोठारांत सांठवा [१३:३०].
मोहरीचा दाणा बागेच्या भाज्यांपेक्षा मोठा होतो आणि आकाशातील पांखरे येऊन त्याच्या फांद्यांत वस्ती करितात [१३:३१-३२].
येशूने म्हटले की स्वर्गाचे राज्य खमिरासारखे होते जे तीन मापें पिठामध्ये फुगेपर्यंत लपवून ठेविले होते [१३:३३].
चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे, शेत हे जग आहे, चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेते, निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत, आणि निदण पेरणारा वैरी हा सैतान आहे [१३:३७-३९].
जगाच्या शेवटी अनाचार करणा-यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील [१३:४२].
जगाच्या शेवटी नीतिमान हे सूर्यासारखे प्रकाशतील [१३:४३].
तो मनुष्य ज्याला तो खजाना मिळतो तो त्याचे सर्वस्व विकतो व ते शेत विकत घेतो [१३:४४].
तो मनुष्य ज्याला तो अति मोलवान मोती मिळतो तो त्याचे सर्वस्व विकतो व तो मोती विकत घेतो [१३:४५-४६].
ज्या प्रकारे जाळ्यांतील चांगल्या पदार्थांतून वाईट पदार्थ काढून फेकून दिले जातात त्या प्रकारे जगाच्या शेवटी नितीमानांपासून दुष्टांना वेगळे केले जाईल व त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकले जाईल [१३:४७-५०].
लोकांनी विचारले, "हे ज्ञान व अद्भुत कृत्यें करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून? [१३:५४].
येशूने म्हटले, संदेष्ट्याला आपल्या देशांत सन्मान मिळत नाही [१३:५७].
लोकांच्या अविश्वासामुळे येशूने त्याच्या स्वत:च्या गावांत फारशी अद्भुत कृत्यें केली नाहीत [१३:५८].