1 यान्हे नंतर महे चार देवदूत 'पृथ्वीने चार कोणावर; उभ रह्येल जोहेना, ते पृथ्वीवरीन आन समुद्रावरीन वारा वाव्हा नाहा आन कोणतेच झाडला लागवा नाहा म्हणी पृथ्वीन 'चार वांर आडवी धरतत. 2 महे आणखी एक देवदूत सूर्येद्याने दिशान वर चढतान जोहेना, त्यान्हे जवळ जिंवत देवना शिक्का आस्ताल;जे चार देवदुतास्क पृथ्वीला आन समुद्राला उपद्रव करवानीकाम सोपवेल आस्ताल, त्यासाला त्यान्ह् मोठे आवाजम आखणा, 3 आम्ह्ने देवन जे दास आसत त्यास्ने 'कपाळवर आम्हू 'शिक्का मारूसपर्यंत पृथ्वीला, समुद्राला आन झाडास्ला उपद्रव करू नका. 4 ज्यासावर शिक्का मारणामन वना त्यास्नी संख्या महे ऐकणा;इस्राएल लोकास्ने सगळे वंशापैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारासवर शिक्का मारणामन वना, 5 यहूदा वंशापैकी बारा हजारासवर शिक्का मारनामन वना. रऊबेन वंशाने पैकी बारा हजारासवर; गाद वंशाने पैकी बारा हजारासवर; 6 आशेर वंशाने पैकी बारा हजारासवर; नफताली वंशानेपैकी बारा हजारासवर; मनश्शे वंशानेपैकी बारा हजारासवर; 7 शिमोन वंशानेपैकी बारा हजारासवर; लेवी वंशानेपैकी बारा हजारासवर; इस्साखार वंशानेपैकी बारा हजारासवर; 8 जबलुन वंशानेपैकी बारा हजारासवर; योसेफ वंशानेपैकी बारा हजारासवर; बन्यामीन वंशानेपैकी बारा हजारासवर; शिक्का मारणामन वना. स्वर्गमन उध्दार पावेल लोकासना साक्षात्कार 9 याने नंतर महे जोहेना तर सगळ राष्ट्र, वंश, लोकं आन तरतराहान्या भाषा बोलणार यास्ने पैकी कोणालाच मोजता वना नाहा. असा, शुभ्र झग्ग परिधान करेल आन हातम झावळ्या ल्हेयेल, मोठा लोकास्ना घोळका सिहासनने समोर आन कोंकराने समोर उभा रह्येल मान्हे नद्र पडणा. 10 ते मोठे आवाज्म आखत रहीन्ल; 'सिहासनवर बसेल 'आम्ह्ने देवकून आन कोंकरापहीन, तारण आस. 11 तव्हा सिहासन, वडीलमंडळ आन चार प्राणी यास्नेभवती सगळ देवदूत उभ आस्तल, त्यास सिहासने समोर पालथं पडी देवला नमन[आराधना] करी आख्या आमेन, 12 धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार स्तुती, सन्मान, सामर्थ्य आन बळ ही युगानयुग आम्ह्ने देवणी आसत;आमने. 13 तव्हा वडील मंडळनेपैकी एकानं मला आखणा, शुभ्र झग्ग परिधान करेल हे कोण आसत आन कहिन वनत? 14 महे त्याला आखणा, प्रभू, हाय तुला माहीत आस. त्यान्ह् मला आखणा, मोठे 'संकटमहीन 'येत ते हे आसत;यासं'आपलं झग्ग कोकराने 'रक्तामन धुई शुभ्र[ढवळ] करेल आसत. 15 यान्हेमुळ ते देवने राजासनेसमोर आसत. ते रात्रनदिवस त्यान्हे मंदीरम त्यान्ही सेवा करत आन राजासनवर बसेल आस, तो त्यासावर आपला मंडप [विस्तृत ] धरयी. 16 ते हुतीनपुढ भुकेल व्हणार नाहा, आन तान्हेलं व्हणार नाहात; त्यासाला सूर्य किंवा कोणतीच उष्णता लागणार नाहा; 17 कारण राजासनेपुढ मध्यभागी आसेल कोकरा त्यासना 'मेंढपाळ व्हयी आन तो त्यासाला जीवन्ने पाणीने झराने जवळ ल्हीजायी; आन देव'त्यास्ने डोळास्न सगळ आशु पुसी ठाखयी.