1 मग कोकराण ते सात शीक्कास महीन एक शिक्का फोडणा ता महे जोहेना, तव्हा चार प्राण्यास्नेपैकी एकाना मेघगर्जनाने [ध्वनी] आवाजानं, ये आसा आखणा, ता महे ऐकणा, 2 मग महे जोहेना तर एक 'पांढरा घोडा, आन त्याजवर बसेल स्वार मान्हे नद्र पडणा;त्यान्हेजवळ धनुष्य आस्ताल, मग त्याला मुगुट द्यानाम वना; तो विजय मिळवत मिळवत आझुन विजयवर विजय मीळावाणी निघी गया. 3 त्यान्ह् दुसरा शिक्का फोडणा, तव्हा दुसरे प्राणिन, ये, आसा आखणा, ता महे ऐकणा. 4 तव्हा दुसरा 'घोडा 'निघणा;तो 'अग्निवर्ण' आस्ताल आन त्याझवर बसेल स्वारक पृथ्वीवरची शांतता हरण करवानी आन लोकास्कून एक मेकास्ना वध करवानी काम सोपवेल आस्ताल. त्याला मोठी तरवार दिधेल. 5 त्यान्ह् तिसरा शिक्का फोडणा, तव्हा तिसरे प्राणिन, ये आसा आखणा, ता महे ऐकणा, मग महे जोहेना, तर एक 'काळा'घोडा;आन त्याझवर बसेल कोणी एक मान्हे नद्र पडणा;त्यान्हे हातम तराजू आस्ताल., 6 आन जसा का चार प्राण्यास्ने मधून निघेल वाणी ] आवाज महे ऐकणा, ता आसा; एकृपयाला शेरभर गहू, आन एकरूपयाला तीन शेर जव, त्याल आन द्राक्षरस यास्नी नुसकान करू नको. 7 त्यान्ह् चौथा शिक्का फोडणा, तव्हा चौथे, प्राणिन, ये, आसा आखणा, ता महे ऐकणा. 8 मग महे जोहेना, तर एक फिकट रंगणा 'घोडा, आन त्याझवर बसेल माणूस मान्हे नद्र पडणा, त्यान्हा नाव 'मृत्यू;आन 'अधोलोक, त्यान्हे पाठोपाठ चालत रह्यीणाल. त्यासाला 'तरवारन, दुष्काळन, मरीन आन पृथ्वीवरचे शवपदासकून माणसासला जीवच मारवानी 'आधीकार पृथ्वीने चौथे भागवर द्यानाम वना. 9 त्यान्ह् पाचवा शिक्का फोडणा तव्हा महे वेदिखाली आत्म जोहेना;ते आत्म देवने वचाननेमुळ आन त्यास जी साक्षा दिधेल त्यान्हेमूळ जीवच मारेल लोकास्न आस्तल. 10 त्यास मोठ्यान आरडी आख्या, 'हे स्वामी'तू पवित्र आन सत्य आसस. तू कव्हर न्यायनिवाडा करणार नाहास आन पृथ्वीवर रह्णारे लोकास्पहीन आम्ह्ने 'रक्ताना सूड ल्हेणार नाहास? 11 तव्हा ते प्रतेकाला एकएक शुभ्र [ढवळ] झगा द्यानाम वना आन त्यासाला आसा आख्वानी वना का, तुम्ह्ने संगतन दास आन तुम्ह्ने भाऊस्स तुम्ह्ने सारखच जीवच मारले जाणार. त्यास्नी संख्या पूर्ण व्हऊसपर्यंत तुम्हू आजून थोडे वेळ विश्रांती ल्ह्या. 12 त्यान्ह् सहावा शिक्का फोडणा, ता महे जोहेना;तव्हा मोठा भुईकंप व्ह्येना;'सूर्य केसासने बनवेल कपडाने सारखा काळा व्ह्यीना आन सगळा चंद्र रक्ताने सारखा व्ह्यीना; 13 अंजीरना झाड मोठे वारान्न हालना म्हणजे त्यान्ह् कच्च फळ जसं खाली पडत तसचं'आकाशमधल तांर 'पृथ्वीवर 'पडणत. 14 एखांदा पुस्ताक गुंडाळवा तसा आकाश गुंडाळी करी निघी गया आन सगळा डोंगर आन बेट आपआपले जागावरीन सरकायनत[ढळनत] . 15 पृथ्वीवरच राज आन मोठमोठ अधिकारी, सरदार, श्रीमंत आन बलवान लोकं, सगळ दास आन सगळ स्वांतत्र माणंस, गुहाम्न;आन डोंगरने खडकासमन लपणी; 16 आन त्यास डोंगरला आन खडकासला आख्या, आम्हावर पडी सिंहासनवर जो बसेल आस, त्यान्हे नजरनेपुढून आन कोंकराणे क्रोधपहीन आम्हाला 'लपव', 17 कारण त्यान्हे क्रोधना मोठा दिवस वना आस, आन त्यान्हे समोर कोण टिकाव धरयी?