5

1 देवने कोकराना साक्षात्कार जो सिंहासनवर बसेल आस्ताल'त्यान्हे उजवे हातम 'पाठपोट लेहेल'आन सात शिक्क 'मारी बंद करेल पुस्ताकनी एक गुंडाळी'महे जोहेना., 2 आन गुंडाळी वरचा शिक्का फोडी ती उघडवाणी कोण योग्य आस, आसा मोठ्यान पुकारणारा एक बलवान देवदूत महे जोहेना. 3 तव्हा स्वर्गमन, पृथ्वीवर किंवा पृथ्वीनेखाली कोणीच ती गुंडाळी उघडवाणी किंवा तीझमन जवानी समर्थ नस्ताल. 4 ही गुंडाळी उघडवाणी किंवा तीझमन जवानी योग्य असा कोणी सापडायना नाहा म्हणी मला लय रडू वना. 5 तव्हा वडील मन्डळीने पैकी एक जन्न मला आखणा, रडू नको;जो, यहूदा 'वंशाना 'सिंह'दावीद्ना अंकुर'यान्ह् जय मिळवणा; म्हणी तो तिन्ह सात शिक्क फोडी ती उघडवाणी योग्य ठरणा आस. 6 तव्हा सिंहासन आन चार प्राणी यास्नेमधी आन वडीलमंडळ यास्नेमधी, ज्यान्हा जसा का 'वध करनामन वन्हाल, आसा कोकरा उभा रह्येल महे जोहेना;त्याला सात शिंग आन सात डोळ आस्तल; ते, सगळ पृथ्वीवर पाठवेल देवन्न सात आत्म आसत. 7 त्यान्ह् जायी 'सिंहासनवर जो बसेल 'आस्ताल त्यान्हे उजवे हातमहीन ती गुंडाळी ल्हीना. 8 त्यान्ह् गुंडाळी ल्हीना तव्हा ते चार प्राणी आन चोवीस वडील कोकरास्ने पाया पडनत. ते प्रतेकाने जवळ वीणा आन 'धुपन्न 'भरेल सोनान्या वाट्या आसत्याल्या; त्या वाट्या म्हणजे पवित्र जनासण्या'प्रार्थना' आसत. 9 ते नवा गीत गाई 'आखत; तू गुंडाळी ल्ह्यावानी आन तीन्ह् शिक्क फोड्वानी योग्य आसस. कारण तू मारला गह्याल आन तुन्ह् आपले रक्तान माणसासला सगळे वंश तरतरहाण्या भाषा बोलणार, लोक आन राष्ट्र याजमहीन आम्ह्ने 'देवनेसाठी विकत ल्हेयेल आसत. 10 आन आम्ह्ने 'देवनेसाठी, त्यासाला 'राज्य'आन याजक 'आसा करेल आस, आन ते पुर्थ्वीवर राज्य करहीत. 11 तव्हा महे जोहेना तर राजासन [सिंहासन] प्राणी आन वडील यास्नेभवतीबरेच देवदुतास्नी वाणी ऐकू वनी. आन त्यास्नी संख्या'आयुतास्नी आयुते आन सहस्रासनी सहस्रे आस्तेल; 12 ते मोठ्यान आखत रह्यीन्ल. वधेल [मारेल] कोकरा ' सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान गौरव आन धन्यवाद ही ल्हेवानी योग्य आस. 13 आन स्वर्गमन, पृथ्वीवर, पृथ्वीने खाली आन समुद्रवर जो प्रतेक एकना एक प्राणी आस तो, आन त्याजमधले सगळे वस्तू जातीला महे आसा आखतान ऐकणा. 'राजासनवर बसेल' याला आन कोकराला धन्यवाद, सन्मान, गौरव आन पराक्रम ही युगानु युग आसत. 14 तव्हा ते चार प्राण्यास आख्या, आमेन आन वडील मंडळास पाया पडी नमन कऱ्या.