21

1 नंतर मय नवा आकाश व नवी पृथ्वी ही पाहीना; पहिला आकाश व पहिली पृथ्वी हे निघी गेलेलं आसनलत आन समुद्रही राहीना नाहा. 2 तव्हा मय पवित्र नगरी, नवा यरुशलेम, देवपहिन स्वर्गामधून उतरतानी पाहीना. ती नवरानेसाठी शृंगारलेले नवरीप्रमाण सजवलेली आसनेल; 3 आन मय राजसनमहित आलेली मोठी वाणी ऐकना, ती अशी : पहा, देवना मंडप मनुष्यने जवळ आसं, त्यास्ने बरोबर देव आपली वस्ती करील; ते त्यान लोकं होईत आन देव स्वतः त्यास्नेबरोबर राहील. 4 तो त्यास्ने डोळासन सर्व अश्रू पुसी टाकही; हे पुढ मरण नाहा; शोक, रडणा व कष्हे नाहात; कारण पहिल्या गोष्टी व्हई गयात. 5 तव्हा राजसनवर बसलेलान आखणा; पाहा, मय सर्व गोष्ट नवीन कर. तो आखणा, लिही; कारण हे वचन विश्वसनीय व सत्य आसत. 6 त्यान मला आखणा: झाला! मय अल्फा व ओमेगा, म्हणजी प्रारंभ व शेवट आसं. मय तान्हेलेले जीवनने झराना पाणी फुकट देईन. 7 जो कोण्ही विजय मिळव त्याला ह्या गोष्टी वारसान मिळहीत; मय त्यास्ना देव होईल, आन तो मान्हा पुत्र व्हई. 8 परंतु भेकड, विश्वास न ठेवणार, अमंगळ, खून करणारं, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणस यास्ने वाटाला अग्नीना व गंधकना सरोवर येईल; हायच ता दुसरा मरण आसं. स्वर्गीय यरुशलेम 9 नंतर शेवटले सात पिडास भरलेल्या सात वाट्या ज्यास हाती घेतल्या आसनल्यात आशे सात देवदूतासपैकी एक देवदूत, येई मान्हे बरोबर बोलना; तो आखणा, ये, नवरी म्हणजी कोकरासनी स्त्री मय तुला दाखव. 10 तव्हा मय आत्मान संचरीत झालो असता त्यान मला मोठे उंच डोंगरवे नेले, आन पवित्र नगरी यरुशलेम देवपहिन स्वर्गामधून उतरतानी दाखवना. 11 तीन्हे ठाई देवना तेज आसनाल; तिन्ही कांती अतिमोलवान रत्नने सारखी आसनेल; ती स्फटिकने सारखी लखलखणारे यास्फे खडाने सारखी आसनेल; 12 तिला मोठा उंच तट आसनाल; त्याला बारा वेशी आसनल्यात, आन वेशीने जवळ बारा देवदूत आसनलत. ते वेशीवर नाव लिहलेलं आसनलत; ती इस्त्राएलने संतानासने बारा वंशासनी आसनेल. 13 पूर्वत्याव तीन वेशी, उत्तरत्याव तीन वेशी; दक्षिणत्याव तीन वेशी; व पश्चिमत्याव तीन वेशी आसनल्यात. 14 नगरीने तटला बारा पाय आसनलत, त्यावर कोकराने बारा प्रेषितासन बारा नाव आसनलत. 15 जो मान्हे संग बोलत आसनाल त्यान्हे जवळ नगरीना, तीन्हे वेशीना व तीन्हे तटना मोजमाप घेवाने साठी सोनाना बोरू आसनाल. 16 नगरी चौरस आसनेल; तिन्ही लांबी जितकी आसनेल तितकीच तिन्ही रुंदी आसनेल; त्यान नगरीना माप बोरून ल्हीना. ता सहाशे कोस भरणा, तिन्ही लांबी, रुंदी व उंची समान आसनेल. 17 मग त्यान्ह त्याने तटना माप घेतना, ता माणसासने हातन एकशे चव्वेचाळीस हात भरना; माणसासना हात म्हणजी देवदूतना हात 18 तिन्हा तट यास्फे रत्नाना आसनाल; आन नगरी शुद्ध काचने सारखी शुद्ध सोनानी आसनेल. 19 नगरीने तटन पाये वेगवेगळे मुल्यवान रत्नास शृंगारलेलं आसनलत पहिला पाया यास्फे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू, चौथा पाच, 20 पाचवा गोमेद, सहावा सार्दी, सातवा लसणा, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकीथ, बारावा पद्मराग आशे रत्नासना ता आसनाल. 21 बारा वेशी बारा मोत्यासन्या आसनल्यात; एकेक वेस एकेक मोतीनी आसनेल. नगरीमधला मार्ग पारदर्शक काचने सारखा शुद्ध सोनाच आसनाल. 22 त्याजमं मंदिर मान्हे पाहणामं वन्हा नाहा; कारण सर्व समर्थ प्रभू देव व कोकरा हेच तिन्ह मंदिर आसनलत. 23 नगरीला सूर्यचंद्रने प्रकाशानी गरज नाहा; कारण देवने तेजान ती प्रकाशित केलेली आसं; आन हायच कोकरा तिन्हा दीप. 24 राष्ट्र तीन्हे प्रकाशान चालतील आन पृथ्वीवरील राजे आपलं वैभव त्याजमं आणत. 25 तीन्ह्या वेशी दिवसा बंद होणारच नाहा; रात्र तर तय नाहाच. 26 राष्ट्रासना वैभव व प्रतिष्ठा तिजमं आणहित; 27 तिजमं कोणत्याही निषिद्ध गोष्टी आन अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम यास्ना प्रवेश होणारच नाहा, तर कोकराने जीवनने पुस्तकमं लिहलेले लोकासना मात्र व्हई.