18

1 ते नंतर मय दुसरे ऐके देवदूतला स्वर्गामहित उत्तरतानी पाहीना, त्याला मोठा अधिकार आसनाल; आन त्यान्हे तेजान पृथ्वी प्रकाशित व्ह्यनी. 2 तो जोरदार वाणीन आखणा, पडनी, मोठी बाबेल पडनी, ती भूतासनी वस्ती व सर्व प्रकारने अशुद्ध आत्मासना आश्रय व सर्व प्रकारने अशुद्ध व ओंगळ पाखरासना आश्रय आशी व्ह्यनी आसं. 3 कारण, तीन्हे जारकर्म बद्दलना क्रोधरुपी द्राक्षरस सर्व राष्ट्र प्यायन आसत; पृथ्वीवरील राजास तीन्हे बरोबर जारकर्म कऱ्या व पृथ्वीवरील व्यापारी तिन्ह आपले विषयभोगास खर्चलेले द्रव्यबळान धनवान व्ह्यनत. 4 मग स्वर्गमहित निघलेली दुसरी एक वाणी मय ऐकना; ती आखणी: मान्हे लोकासो, तुम्हू तीन्हे पापना वाटेकरी व्हावा नाहा आन तुम्हाला तीन्हे पिडातील कोणतीही पिडा व्हावा नाहा म्हणी तीन्हेमागून निघा. 5 कारण तीन्हे पापासनी रास स्वर्गापर्यंत पोहचनी आसं; आन तिन्ही अनीती देवन लक्षामं लिन्हा आसं. 6 जसा तिन्ह दिन्ही तसा तिला द्या; तीन्हे कर्मप्रमाण तिला दुप्पट द्या; तिन्ह प्यालामं जितका ओतनी त्यान्हे दुप्पट तुम्हू त्याजमं ओता. 7 जे मानानं तिन्ह आपला गैरव करणी व विषयभोग लिन्ही, ते मानान तिला पिडा व दु:ख द्या; कारण ती आपले मनमं आख, मय राणी व्हयी बसनी आसं; मय काही विधवा नाहा; मय दु:ख पाहणारच नाहा. 8 हे मूळ तीन्ह्या पिडा म्हणजी मरण, दु:ख व दुष्काळ एकेच दिवशी येणार, आन ती अग्नीमं जाळी टाकी जाही, कारण तिन्हा न्यायनिवडा करणारा प्रभू देव सामर्थ्यवान आसं. 9 पृथ्वीवरील जर राजास तीन्हे बरोबर जारकर्म व विलास कऱ्या ते तीन्हे पिडाने भयमूळ दूर उभ राही तीन्हे जळणाना धूर पाहीत तव्हा तीन्हेकरता रडहीत व उर बडवी घेतील. 10 ते आखीत अरेरे ! बाबेल हाय मोठी नगरी आसनेल ! बलाढ्य नगरी आसनेल ऐके घटकामं तुला न्यायदंड व्ह्यना आसं. 11 ११ पृथ्वीवरील व्यापारी तीन्हेसाठी रडत व शोक करत; कारण त्यास्ना माल आता कोणी विकत घेत नाहा; 12 सोना, रूप, मोलवान रत्न, मोत्ये, तागना तलम कापड, जांभळे रंगना कापड, रेशमी कापड, किरमिजी रंगना कापड, सर्व प्रकारन सुगंधी लाकड, सर्व प्रकारन हस्तीदंती पात्र, सर्व प्रकारन अतिमोलवान लाकडासन, पितळन, लोखंडान व संगमरवरी पाषाणनी पात्र; 13 दालचिनी, सुगंधी उटणी, धूपद्रव्य, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षरस, जैतूनना तेल, सपीठ, गहू, गुरे, मेंढर, घोडं, रथ, गुलाम व मनुष्यना जीव हाय त्यास्ना माल कोणी घेत नाहा. 14 जे फळवफळवीनी तुन्हे जीवला चटक लागणी आसं, ती तुन्हेपहित गयी आसं; आन मिष्टान्ने व विलासन पदार्थ हे सर्व तुजपहिन नाहीस व्ह्यन आसत; ते पुढ कोणाला मिळणारच नाहा. 15 तीन्हे योगान धनवान व्ह्यलेलं ते पदार्थासन व्यापारी रडत व शोक करत तीन्हे पिडाने भय मूळ दूर उभं रहीत; 16 आन आखीत, अरेरे, पहा ही मोठी नगरी ! तागन बारीक वस्त्र, जांभळ व किरमिजी वस्त्र पांघरलेल, सोना, मोलवान रत्न व मोत्ये यासं शृंगारलेली नगरी ! 17 ऐके घटकामं हे इतके संपतीनी राख व्ह्यनी, सर्व तांडेल, गलबतवरून बंदरोबंदरी जाणारं सर्व, आन खलाशी व समुद्रावर जितकं उद्योगधंदा करणार आसनलत तितकं दूर उभं ऱ्हयनत 18 १८ आन तीन्हे जळणाना धूर पाही ते आक्रोश करत आखणत हे मोठे नगरीने सारखा कोणती नगरी आसं? 19 त्यासं आपले डोकामं धूळ घाल्या आन, रडत शोक करत व आक्रोश करत, आख्या, अरेर, जिन्हे धनसंपतीन समुद्रामधले गलबतासन सगळ मालक श्रीमंत व्ह्यनत ती मोठी नगरी ! तिन्ही ऐके घटकामं राखरंगोळी व्ह्यनी ! 20 हे स्वर्गा, आहो पवित्रजनासो, प्रेषितासो व संदेष्टासो, तीन्हेविषयी आनंद करा; कारण देवन तिला दंड करी तुम्हाला न्याय दिन्हा आसं 21 नंतर ऐके बलवान देवदूतन जाताने मोठे तळीसारखा धोंडा उचलना आन तो समुद्रामं भिरकावि आखणा : अशीच ती मोठी नगरी बाबेल झपाटान टाकली जाही व हे पुढ कधीही सापडणार नाहा; 22 वीणा वाजवणार यास्ना नाद तुझमं हे पुढ ऐकूच येणार नाहा; कसलेही कारागीरीना कोणताही कारागीर तुझमं सापडणारच नाहा; आन जाताना आवाज तुझमं हे पुढ ऐकूच येणार नाहा 23 दिवाना उजेड तुझमं हे पुढ दिसणारच नाहा; आन नवरानवरीना शब्द तुझमं हे पुढ ऐकूच येणार नाहा; तुन्ह व्यापारी पृथ्वीवरील थोर लोकं आसनलत; 24 आन सर्व राष्ट्र तुन्हे चेटूकन ठकवलं गयत. तिजमं संदेष्टासना, पवित्रजणासना व पृथ्वीवर वधलेले सर्वासना रक्त सापडणा