17

1 नंतर सात वाट्या घेतलेले सात देवदुतासपैकी एक जन यी मान्हे बरोबर बोलू लागणा; तो म्हणला : इकडे ये, म्हणजी अनेक जलप्रवाहांवर बसलेले मोठे कलावंतीनिना झालेला न्यायनिवाडा तुला दाखव; 2 तीन्हे बरोबर पृथ्वीवरील राजास जारकर्म कऱ्या आन तीन्हे जारकर्मरुपी द्राक्षरसन पृथ्वीवर राहणार मस्त व्ह्यनत. 3 मग मय आत्मान संचरीत व्ह्यना असतानी त्यान मला रानमं ल्हीजायना; तव्हा देवनिंदात्मक नावान भरलेलं आन सात डोक व दहा शिंग असलेले किरमिजी रंगने श्वापदवर बसलेली एक स्त्री मान्हे दृष्टीला पडनी. 4 ती स्त्री जांभळा व किरमिजी वस्त्र ल्याली आसनेल; आन सोना, मूल्यवान रत्न व मोत्ये यास शृंगारलेली आसनेल. तीन्हे हातमं अमंगळ पदार्थास आन तीन्हे जारकर्मने मळवार भरलेला सोनाना प्याला आसणाल; 5 तीन्हे कपाळवर मोठी बाबेल, कलावंतीनीनी व पृथ्वीवरील अमंगळपणनी आई, हाय गूढ अर्थाना नाव लिहलेला आसनाल. 6 ती स्त्री पवित्रजणासने रक्तान व येशूने साक्षीने रक्तान मस्त व्ह्यलेली मान्हे दृष्टीला पडनी. तिला पाही मला फार आश्चर्य वाटना. 7 देवदूतन मला आखणा, तुला आश्चर्य कजा वाटना? ती स्त्री व सात डोक व दहा शिंग असलेलं तिला वाही नेणार श्वापद यास्ना गूढ अर्थ मय तुला आख. 8 जा श्वापद तुन्ह पाहीनाला ता आसनाल आन नाहा; ता अथांग डोहमहित वर येणार आसं व नाशप्रत जाणार आसं. जगने स्थापनापहिन ज्यास्ना नाव जीवनने पुस्तकमं लिहलेला नाहा आशे पृथ्वीवर राहणारे लोकासला, ता श्वापद आसनाल, नाहा. तरी हजर आसं आसा पाही आश्चर्य वाटही. 9 येथे ज्ञानवंत मनना काम आसं. ते सात डोक म्हणजी सात डोंगर आसत; तेवर ती स्त्री बसलेली आसं; 10 आन ते डोक म्हणजी सात राज आसत, ते पैकी पाच पडण आसत, एक आसं आन एक आजून आलेला नाहा; तो आल्यावर त्याला थोडा वेळ राहावा लागी. 11 जा श्वापद आसनाल आन नाहा ताच आठवा राजा आसं; आन तो नाशप्रत जाणार आसं. 12 जे दहा शिंग तुन्ह पहिले आसं ते दहा राज आसत, त्यासाला आजून राज्य मिळलेला नाहा; तरी त्यासाला श्वापदने बरोबर एक तास राजासने सारखा अधिकार मिळ. 13 ते एकविचारन आसत आन ते आपला सामर्थ्य व अधिकार श्वापदला देत. 14 हे कोकरासने बरोबर लढहीत, परंतु कोकरा त्यासाला जिंकही, कारण तो प्रभूसना प्रभू व राजासना राजा आसं; आन जे त्यान्हे बरोबर आसं ते पाचारण केलेलं, निवडलेलं विश्वासू आसत. 15 आणखी तो मला आखणा, जेथे कलावंतीन बसनी आसं तय जे जलप्रवाह तुन्ह पाहिनास ते, लोक, जनसमूह, राष्ट्र व निरनिराळ भाषा बोलणार आसं असत. 16 जे दहा शिंग व श्वापद तुन्ह पाहीनास ते कलावंतीनना द्वेष करहीत व तिला ओसाड व नग्न करहीत, तिन्हा मांस खाईत व तिला अग्नीमं जाळी टाकीत. 17 त्यास एक विचारन वागी देवन वचन पूर्ण होईपर्यंत आपला राज्य श्वापदला द्यावा आशे इरादान कृती करवानी देवन त्यास्ने मनमं घालना. 18 ती स्त्री तुन्ह पाहीना ती पृथ्वीवरले राजासवर राज्य करणारी मोठी नगरी होय.