16

1 नंतर मय मंदिरमहीन निघालेली एक मोठी वाणी ऐकना; ती ते सात देवदुतासला आखणी : जा, देवने क्रोधन्या सात वाट्या पृथ्वीवर ओता. 2 तव्हा पहिलान जाई आपली वाटी पृथ्वीवर ओतना तव्हा ते श्वापदनी खुण धारण केलेले आन त्यान्हे मूर्तीला नमन करणारे लोकासला वाईट व घाणेरड फोड वन्ह्त. 3 दुसरान आपली वाटी समुद्रामं ओतना, तव्हा समुद्र मृताने रक्तने सारखा रक्तमय व्ह्यना आन त्यजमधलं सर्व प्राणी मरी गयत. 4 तिसरान आपली वाटी नद्या व पाणीना झरा यासमं ओतना, आन त्यास्ना रक्त व्ह्यना. 5 तव्हा मय जलने देवदूतला आसा बोलतानी ऐकना : जो तू आसस व होतास, जो तू पवित्र आसस ते तू आसा न्यायनिवाडा करणास म्हणी तू न्यायी आसस; 6 कारण त्यासं पवित्रजणासना व संदेष्टासना रक्त पाडले आन तू त्यासाला रक्त प्यावानी लावणा आसं; यासाला ते पात्र आसत. 7 नंतर मय वेदीला आसा बोलतानी ऐकना : हो, हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, तुन्हा न्याय सत्य व नितीना आसत. 8 चौथान आपली वाटी सूर्यावर ओतना; आन सूर्याला अग्नीने योगे माणसासला करपी टाकवानी मुभा देवानी वन्ही. 9 माणस कडक उन्हान करपी गयत; तव्हा ते पिडासवर ज्याला अधिकार आसं ते देवने नावनी निंदा त्यास कऱ्या आन देवना गौरव करवाने साठी त्यासं पश्चाताप कऱ्या नाहा. 10 पाचवान आपली वाटी श्वापदने आसनवर ओतना तव्हा त्यान्हा राज्य अंधकारमय व्ह्यना, आन लोकास वेदनामूळ आपल्या जीभा चाव्या; 11 आपले वेदनासमूळ व आपले फोडासनेमूळ त्यासं स्वर्गाने देवनी निंदा कऱ्या, आन आपले कृत्यासने बद्दल पश्चाताप कऱ्या नाहा. 12 सहावान आपली वाटी फरात महानदावर ओतना तव्हा सूर्याने उगवती पहिन येणारे राजासनी वाट सिद्ध व्हावी म्हणी त्यान्हा पाणी आटी गया. 13 नंतर बेडूकने सारखं असलेलं तीन, अशुद्ध आत्म अजगरने तोंडमहित, श्वापदने तोंडमहित व खोटे संदेष्टासने तोंडमहित निघतानी मय पाहीना. 14 ते चिन्ह दाखवणार भूतासन आत्म आसत; ते सर्वसमर्थ देवने ते मोठे दिवसने लढाईने साठी संपूर्ण जगमधले राजासला एकत्र करवानी त्यासात्याव बाहेर जात. 15 (पाहा, जसा चोर येय, तसाच मय येणार. आपुन नग्न आसं चालू नका व आपली लाज लोकासला दिसवा नाहा म्हणी जो जागृत राहाय व आपलं वस्त्र राखं तो धन्य. ) 16 त्यासं त्यासाला इब्री भाषामं हर्मगीदोन म्हंटलेले ठिकाणी एकत्र करणा. 17 सातवान आपली वाटी अंतराळमं ओतना; तव्हा मोठी वाणी मंदिरमहित, राजसनपहिन निघनी; ती आखणी : व्ह्यना. 18 तव्हा विजा चमकन्यात, गर्जना व मेघासन गडगडाट व्हयनत. शिवाय इतका मोठा भूकंप व्ह्यना की पृथ्वीवर मानव व्ह्यले पहिन इतका मोठा भूकंप कधी व्ह्यनाल नाहा. 19 मोठे नगरीनां तीन विभाग व्ह्यनत; राष्ट्रासन नगरे कोसळनत. तव्हा देवन आपला तीव्र क्रोधरुपी द्राक्षरसना प्याला मोठे बाबेल नगरीला द्यावा, म्हणी त्यान्हे समोर तिन्हा स्मरण करवानी वन्हां. 20 प्रत्येक बेट पळी गया आन डोंगरासना ठावठिकाणा पण रहीना नाहा. 21 सुमारे एक मण वजनन्या मोठ्या गारा आकाशमहीन माणसासवर पडन्यात; तव्हा गारासने पिडानेमूळ लोकांस देवनी निंदा कऱ्या; कारण ते गारासनी पिडा अतिभयंकर आसनेल.