1 नंतर मय अत्यंत आश्चर्यकारक आसा दुसरा एक चिन्ह स्वर्गामं पाहीना; सात पीडा' घेतलेलं सात देवदूत दृष्टीला पडनत; त्या पीडा शेवटल्या आसनल्यात. कारण त्यास्ने योगे देवना क्रोध पूर्ण व्ह्यना. 2 मग अग्नीमिश्रित काचने समुद्रने सारखा काहीतरी मान्हे दृष्टीला पडना; श्वापदवर, त्यान्हे मूर्तीवर व त्यान्हे नामसंखेवर जय मिळवलेलं लोकं हातमं देवन्या वीणा ल्ही ते काचने समुद्रामं उभं असलेलं मान्हे दृष्टीला पडनत. 3 'ते देवना दास मोशे यान्हा गीत, ' व कोकराना गीत गातानी आखत : हे प्रभू देवा, सर्वसमर्था, तुन्ह कृत्य थोर व आश्चर्यकारक आसत; हे राष्ट्राधीपते. ' तुन्ह मार्ग नीतीन व सत्य आसत. 4 'हे प्रभू तुला कोण भिणार नाहा? तुन्हे नावला कोण महिमा देणार नाहा? कारण तूच मात्र पवित्र आसस; आन तुन्ह न्यायकृत्य प्रगट व्ह्यन आसत, म्हणी 'सर्व राष्ट्र तुन्हेसमोर यी तुला नमन करहित. ' 5 नंतर मय पाहीना, तव्हा साक्षीने मंडपना स्वर्गामधला मंदिर उघडना; 6 आन स्वच्छ व तेजस्वी तागना वस्त्र परिधान केलेलं व छातीवरून सोनाना पट्टा बांधलेलं आसं सात पीडा घेतलेलं ते सात देवदूत ते मंदिरमहीन निघनत. 7 ते चार प्राण्यासपैकी एकानं युगानयुग जिवंत असणारे देवने क्रोधन भरलेल्या सोनान्या सात वाट्या त्या सात देवदुतासला दिन्हा. 8 तव्हा देवना तेज व पराक्रम हेपासून निघलेले धूरन मंदिर भरी गया; आन ते सात देवदूतासन्या सात पीडा संपेपर्यंत कोणालाही मंदिरमं जाता वन्हा नाहा.