12

1 नंतर स्वर्गमं एक मोठा चिन्ह दृष्टीला पडणा ता हाय: एक स्त्री दिसनी, ती सूर्यतेज पांघरलेली आसनेल आन तीन्हे पायने खाली चंद्र व तीन्हे मस्तकवर बारा ताऱ्यासना मुगुट आसनाल. 2 ती गरोदर आसनेल आन वेणा दी प्रसूतीने कष्टान ओरडत आसनेल. 3 स्वर्गामं आजून एक चिन्ह दृष्टीस पडणा ता हाय : पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसणा, त्याला सात डोकं व दहा शिंग आसनलत, आन त्यान्हे डोकावर सात मुगुट आसनलत. 4 त्यान्हे शेपूटन आकाशमधले तारासपैकी एक तृतीअंश तारे ओढी काढी ते पृथ्वीवर पाडणा; ती स्त्री प्रसूत व्हई तव्हा तिन्हा मुल खाई टाकवा म्हणी तो अजगर ते प्रसवणारे स्त्रीने पुढ उभा आसनाल. 5 सर्व राष्ट्रासवर लोखंडी दंडान राज्य करी आसा पुत्र म्हणजी पुंसताना ती स्त्री प्रसवनी; ता तिन्हा मुल देवकड व त्यान्हे राजसनत्याव वर लीजावनी वन्हा. 6 ती स्त्री रानमं पळी गयी; तय तिन्हा एक हजार दोनशे साठ दिवस पोषण व्हावा म्हणी देवन तयार केलेलं आसा तिन्हा एक ठिकाण आसं. 7 मग स्वर्गमं युद्ध सुरु व्ह्यना; मिखाएल व त्यान्ह दूत अजगरने बरोबर युद्ध करवानी निघनत, आन त्यान्हे बरोबर अजगर व त्यान्ह दूत लढनत; 8 तरी त्यास्ना काही चालना नाहा, आन स्वर्गामं त्यास्ना ठिकाणही उरणा नाहा. 9 मग तो मोठा अजगर खाली टाकवानी वन्हां म्हणजी सर्व जगला ठकवनारा, जो दियाबल व सैतान म्हणलेला आसं तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकवानी वन्हा. 10 तव्हा मय स्वर्गामं मोठी वाणी ऐकना; ती म्हणाली: आता आम्ह्ने देवन सिद्ध केलेला तारण, त्यास्ना सामर्थ्य व त्यास्ना राज्य आन त्यान्हे ख्रिस्ताना अधिकार हाय प्रगट व्ह्यन आसत; कारण आम्ह्ने बंधूसला दोष देणारा आम्ह्ने देवने समोर रात्रंदिवस त्यासावर दोषारोप करणारा, खाली टाकवनी वन्हा आसं. 11 त्याला त्यांस कोकराने रक्तमूळ व आपले साक्षीने वचननेमूळ जिंकनत; आन त्यासावर मरवानी पाळी वन्ही तरी त्यासं आपले जीववर प्रीती करणा नाहा. 12 म्हणी स्वर्गासहो व त्याजमं राहणारासहो, उल्लास करा; पृथ्वी व समुद ह्यावर अनर्थ ओढवना आसं, कारण सैतान आपला काळ थोडा आसं हाय ओळखी अतिशय संतप्त व्हई खाली तुम्हात्याव वन्हां आसं. 13 आपुन पृथ्वीवर टाकणा गय आसत आसा पाही अजगरन पुसतानी प्रसवलेले स्त्रीना पाठलाग करणा. 14 हे स्त्रीन रानमं आपले ठिकाणी उडून जावा म्हणी तिला मोठे गरुडन दोन पंख देवानी आलेलं आसनाल; तय सर्पापहिन सुरक्षित राहत आसतानी एक काळ, दोन काळ व अर्धाकाळ तिन्हा पोषण व्हवानी आसनाल. 15 मग ते स्त्रीन वाही जावा म्हणी तीन्हे मागोमाग ते सर्पांन आपले तोंडमहीन नदीने सारखा पाणीना प्रवाह सोडणा; 16 परंतु स्त्रीला भूमीन सहाय्य करणा; तिन्ह आपला तोंड उघडी अजगरन आपले तोंडमहीन सोडलेली नदी गिळी टाकना. 17 तव्हा अजगर स्त्रीवर रागवना आन देवन आज्ञा पाळणार व येशू विषयी साक्ष देणारं तीन्हे संतानासने पैकी बाकीन जे लोक आसनलत त्यास्ने बरोबर लढाई करवानी तो निघी गया; 18 आन तो समुद्राने वाळूमं उभा रहीना.