11

1 नंतर काठीनेसारखा एक बोरू कोणी एकानं मला दीन्हा, आन आखणा: उठ, देवना मंदिर, वेदी व त्यजम उपासना करणारं लोकं यास्ना माप घे, 2 तरी मंदिरने बाहेरना अंगण सोड, त्यान्हा माप घेऊ नको; कारण ता परराष्ट्रीयासला दिलेला आसं; आन ते बेचाळीस महीन पवित्र नगरी तुडवतील. 3 मान्ह दोन साक्षी ह्यास मय अधिकार दिसू आन ते तरट पांघरी एक हजार दोनशे साठ दिवस संदेश आखहीत. 4 पृथ्वीने प्रभू समोर उभं आसनार जैतूनन दोन झाड व दोन समया ही ते आसत. 5 त्यासाला कोणी उपद्रव करू पाहिल्यास, त्यान्हे तोंडमहित अग्नी निघी त्यान्हे वैऱ्यासला खाई टाकं; कोणी त्यास उपद्रव करवानी इच्छा धरल्यास त्याला हेच प्रमाण जीवं मारवानी यावा. 6 त्यास्ने संदेश आखवानी दिवसमं पाऊस पडवा नाहा म्हणी आकाश बंद करवानी त्यासाला अधिकार दिलेला आसं; पाणीना रक्त करवानी अधिकार त्यासाला पाणीवर आसं, आन वाटही तव्हा पृथ्वीला सर्व पिडास पिडीत करवानीही त्यासाला अधिकार आसं. 7 त्यास आपली साक्ष देवानी बंद केल्यावर अथांग डोहमहित वर येणारा श्वापद त्यास्ने बरोबर लढाई करील आन त्यासाला जिंकी जीवं मारही; 8 आन आध्यत्मिक द्रष्टीन सदोम व मिसर म्हणलेला आसा जा मोठा नगर, आन ज्यासमं त्यास्ने प्रभूला वधस्तंभवर खिळवानी आलेला आसनाल त्याने रस्तावर त्यास्न प्रेत पडी रहित. 9 लोक, वंश, निरनिराळ भाषा बोलणार व राष्ट्र याजमधलं लोकं ते त्यास्न प्रेत साडे तीन दिवस पाहीत आन ते कबरमं ठेऊ देणार नहात. 10 आन त्यासावरून पृथ्वीवर राहणार आनंद व उल्लास करहीत व एकमेकासला भेटी पाठवीत; कारण ते दोघा संदेष्टास पृथ्वीवर राहणारासला पीडा दिलेली आसनेल. 11 पुढ साडेतीन दिवस नंतर जीवनना आत्मा देवपहिन येऊन त्यासामं शिरणा; आन ज्यास त्यासाला पाहिलं त्यांसाला मोठा भय वाटना. 12 तव्हा स्वर्गामहित निघालेली मोठी वाणी त्यासं आपले बरोबर बोलतानी ऐक्या, ती आखणी, इकड वर या. मग ते मेघारूढ व्हई त्यास्ने वैरीसने देखत स्वर्गामं वर गयत. 13 तेच घटकाला मोठा भूमीकंप व्ह्यना, तव्हा ते नगरना दहावा भाग पडणा, भूमिकंपन सात हजार माणस ठार व्ह्यनत आन बाकीन भयभीत व्हई त्यासं स्वर्गीय देवना गौरव कऱ्या. 14 दुसरा अनर्थ व्हई गया आसं. पाहा, तिसरा अनर्थ लवकर होणार आसं. सातवा कर्णा 15 सातवे देवदूतन कर्णा वाजवना; तव्हा स्वर्गामं मोठ्या वाणी व्ह्यन्यात; त्यास आख्या : जगना राज्य आम्ह्ने प्रभुना व त्याने ख्रिस्ताना व्ह्यना आसं; आन तो युगानयुग राज्य करही. 16 तव्हा देवसमोर आपले आसनवर बसलेलं चोवीस वडील उपड परी देवला नमन करी आखणत: 17 हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था; जो तू आसस व आसनाल तो तू आपला महान सामर्थ्य धारण करणा आसस आन राज्यरूढ व्ह्यना आससं म्हणी आम्हू तुन्हा आभार मानत. 18 राष्ट्र क्रोधाविष्ट व्ह्यनत, तुन्हे क्रोधनी वेळ वन्ही; मृतासना न्याय करवानी वेळ, आन तुन्ह दास संदेष्ट व तुन्ह पवित्रजन व तुन्हे नावनी भीती बाळगणार लहानथोर यासाला वेतन देवानी वेळ, आन पृथ्वीनी नासडी करणारासना नाश करवानी वेळ वन्ही आसं. 19 तव्हा देवना स्वर्गातील मंदिर उघडावनी वन्हा, त्यान्हे मंदिरमं त्यान्हे करारना कोश दृष्टीला पडणा आन विजा चमकण्यात, गर्जना, व मेघासना गडगडाट व्ह्यना, भूमिकांप व्ह्यना व मोठे गारासनी वृष्टीही व्ह्यनी.