10

1 महे आजून एक बलवान देवदूत स्वर्गमहीन उतरतान जोहेना;तो पूर्ण ढगकरी भरी गह्याल. त्यान्हे डोकावर मेघधनुष्य आस्ताल, त्यान्हा तोंड सूर्यानेवाणी, आन त्यान्हा पाय अग्नी स्तंभनेवाणी आस्तल. 2 त्यान्हे हातम एक उघडेल लहान पुस्ताक आस्ताल;त्यान्ह् आपला उजवा पाय समुद्रावर आन डावा पाय भुईवर ठीव्ना; 3 आन सिंहनेगर्जनाने वाणी तो मोठ्यान आरडायणा; आन तो आरडायणा तव्हा सात मेघगर्जनास आपआपलं शब्द काढ्या. 4 ते सात मेघगर्जनास शब्द काढ्या तव्हा मै लेहेणार आस्तोल, ईतकामन स्वर्ग महीन व्हयेल वाणी मैहे ऐकणा;तिन्ह आखणी, सात मेघगर्जनास काढेल 'शब्द गुप्त ठिव, ते लिहू नको. 5 जे देवदुतला समुद्रावर आन भुईवर उभा रह्येल मैहे जोहेना, त्यान्ह् आपला उजवा हात स्वर्गक वर करणा. 6 आन जो युगानुयुग जिंवत आस, त्यान्ह् आकाश आन त्याज्म जा आस ता, पृथ्वी आन तिजवर जा आस ता आन समुद्र आन त्याज्म जा आस ता निर्माण करणा, त्यान्ही शपथ ल्ही आखणा;आजून टाईम लागणार नाहा; 7 पण जव्हा सातवे देवदूतनी वाणी व्हयी ते दिवसम म्हजे तो देवदूत कर्णा वाजवाने तयारीम आसयी ते दिवसम देवणी गुप्त योजना पूर्ण व्हयी. त्यान्ह दास संदेष्ट त्यासाला देयेल वचाने नुसार घडी यीही. '' 8 स्वर्गमहीन व्हयेल जी वाणी महे ऐकणाल, ती मान्हेबरोबर परत बोलतान महे ऐकणा. तीन्ह आखणी; जा आन समुद्रावर आन भुईवर उभा रह्येल देवदुतने हात मधला उघडेल पुस्ताक जाई ल्हे. 9 तव्हा मय ते देवदुतक जायी, ता लहान पुस्ताक मला दे आसा आखणा. 'त्यान्ह् मला आखणा, 'हाय ल्हे आन खायी टाक;'ता तुन्हा पॉट 'कडू करयी तरी तुन्हे तोंडला 'मधनेसारखा गोड लाघयी. 10 तव्हा महे देवदुतने हात महीन 'ता लहान पुस्ताक ल्हीना; आन खायी टाखना, ता मान्हे तोंडला मधनेसारखा गोड लागणा, 'तरी ता खाल्यावर मान्हा पॉट कडू व्ह्यना. 11 तव्हा त्यास मला आख्या, आनेक, लोकं राष्ट, वेगवेगळ्या भाष्या बोलणार आन राजास्ला यान्हेबद्दल तुन्ह् परत 'संदेश आखले पाहिजे.