1 तव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही आसनास तरी स्वत तुला सबब नाहा; कारण ज्यासमं तू दुसरासला दोष लावस त्यजमं तू स्वताला दोषी ठरवस; कारण दोषी ठरवणारा तू पण त्याच गोष्टी करस; 2 पण आशा गोष्टी करणारे विरुद्ध देवना न्याय सत्यानुसार आसं हाय आपल्याला माहित आसं. 3 तर हे मानवा, आशा गोष्टी करणाऱ्यासला जा तू दोष लावस व स्वत त्याच करस, तो तू देवने न्यायमहीत सुटीस आसा तुला वाटं काय? 4 किंवा देवनी ममता तुला पश्चातापत्याव नेणारी आसं हाय न समजी तू त्यान्ही ममता, क्षमा व सहनशीलता ह्यास्ने विपुलतेना अनादर करस काय? 5 का, आपले हाटीवादिपणावार पश्चातापहीन अंत:करणवार देवना क्रोध व यथोचित न्याय यास्ने प्रकटीकरणने दिवसने साठी स्वतानेकरता क्रोध साठी ठेवस? 6 तो प्रत्येकाला ज्यान्हे त्यान्हे कृत्यानुसार फळ दीही. 7 म्हणजे जा कोण्ही धीरानं सत्कर्म करीत रही गौरव, सन्मान व अक्षयता हाय मिळवाणी प्रयत्न करं, त्यासाला तो सार्वकालिक जीवन देणारच; 8 , 9 पण जे तट पडणारं आसत व सत्याला न मानता अनीतीला मानत त्यासावर क्रोध व कोप, संकट व क्लेश हाय यीहीत. म्हणजी दुष्कृत्य करणारा माणूस, प्रथम यहुदी आन मग हेल्लेनी, आशे प्रतेकाने जीववर ती यीहीत; 10 पण सत्कृत्य करणारा प्रत्येक, प्रथम यहुदी आन मग हेल्लेणी यासाला, गौरव, सन्मान व शांती हे मीळहित; 11 कारण देवत्याव पक्षपात नाहा. 12 कारण ज्यासाला नियमशास्त्र नाहा आशे जितकासं पाप कऱ्या तितकं नियमशास्त्रव्यतरिक्त नाश पावहीत आन नियमशास्त्र आशी जितकासं पाप कऱ्या तितकसना न्याय नियमशास्त्रानुसार व्हई. 13 कारण नियमशास्त्र ऐकणारं देवने दृष्टिनं नीतिमान आसत आसा नाहा, तर नियमशास्त्राप्रमाणे आचारण करणारं नीतिमान ठरवण्यात यीहीत. 14 कारण ज्यासाला नियम शास्त्र नाहा आसं परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रामं जा आसं ता स्वभावत करत तव्हा त्यासाला नियम शास्त्र नाहा तर, ते स्वताच नियम शास्त्र आसत. 15 म्हणजी ते नियमशास्त्रमधलं आचार आपले अंत:करणमं लिहिलेला आसं आसा दाखवत; त्यास्ने बरोबर त्यास्नी सद्द्विवेकबुद्धी त्यासाला साक्ष देय आन त्यांस्न एकमेकासने विषयी विचार दोष लावणार किंवा दोषमुक्त करणारं आसं आसत. 16 जे दिवस देव मान्हे सुवार्ताप्रमाणं येशू ख्रिस्ताने द्वारे माणसासने गुप्त गोष्टीसना न्याय करही ते दिवस हाय दिशी यिही. 17 आता जर तू स्वताला यहुदी आखत आशीस, आन नियम शास्त्राना आधार ल्हेस व देवने विषयी आभिमान धरस, 18 तुला त्यान्ही इच्छा कळं आन नियमशास्त्रा मधला शिक्षण मिळाल्यामुळे जा सर्वोत्तम ता तू पसंत करस; 19 आन नियमशास्त्रामं आपल्याला ज्ञानना व सत्याना स्वरूप उपलब्ध व्ह्यना आसं, म्हणी आपुन आंधळासना वाटाडी, अंधारमं आसलेल्यासला प्रकाश, 20 अल्पबुद्धी लोकासनं शिक्षक, बाळकासनं गुरु आसत, आशी तुन्ही खात्री व्ह्यनी आसं 21 तर मग दुसराला शिकवणारा तू स्वताला शिकवस नाहा का? चोरी करू नका आशी घोषणा करणारा तू स्वताच चोरी करस का? 22 व्यभिचार करवा नाहा आसा आखणारा तू स्वताच व्यभिचार करस का? मूर्तींना विटाळ मानणारा तू स्वताच देवळं लुटस का? 23 नियम शास्त्रांना आभिमान बाळगणारा तू स्वताच नियम शास्त्राने उल्लंघनवार देवना आपमान करस का? 24 तुम्ह्नेमुळे परराष्ट्रीयासमं देवने नावनी निंदा होत ऱ्हइत, आसा शास्त्रामं लिहिलेला आसं. 25 कारण जर तू नियम शास्त्राप्रमाणे वागत आशीस तर सुंताना उपयोग आसं खरा; पण जर तू नियम शास्त्राना उल्लंघन करणारा आशीस तर तुन्ही सुंता झालेली आशी ती न झाल्यानी सारखीच आसं 26 तर मग सुंता न झालेले माणूसनं नियम शास्त्रानं नियम पाळणा तर त्यास्ना सुंता न होना हाय सुंता आसा गणण्यात येणार नाहा का? 27 आन तुला शास्त्रलेख अशीही व तुन्ही सुंता व्हई जा तू नियम शस्त्राना उल्लंघन करणारा आसस ता तुन्हां न्याय, जा शारीरिक सुंता न झालेल्यापैकी आशी नियम शास्त्र पाळं, तो करही. 28 कारण जा बाह्यत्कारी यहुदी ता यहुदी नाहा आन देहनी बह्यत्कारी सुंता ती सुंता नाहा; 29 पण जा अंतरी यहुदी ता यहुदी होय; आन लेखप्रमाने व्ह्वानी ती सुंता नाहा तर आध्यात्मिक दृष्ट्या जी आंत:करणनी व्ह्वानी ती सुंता होय; अशासनी प्रशंसा माणसासपहित नाहा, तर देवपहिन व्हय.