बारा प्रेषितासला कामगिरीवर पाठविणा 1 मग त्यान्ह बारा प्रेषितासला एकत्र बोल्ह्वी त्यासाला सगळं भूतं काढवानी व रोग बरा करवानी सामर्थ्य व अधिकार दिन्हा; 2 आन त्यासाला देवने राज्यानी घोषणा करवानी व रोग्यासला बरा करवानी पाठवना. 3 त्यान्ह त्यासाला आखणा, वाटने साठी काही ल्हेऊ नका; काठी, झोळी, भाकरी किंवा पैसा ल्हेऊ नका. 4 जे कोणते घरमं तुम्हू जासाल, तयच ऱ्हा आन तहीनच निघी जा. 5 जा कोण्ही तुम्ह्ना स्वागत करणार नाहा त्यास्ने विरुद्ध साक्ष व्हावी म्हणी तुम्हू ते गावमहित निघते वेळेस आपले पायनी धूळ झटकी टाका. 6 मग ते निघी सगळीकडं सुवार्ता आखत व रोग बरा करत गावोगाव फिरू लागणत. 7 तव्हा घडत असलेल्या सगळ्या गोष्टी मांडलिक हेरोदन ऐकना; आन तो मोठे घोटाळामं पडणा, कारण योहान मेलेल्यामहित उठाना आसं आसा कित्येक जण आखतत; 8 कित्येक एलीया प्रगट व्ह्यना आसं आसा आखतत तर कोण्ही आखता प्राचीन संदेष्टापैकी कोणतरी परत उठना आसं आसा आखतत; 9 पण हेरोदन आखणा, मह्य योहानना शीरच्छेद करणा, तर मग ज्यान्हे विषयी मय अशा गोष्टी ऐकं, तो कोण? म्हणी त्याला जवानी तो संधी जोता. 10 नंतर प्रेषितासं परत यी आपुन जा जा कऱ्या ता ता त्याला सविस्तर आख्या; तव्हा त्यान्ह त्यासाला बरोबर ल्ही बैथसैदा नावने गावत्याव एकांत जागी गया. 11 हाय कळल्यावर वर लोकसमुदाय त्यान्हे मागून गयत; तव्हा त्यासना स्वागत करी तो त्यास्ने बरोबर देवने राज्याने विषयी बोलता आन ज्यासाला बरा व्ह्वानी गरज आसनेल त्यासाला तो बरा करता. 12 दिवस उतरू लागणा तव्हा ते बारा प्रेषित जवळ यी त्याला आखणत, लोकासला निरोप द्या, म्हणजी ते भोवतालने गावमं व शेतमं जाई उतरीत व खावाणी सोय करहित; कारण आपुन रानमं असत. 13 पण त्यान्ह त्यासाला आखणा, तुम्हुच त्यासाला खावानी द्या. त्यासं आख्या, आम्हू जाई हे सगळे लोकासने साठी अन्न विकात आणले नाहा तर पाच भाकरी व दोन मासं एवढाशिवाय आम्हात्याव काहीच नाहा. 14 कारण ते सुमारे बारा हजार परुष आसनलत. तव्हा त्यान्ह आपले शिष्यासला आखणा, सुमारे पन्नास पन्नास जणासन्या पंक्ती करी त्यासाला बसवा. 15 त्यासं ते प्रमाणं त्यासाला बसव्या. 16 तव्हा त्यान्ह त्या पाच भाकरी आन दोन मासं ल्ही वर स्वर्गात्याव जोही त्यासाला आशीर्वाद दिन्हा, आन त्यास्न तूकड करी ता लोक समुदायला वाढवनेसाठी शिष्यासत्याव दिन्हा. 17 तव्हा सगळजण जेवी तृप्त व्हयनत, आन उरलेल्या बारा टोपल्या तूकडं त्यासं उचली ल्हीध्या. 18 नंतर आसा व्ह्यना का, तो एकांती प्रार्थना करत असतानी शिष्य त्यान्हे संग आसनलत. तव्हा त्यान्ह त्यासाला विचारना, लोकं मला कोण म्हणी आखत? 19 त्यासं उत्तर दिध्या, बाप्तिस्मा करणारा योहान; पण कित्येक आखत एलिया; आन काही आखत का प्राचीन संदेष्टापैकी कोणतरी परत उठना आसं. 20 त्यान्ह त्यासाला आखणा, पण तुम्हू मला कोण म्हणी आखत? पेत्रन उत्तर दिन्हा, देवना ख्रिस्त. स्वतःना मरण व पुनरुत्थान हे विषयीना येशुना भविष्य 21 मग हाय कोन्हाला कळता कामा नये, आशी त्यान्ह त्यासाला निक्षी आज्ञा करणा. 22 आन आखणा, मनुष्यने पुत्रनं पुष्कळ दुखः भोगावा, वडील मंडळी, मुख्य याजक व शास्त्री यासापहिन नाकरला जावा, जीवं मारला जावा, आन तिसरे दिवस परत उठवला जावा, यान्हा आगत्य आसं. 23 त्यान्ह सगळासला आखणा, जर कोण्ही मान्हे माघं येवानी जोय तर त्यान्ह आत्मत्याग करवा दररोज स्वताना वधस्तंभ उचली मला आनुसरावा. 24 जो कोण्ही आपला जीव वाचवानी जोय तो त्याला मुखही; पण जो कोनही मान्हे साठी आपले जीवला मुखही तो त्याला वाचवी. 25 कारण जर कोण्ही मनुष्यान सगळा जग मिळवणा आन स्वताला गमवना किंवा स्वताना नाश करी लिन्हा तर त्याला का फायदा? 26 जो कोणी मान्हा व मान्हे वचनासनी लाज धरं त्यान्ही लाज मनुष्यना पुत्र स्वताने व पिताने व पवित्र देवदूतासने गौरवमं यीही तव्हा धरी. 27 मय तुम्हाला खरा आखं का, उथी उभं असणारसमं कोण्ही आसं असत का, ते देवना राज्यजोस पर्यंत त्यासाला मराणना आनुभव येणारच नाहा. 28 हे बोलनानंतर आसा व्ह्यना का, सुमारे आठ दिवसानं पेत्र, योहान आन याकोब यासाला बरोबर ल्ही तो प्रार्थना करवानी डोंगरवर गया. 29 आन तो प्रार्थना करत आसतानी त्यान्हे मुखना रुपांतर व्हई त्यान्ह वस्त्र पांढरं व चकचकीत व्हयनत. 30 आन पहा, मोशे व एलिया हे दोघजण त्यान्हे संग बोलत ऱ्हयनलत; 31 ते तेजोमय दिसणत आन तो जो आपला निर्गमन येरुश्लेममं पूर्ण करणार आसनाल त्यान्हे बद्दल ते बोलत ऱ्हयनलत. 32 तव्हा पेत्र व त्यान्ह सोबती झोपवार भारावनलत; पण ते जागं व्हयनत व त्यासाला त्यान्हा तेज व त्यान्हे जवळ उभं असलेलं पुरुष दिसनत. 33 मग आसा व्ह्यना कि, ते त्यासं पहिन निघी जात्त आसतानी पेत्रनं येशूला आखणा, गुरुजी आपण उथीच आसावा हाय बरा; तर आम्हू तीन मंडप करू; आपलेसाठी एक, मोशेसाठी एक, व एलियाने साठी एक; हाय जा तो बोलणाल त्यान्हा त्याला भान नसनाल. 34 तो हाय बोलत असता मेघ उतरी त्यासावर छाया करू लागणा; आन ते मेघमं शिरणत तव्हा ते भयभीत व्ह्यनत 35 तव्हा मेघ महित आशी वाणी व्हयनी कि, हाय मान्हा पुत्र, ' 'मान्हा निवडलेला आसं; यान्हा तुम्हू ऐका'. 36 हाय वाणी व्ह्यनी तव्हा येशू एकटाच दिसणा. यावर ते गप्प ऱ्हयनत आन ज्या गोष्टी त्यासं जोध्याल त्यामधला त्यासं काहीच ते दिवसमं कोणाला आख्या नाहा. 37 नंतर आसा व्ह्यना का, दुसरे दिवस ते, ते डोंगरवरीन खाली आल्यावर मोठा लोक समुदाय त्यासाला भेटना. 38 तव्हा, समुदायमहीन एक माणूस मोठ्यानं ओरडी आखणा गुरुजी, मे आपल्याला विनंती करं का, मान्हे पोऱ्यावर कृपादृष्टी करा; कारण हाय मान्हा एकुलताएक आसं; 39 आन ज्वा, कोण्हीएक आत्मा ह्याला धरं, आन हाय एकाएकी ओरडं, मग तो याला आसा पीळं कि याला फेस येय; तो याला पुष्कळ ठेचं आन याला सोडता सोडं नाहा. 40 त्याला कधी टाकावा म्हणी मयं आपले शिष्यासला विनंती करणा, पण त्यासाला तो काढता वन्हा नाहा. 41 येशूनं आखणा, आहो विश्वासहीन व कुटील लोकास्वो, मय कुठवर तुम्ह्ने संग ऱ्हऊ व तुम्हना सोसू? तू आपले पोऱ्याला इकडं आन. 42 तो जवळ येत आसं इतकामं भूतनं त्याला आपटना आन पिळी टाकणा, पण येशूनं ते अशुद्ध आत्माला धमकावणा; आन ते पोऱ्याला बरा करी त्यान्हे बापत्याव परत दिन्हा. 43 देवना हाय महान सामर्थ्य जुई सगळं लोकं थक्क व्हयनत. येशुना स्वताने मरणने विषयी दुसरा भविष्य त्यान केलेल्या सगळे कृत्यासवरीन सगळ लोकं आश्चर्य करत असता त्यान्ह आपले शिष्यासला आखणा, 44 तुम्हू ह्या गोष्टी नीट लक्षामं ठेवा; कारण मनुष्यने पुत्रला लोकासने हातमं धरी देवाणी येणार आसं. 45 हाय गोष्ट त्यासाला समजनी नाहा; ती त्यासाला समजू नाहा म्हणी ती त्यासापहिन गुप्त ठेवानी वन्ही, आन हे गोष्टबद्दल त्याला विचारावनी ते घाबरतत. 46 नंतर आपल्यासमं मोठा कोण याजवरीन त्यासामं वाद सुरु व्हयना. 47 येशूनं त्यासने अंतकरणमधला विचार ओळखी एके बाळकला ल्हीना आन त्याला आपले जवळ उभा करणा; 48 मग त्यान्ह त्यासाला आखणा; जा कोण्ही हे बाळना मान्हे नावनं स्वीकार करं तो मान्हा स्वीकार करं, आन जा कोण्ही मान्हा स्वीकार करं तो ज्यान्ह मला पाठवना त्यान्हा स्वीकार करं, कारण तुम्हामं जो कोण्ही कनिष्ठ आसं तोच श्रेष्ठ आसं. 49 योहानन आखणा, गुरुजी, आम्हू एके माणुसला तुम्ह्ने नावनं भूतं काढतानी जोध्या; तव्हा आम्हू त्याला मनाई कऱ्या, कारण तो आम्ह्ने बरोबर तुम्हाला आनुसरं नाहा. 50 येशूनं त्याला आखणा, त्याला मनाई करू नका; कारण जो तुम्हाला प्रतिकूल नाहा तो तुम्हाला अनुकूल आसं. 51 पुढ आसा व्ह्यना का, त्याना वर ल्हेवानी काळ जवळ वन्हां तव्हा त्यान्ह येरुश्लेमला जावानी दृढनिश्चयनं तिकडं आपला तोंड फिरवणा. 52 त्यान्ह आपले पुढ निरोपे पाठवणा; तव्हा ते निघी त्याने साठी तयारी करवानी शोमरोनने ऐके गावमं गयत; 53 पण त्यासं त्यान्हा स्वीकार कऱ्या नाहा, करण त्यान्हा रोख येरुश्लेमत्याव जावनी आसनाल. 54 हाय जुई त्यान्ह शिष्य याकोब व योहान यासं आख्या, प्रभुजी, ' आकाशमहीन अग्नी पडी' त्यासना नाश व्हवा म्हणी आम्हू आज्ञा करवा, आशी आपली इच्छा आसं का? 55 त्यान्ह वळी त्यासाला धमकावणा. 56 मग ते दुसरे गावमं गयत. 57 तव्हा आसा व्ह्यना का, ते वाटनं चालत आसतानी कोण्हतरी एकानं त्याला आखणा, आपण जय कय जासाल तय मय आपले माघ येणार. 58 येशूनं त्याला आखणा, खोकडासला बीळं आन आकाश मधले पाखरासला घरटं आसत; परंतु मनुष्यने पुत्रला डोका टेकवानी ठिकाण नाहा. 59 त्यान्ह दुसरे एकाला आखणा, मान्हे माघ ये; परंतु त्यान्ह आखणा, प्रभुजी, आधी मला मान्हे बापला पुरवानी जाऊ द्या. 60 त्यान्ह त्याला आखणा, मेलेल्यासला आपले मेलेल्यासला पुरू द्या; तू जाई देवने राज्यनी घोषणा कर. 61 त्यावर आणखी एकानं आखणा, प्रभू मय आपले माघ येणार; पण आधी मला मान्हे घरचासना निरोप ल्हेऊ द्या. 62 येशूनं त्याला आखणा, जा कोण्ही नांगरला हात घातल्यावर माघ जोय तो देवने राज्यला उपयोगी नाहा.