बहत्तर शिष्यसनी कामगिरी व त्यास्ना पुनरागमन 1 यान्हे नंतर प्रभूनं आणखी बहात्तर जणासला नेमी जे जे नगरमं आन जे जे ठिकाणी तो स्वता जाणार आसनोल तय दोघ दोघ आसं त्यासाला आपले पुढं पाठवणा. 2 तव्हा त्यान्ह त्यासाला आखणा, पीक फार आसं पण कामकरी थोडं आसत; म्हणी पीकने मालकनं आपले पीकने साठी कामकरी पाठवावा म्हणी त्यान्ही प्रार्थना करा. 3 जा; लांडगासमं जसं कोकर तसा तुम्हाला मय पाठवत ऱ्हइत, पाहा. 4 पिशवी, झोळी किवा पायताण संग ल्हेऊ नका; वाटनं कोणाला मुजरा करू नका. 5 जे कोणते घरमं जासाल तय, हे घरला शांती आसो, आसा आधी आखा. 6 तय कोण्ही शांतीप्रिय माणूस आशी तर तुम्ह्नी शांती त्याजवर रही; आन नसणा तर तुम्हात्याव ती परत यीही. 7 तेच घरमं वस्ती करी ते जा दित ता खातपीत रहा, कारण कामकरी आपले मजुरीला योग्य आसं. घरं बदलू नका. 8 कोणतेही नगरमं तुम्हू गयत आन त्यासं तुम्ह्ना स्वागत कऱ्या तर ते जा वाढीत ता खा. 9 तय जे दुखणाईमं आशीत त्यासाला बरा करा व त्यासला आखा का, देवना राज्य तुम्ह्ने जवळ वन्हां आसं. 10 तुम्हू कोणतेही गावमं गयत आन त्यांस तुम्ह्ना स्वागत कऱ्या नाहा तर तयले रस्तावर बाहेर जाई आसा आखा: 11 आम्ह्ने पायला लागलेली तुम्ह्ने गावनी धूळ पण तुम्ह्नी तुम्हाला परत झटकी टाकत; तथापि हाय लक्षांमं ठेवा का, देवना राज्य जवळ वन्हां आसं. 12 मय तुम्हाला आख, ते गाव पेक्षा सदोमला ते दिवस सोपा जाही. 13 हे खोराजिना, तुन्ही केवढी दुर्दशा व्हणार! हे बेथसदा, तुन्ही केवढी दुर्दशा व्हणार ! कारण तुम्हामं जी पराक्रमासनी कृत्य घडणत ती सोर व सिदोन यासमं घडतत तर त्यासं माघच गोणताट व राख आंगवर ल्ही बसी पश्चाताप कऱ्या आसता. 14 यान्हेमूळं न्यायने वेळेस तुम्ह्ने पेक्षा सोर व सिदोन यासाला सोपा जाही. 15 हे कफर्णहुमा, ' तू आकाश पर्यंत चढवी जाहीस का? तू आधोलोकास पर्यंत उतऱ्हीस'. 16 जो तुम्ह्ना ऐकं तो मान्हा ऐकं; जो तुम्ह्ना अव्हेर करं तो मान्हा अव्हेर करं; आन जो मान्हा आव्हेर करं तो ज्यान्ह मला पाठवीत त्यान्हा आव्हेर करं. 17 नंतर ते बहात्तरजण आनंदन परत यी आखनत, प्रभुजी आपले नाववार भुतं पण आम्हाला वश व्हत. 18 तव्हा त्यान्ह त्यासाला आखणा, सैतान आकाशमहीन वीजने सारखा पडणा हाय मह्य जोह्यना. 19 पहा, मय तुम्हाला साप आन विंचू यासाला तुडवानी आन शत्रूने सगळे शक्तीवरचा अधिकार दिन्हा आसं, तुम्हाला काहीएक बाधा व्हणार नाहा. 20 तथापि भूतं तुम्हाला वश व्हत यान्हा आनंद मानू नका; तर तुम्ह्नं नावं स्वर्गामं लिहलेलं आसत यान्हा आनंद माना. 21 तेच घटकाला तो पवित्र आत्मामं उल्लसित व्हई आखणा, हे पिता, स्वर्गाना व पृथ्वीने प्रभू, मय तुन्हां स्तवन करं; कारण ज्ञानी आन विचारवंत यासापहिन ह्या गोष्टी गुप्त ठेवी त्या तुन्ह बाळकास प्रगट करणा आसस; हा, पिता, कारण तुला आसाच योग्य दिसणा आसं. 22 मान्हे पितानं सगळा काही मान्हे स्वाधीन करणा आसं; पुत्र कोण आसं हाय पिता वाचून कोणालाच माहित नाह; आन पिता कोण आसं हाय पुत्रवाचून व ज्याला तो प्रगट करवानी पुत्रनी ईच्छा आसही त्यान्हे वाचून कोणालाच ठाऊक नाहा. 23 मग शिष्यासत्याव वळी त्यान्ह त्यासाला एकांती आखणा, तुम्हू जा जोत ऱ्हहीत ता जोन्हारं डोळं धन्य होत; 24 मय तुम्हाला आख, तुम्हू जा जोत ऱ्हहीत ता जवानी पुष्कळ संदेष्टासं व राजासं ईच्छा बाळग्या तरी त्यासाला जवानी मिळणा नाहा; आन जा तुम्हू ऐकत ऱ्हइत ता ऐकवानी इच्छा बाळग्या तरी त्यासाला एकवानी मिळणा नाहा. 25 मग पहा, कोण्ही एक शास्त्री उभा ऱ्हयना आन त्यान्ही परीक्षा जवानेसाठी आखणा, गुरुजी, का केल्यानं मला सार्वकालिक जीवन हाय वतन मिळही? 26 त्यान्ह त्याला आखणा, नियमशास्त्रामं का लिहलेला आसं? तुन्हे वाचनामं का वन्हां आसं? 27 त्यान्ह उत्तर दिन्हा, 'तू आपला देव परमेश्वर याजवर संपूर्ण मननं, संपूर्ण जीवनं, संपूर्ण शक्तीनं' व संपूर्ण बुद्धीनं 'प्रीती करं', आन 'जशी आपल्यावर तशी आपले शेजाऱ्यासवर प्रीती करं'. 28 त्यान्ह त्यला आखणा, ठीक उत्तर दिन्हास; हायच करं म्हणजी जगहीस. 29 पण स्वताला नीतिमान ठरवी ल्यावा आशी इच्छा धरी त्यान्ह येशूला आखणा, पण मान्हां शेजारी कोण? चांगले शोमरोनना दृष्टांत 30 येशूनं उत्तर दिन्हा, एक माणूस येरुश्लेमवरीन खाली यरीहोला जात आसतानी लुटारूसने हाती सापडणा; त्यासं त्यान्ह कपडं काढी त्याला मार पण दिध्या आन त्याला आर्धमेला टाखी ते निघी गयत. 31 मग ऐक याजक सहज ते वाटनं खाली जात ऱ्हयनाल, तो त्याला जुइ दुसरे बाजूनं चालता व्ह्यना. 32 तसाच एक लेवी पण ते ठिकाणी वन्हां आन त्याला जुइ दुसरे बाजूनं चालता व्ह्यना. 33 मग एक शोमरोनी ते वाटनं जात आसतानी, तो आसनाल तय वन्हां आन त्याला जूइ त्याला त्यान्हा कळवळा वन्हां; 34 त्यान्ह जवळ जाई त्यान्हे जखमासला तेल व द्राक्षरस लावी त्या बांधणा आन त्याला आपले जनवारवर बसवी उतारशाळामं आणणा आन त्यान्ही काळजी ल्हीना. 35 दुसरे दिवस त्यान्ह दोन रुपय काढी उतारशाळाने रक्षकला दी आखणा, यान्ही काळजी ल्हे; आन यान्हे पेक्षा जा काही अधिक खर्चीस ता मय परत आल्यावर दिसू. 36 तर लुटारूसने हाती सापडलेला माणूसना शेजारी हे तिघास पैकी तुन्हे मतानं कोण व्ह्यना? 37 त्यान्ह आखणा, त्याजवर दया करणा तो. येशूनं त्याला आखणा, जा आन तू पण तसाच करं. 38 मग ते पुढ जात आसतानी तो ऐके गावमं वन्हां; तव्हा मार्था नावने एक स्त्रीनं त्यासना आपले घर स्वागत करनी. 39 तीला मारिया नावनी एक बहीण आसनेल, ती पण प्रभूने चरणपण बशी त्यान्हां भाषण ऐकत रहिनी. 40 तव्हा मार्थाला फार काम पडल्यामुळं तिन्ही तारांबळ उडनी आन ती पुढ यी आखणी, प्रभुजी मान्हे बहीणनं मान्हे एकटीवर कामनां भार टाकणी आसं, यान्ही आपल्याला पर्वा नाहा का? मला मदत करवानी तिला आखा. 41 प्रभूनं तिला उत्तर दिन्हा, मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टीने विषयी काळजी आन दगदग करसं; 42 पण थोडकेच गोष्टीना, किंबहुना एकेच गोष्टीना अगत्य आसं, मरीयानं चांगला वाटा निवडी ल्हीत, तो तीसपहिन काढी ल्हीला जाणार नाहा.