अध्याय ११

प्रभूनी प्रार्थना 1 मग असा व्ह्यना का, तो ऐके ठिकाणी प्रार्थना करत ऱ्हयनाल; ती त्यान्ह संपवल्यावर त्यान्हे शिष्यसमधले एकानं त्याला आखणा, प्रभुजी जसा योहानन आपले शिष्यासला प्रार्थना करवानी शिकवना तसा आपणही आम्हाला शिकवा. 2 त्यान्ह त्यासाला आखणा, तुम्हू प्रार्थना कराल तव्हा आसा आखा: हे पिता, तुन्हां नावं पवित्र मानला जावो; तुन्हां राज्य येवो; 3 आम्ह्नी रोजनी भाकर रोज आम्हाला दे; 4 आणि आम्हाला आम्ह्ने पापासनी क्षमा कर, कारण आम्हूही आपले प्रत्येक ऋण्याला क्षमा करत; आणि आम्हाला परीक्षामं आणू नको. 5 मग त्यान्ह त्यासाला आखणा, तुम्हांमं असा कोण आसं का त्याला मित्र आशी तो त्याजत्याव मध्यरात्री जाई त्याला आख, मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे; 6 कारण मान्हा एक मित्र प्रवासवरीन मजत्याव वन्हां आसं आन त्याला वाढवानी मजत्याव काही नाहा; 7 आन तो मधून उतर दीही, मला त्रास देऊ नको; आता दार लावेल आसं व मान्ह मुलं मान्हे जवळ झोपेल आसं; मय उठी तुला देऊ शकत नाहा. 8 मय तुम्हाला आख, तो त्यान्हां मित्र आसं यान्हेमूळं जरी उठी त्याला देणार नाहा तरी त्यान्हे आग्रह मुळं त्याला पाहिजे तेवढ्या भाकरी तो उठी त्यला दीही. 9 मय तुम्हाला आख, माघा म्हणजी तुम्हाला दिला जाही; शोधा म्हणजे तुम्हाला सापडी; ठोका म्हणजी तुम्ह्ने साठी उघडला जाही. 10 कारण जा कोणी माघ त्याला मिळं, जा कोणी शोध त्याला सापडं, जा कोणी ठोकं त्यान्हे साठी उघडला जाही. 11 तुम्हामं असा कोण बाप आसं का जा, आपले मुलनं मासा माघीतला असता त्याला मासा ना देता साप दीही? 12 किंवा अंडा माघीतला असता त्याला विंचू दीही? 13 तुम्हू वाईट असतानी पण तुम्हाला आपले मुलांसला चांगल्या देणग्या देवानी कळं, तर मग स्वर्गीय पिताने जवळ जे मागत त्यासाला तो किती विशेष करी पवित्र आत्मा दीही? 14 एकदा तो एक भूत काढत ऱ्हयनाल व ता मुका आसनाल. तव्हा आसा व्ह्यना का, भूत निघल्यावर मुका बोलू लागणा; तेवरीन लोकसमुदायला आश्चर्य वाटणा. 15 पण त्यामधलं कित्येकांसं आख्या, भूतासना अधिपती जा बालजबुल त्यान्हे साहाय्यान हाय भूतं काढं 16 आन दुसरं कित्येकजण त्यान्ही परीक्षा जवानेसाठी त्यासत्याव स्वर्गीय चिन्ह मागू लागणत; 17 परंतु त्यान्ह् त्यासने मनमधल्या कल्पना ओळखी त्यासाला आखणा, आपसामधलं फुट पडलेलं प्रत्येक राज्य ओसाड पडं, आन घरवर घर पडं. 18 सैतानमं पण फुट पडनी तर त्यान्हां राज्य कसा टिकही? कारण मय बालजबुलने सहाय्यान भूत काढ आसा तुम्हू आखत. 19 पण मय जर बालजबुलने सहाय्यान भूत काढत आशी, तर तुम्ह्न लोकं कशाने सहाय्यान काढत? यान्हेमूळं तेच तुम्ह्ना न्याय करहीत. 20 परंतु मय जर देवने सामर्थ्यनं भूतं काढत आसं, तर देवना राज्य तुम्हावर वन्हां आसं. 21 सशस्त्र व बलवान मनुष्य आपले वाडाना राखाण करत असता त्यान्ही मालमता सुरक्षीत ऱ्हय; 22 परंतु त्यान्हे पेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याजवर यी त्याला जिंक, तव्हा जे शस्त्रसामग्रीवर त्यान्ह् भिस्त ठेवनाल ती तो ल्ही जाय आन त्यान्ही लुट वाटी टाकं. 23 जो मला अनुकूल नाहा तो मला प्रतिकूल आसं; आन जो मान्हे संग गोळा करं नाहा तो उधळं. 24 मनुष्य महीन अशुद्ध आत्मा निघणा म्हणजी तो निर्जलस्थळमहीन विश्रांतीना शोध ल्हेत हिडं आन ती ना मिळणी म्हणजी आख, जे मान्हे घर महीन मय निघणा त्याजमं परत जायसू. 25 आन तो आल्यावर ता झडलेला आन सुशोभित केलेला त्याला दिसं. 26 नंतर तो जाई आपले पेक्षा दृष्ट आसं सात आत्मं बरोबर ल्हेय; आन ते आत शिरी त्य ऱ्हत; मग ते मनुष्यानी ती दशा पहिले पेक्षा वाईट व्ह्य. 27 मग आसा व्ह्यना का, तो ह्या गोष्टी बोलत आसतानी लोकसमुदायमधले कोण्ही एक स्त्री त्याला मोठे आवाजमं आखणी, जे उदरनं तुन्हां भार वाह्यना व जे स्तनं तुन्ह चोखनास ते धन्य. 28 तव्हा त्यान्ह आखणा, पण तेपेक्षा जे देवना वचन ऐकत व पाळत तेच धन्य. 29 तव्हा लोकसमुदाय त्यान्हे जवळ एकत्र जमत असता तो आसा आखू लागणा, हाय पिढी दृष्ट पिढी आसं, हाय चिन्ह माघं; परंतु योनाने चिन्हांस शिवाय हिला दुसरा चिन्ह दिला जाणार नाहा. 30 कारण जसा योना निनवेकरासला चिन्ह व्ह्यना तसा मनुष्यना पुत्र हे पिढीला व्हइ. 31 दक्षिणकड्नी राणी न्यायकाळी हे पिढीने लोकास्नेबरोबर उठी त्यासाला दोषी ठरवी; कारण शलमोनना ज्ञान ऐकवानी ती पृथ्वीने सीमापहिन वन्ही; आन ज्वा, शलमोनने पेक्षा थोर आसा एक उथी आसं. 32 निनवेनं लोकं न्यायकाळी हे पिढीने बरोबर उभं ऱ्हइ हिला दोषी ठरवीत; कारण त्यासं योनाने उपदेशवरीन पश्चाताप कऱ्या; आन ज्वा, योनाने पेक्षा थोर आसा उथी आसं. 33 दिवा लावी तळघर किंवा मापने खाली कोण्ही ठेवं नाहा, तर आत येणारासला उजेड दिसावा मन्ही दिवठणीवर ठेवत. 34 तुन्हे शरीरना दिवा तुन्हां डोळा होय; तुन्हां डोळा निर्दोष आसना तर तुन्हां सगळा शरीर प्रकाशमय आसं; सदोष आसना तर तुन्हां सगळा शरीर अंधकारमय आसं. 35 म्हणी तुजमधला प्रकाश अंधार तर नाहा न, हाय जो. 36 तुन्हां सगळा शरीर प्रकाशमय आशी आन त्यान्हां कोणताही भाग अंधकारमय नसही, तर दिवा आपले उज्ज्वल ज्योतीनं तुला प्रकाश मय करं ते प्रमाणं ता पूर्णपणी प्रकाशमय व्हइ 37 परुशी व शास्त्री यास्ना निषेध तो बोलत आसं इतकामं ऐके परुशीन त्याला आपल्यात्याव भोजन करवानी येवानी विनंती करणा, मग तो मधी जाई भो नला बसना. 38 त्यान्ह् भोजनने आधी हातपाय धुतना नाहा आसा जुही परुशीला आश्चर्य वाटणा; 39 परंतु प्रभूनं त्याला आखणा, तुम्हू परुशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करत; पण तुम्ह्ना आतमधला भाग जुलूम व दृष्टपणा याजवार भरणा आसं 40 आहो निर्बुद्ध माणसासवो, ज्यान्ह बाहेरचा भाग करणा, त्यान्ह् आतमधला भागपण करणा नाहा का? 41 तर जा आत आसं त्यान्हां दानधर्म करा म्हणजी ज्वा, सगळा तुम्हासला शुद्ध आसं. 42 परंतु तुम्हा परुश्यासनी केवढी दुर्दशा व्हणार ! कारण तुम्हू पुदिना, सताप व प्रत्येक भाजी यास्ना द्शांश देत, पण न्याय व देवनी प्रीती याजकड दुर्लक्ष करत; ह्या गोष्टी करवानी आसनाल्यात, व त्या सोड्वानी नसणाल्यात. 43 तुम्हा परुश्यासनी केवढी दुर्दशा व्हणार ! कारण सभास्थानमं श्रेष्ठ आसनं व बाजारमं नमस्कार ल्हेवानी तुम्हाला आवडाय. 44 तुम्ह्नी केवढी दुर्दशा व्हणार ! कारण तुम्हू न दिसणारे कबरासने सारखं आसत, त्यान्हे वरून माणसं न समजता चालत. 45 तव्हा शास्त्र्यासपैकी कोण्ह एकानं त्याला आखणा, गुरुजी, तुम्हू आसा बोली आम्ह्नीपण निंदा करत. 46 त्यान्ह् आखणा, तुम्हा शास्त्र्यासनी केवढी दुर्दशा व्हणार ! कारण वाव्हानी आवघड आसं ओझी तुम्हू माणसासवर लादतं, आन स्वता मात्र एकबोट पण ते ओझासला लावत नाहा. 47 तुम्ह्नी केवढी दुर्दशा व्हणार ! कारण तुम्हू संदेष्टासनी थडगी बांधत आन त्यासाला तर तुम्ह्ने पूर्वजासं जीवं माऱ्या ! 48 तुम्हू साक्षीदार आसत आन आपले पूर्वजासने कृत्यासला अनुमती देत, कारण त्यासं तर त्यासाला जीवचं माऱ्या व तुम्हू त्यासनी थडगी बांधत. 49 हे कारणनेमूळं देवने ज्ञाननं पण आखणा, मय त्यासात्याव संदेष्टं व प्रेषित पाठवसुक, आन त्यासा मधले कित्येकासला ते जीवं माऱ्हीत व कित्येकासला छळीत, 50 हेसाठी का, जगने स्तापनेपहिन ते संदेष्टासना रक्त, 51 म्हणजी हाबेलने रक्तपहिन वेदी व पवित्र स्थान यासामं जे जखऱ्याना घात व्ह्यना त्यान्हे रक्तपर्यंत जा रक्त पडला गया त्यान्हां हिशोब हे पिढीपहिन ल्हीला जावा. होय मय तुम्हाला आख, त्यान्हां हिशोब हे पिढीपहिन लीध्या जाईलच. 52 तुम्हू शास्त्र्यासनी केवढी दुर्दशा व्हणार ! कारण तुम्हू ज्ञाननी किल्ली ल्ही गयत, तुम्हू स्वतः आत गयत नाहा व जे आत जात ऱ्हयनलत त्यासाला तुम्हू प्रतिबंध कऱ्या. 53 तो तहीन बाहेर आल्यावर शास्त्री व परुशी त्यान्हे आंगवर रागमं यी त्यान्ह् पुष्कळ गोष्टी विषयी बोलवा म्हणी त्याला डिवचू लागणत; 54 आन त्यान्हे तोंडमहीन काही निघल्यावर त्याला बोलणामं धरवा म्हणी ते टपी ऱ्हयनत.