शाताधीपतीना चाकर 1 जव्हा येशून लोकास्ने बरोबर बोलना थांबवना, तो कफर्णहुम नगरमं गया. 2 ते नगरमं एक रोमी शताधीपती आसनाल, त्यान्हां एक प्रिय दास आसनाल. हाय दास इतका आजारी आसनाल कि तो मरणार आसनाल. 3 जव्हा शतपतीन येशूने बद्दल ऐकना, त्यान यहूदामधले काही वडिलासला येशूतयाव विनंती करवानी पाठवणा का यी त्यान्हे दासला बरा कर. 4 जव्हा ते येशुत्याव वन्ह्त, शतपतीने दासला मदत करवानी त्यासं आग्रहवार विनंती कऱ्या. त्यासं आख्या, “त्यान्हे साठी हाय करवा यान्हे योग्य तो आसं. 5 कारण तो आम्ह्ने लोकासवर प्रेम करं आन आम्ह्ने साठी त्यान सभास्थान बांधणा. 6 येशू त्यास्ने संग अधिकारीने घर जावानी निघणा. येशू पोहचणारच आसनाल, अधिकारीन काही मित्र हाय संदेश ल्ही येशुत्याव वन्ह्त, “प्रभू आणखी त्रास ल्हेवू नका, तू मान्हे घर यावा हे योग्य मय नाहा. 7 म्हणी मयं तुसत्याव येवानी विचार करणा नाहा. फक्त एक शब्द बोली तू मान्हे दासला बरा करू शकस 8 मला हाय माहित आसं का तू हाय कऱ्हीस. कारण मे मान्हे आधीकारीना ऐक, आन मला पण शिपाई असत जे मन्हा ऐकत, एकाला आखणा जा, “तर तो जाय, आन दुसराला आखणा, ये तर तो येय. मान्हे दासला आखणा, "हाय करं! तर तो ता करं". 9 आधीकारीन शब्द ऐकी, येशू आचंबित व्ह्यना. जो समुदाय त्याने संग आसनाल, त्यासात्याव फिरी आखणा, “मय तुम्हाला आखं, आसा विश्वास इस्रायलन मजवर ठेवणा नाहा. 10 जे लोकं आधीकारीने घर परत वन्ह्त, त्यासं दासला बरा झालेला जोध्या. 11 ते नंतर, येशू नाईन नावने गावला निघणा. त्यान शिष्य आन मोठा लोकसमुदाय त्यान्हे संग आसनाल. 12 येशू नगरने प्रवेशदार पण गया, नगरमहीन मोठा समुदाय बाहेर येतानी त्यासं जोध्या, जा मेलेले माणूसला बाहेर ल्ही चालनलत. त्यानी आई विधवा आसनेल, तो तिन्हा एकुलता एक मुलगा आसनोल. ती समुदायने संग आसनेल ते तीन्हे पोऱ्याला पुरवानी ल्ही चालनलत. 13 प्रभूनं तिला जोयना, त्याला तिन्ही दया वन्ही आन तिला आखणा, “रडू नको !” 14 येशू जवळ गया आन तिरडीला हात लावणा, ज्यावर तो ठेवलेला आसनाल. जे लोकं त्याला खांदावर ल्ही चालनलत ते स्थिर उभं ऱ्हयनत. येशुनं आखणा, “मुला उठ!” 15 तो माणूस उठणा आन बोलू लागणा ! नंतर येशुन त्याला त्यान्हे आईसत्याव परत दिन्हा. 16 ते सगळासला भय वाटणा. ते देवनी स्तुती करू लागणत आन एकमेकासला आखू लागणत, “आम्हामं महान भविष्यवक्ता वन्हां आसं!”आन आपले लोकासनी काळजी ल्हेवानी देव वन्हां आसं. !” 17 येशुनं जा काम करणाल, ता सगळे यहुदिया प्रांत व आजूबाजूने भागमं माहित व्ह्यना. 18 बाप्तिस्मा करणारे योहानने शिष्यासं या सगळ्या गोष्टी त्याला आख्या. 19 म्हणी योहानन आपले दोन शिष्यासला बोलवणा आन येशूला विचारवानी पाठवणा; “देवनं पाठवलेला तो तूच आसस, का आम्हू दुसरानी वाट जवा? ” 20 ते दोन शिष्य येशूत्याव वन्ह्त, त्यासं आख्या, “बाप्तिस्मा करणारे योहानन आम्हाला तुला विचारवानी पाठवणा आसं, “देवनं पाठवलेला तो तूच आसस का, अम्हू दुसरानी वाट जवा"? 21 तव्हा येशू पुष्कळ लोकासला बरा करत ऱ्हयणाल, आन मोठं आजार आन वाईट आत्मासपहीन लोकासला बरा करता. अनेक आंधळ लोकं बरं व्हइ जोतत. नंतर ते दोन योहानने शिष्यासला येशुनं आखणा, 22 "परत जाई तुम्हू जा जोध्या ता योहानला जाई आखा. आंधळं जोत ऱ्हइत, लंगडं चालत. कोडी बरं व्हत. बहिरं आता ऐकत, मेलेलं आता परत जिवंत व्हत ऱ्हइत. आन गरिबासला सुवार्ता आखली जाय 23 आन त्याला आखा, “देव त्यासाला आशीर्वाद देय जे मजवर शंका करत नाहा. 24 योहानन पाठवलेलं शिष्य परत गयत, तव्हा येशू लोकास्ने समुदायला आखणा, ”तुम्हू का जवानी रानमं गयलत? वारानं हालवलेला बोरू का? 25 तुम्हू का जवानी तय गयलत? सुंदर कपडं लावलेले माणुसला का? ते तर राजाने महालम रहत. 26 मग तुम्हू का जवानी तय गयलत, भविष्यवक्ता का? हा योहान भविष्यवक्ता पेक्षा पण मोठा आसं. 27 हा तो योहान आसं ज्यान्हे बद्दल भविष्य वक्तासं लिहलेला आसनाल, ज्वा मय मान्हे दुतला पुढ पाठवं, जो तुन्हे साठी लोकासला तयार करं 28 मय तुम्हाला आखं, जे लोकं जन्मीत त्यासमं योहानने पेक्षा मोठा कोण नाहा, तरी देवने राज्याम जो आसं तो योहानने पेक्षा मोठा आसं. 29 जव्हा जकातदार आन सगळे लोकांस येशुना ऐक्या, त्यासं देवला न्यायी ठरव्या, कारण त्यासं योहान पहिन बाप्तिस्मा लीध्याल. 30 पण परुशी आन शास्त्री यासं त्यान्हे जवळून बाप्तिस्मा ना ल्ही, आपले विषयी देवनी ईच्छा नाकाऱ्या. 31 येशूनआखणा, हे पिढीनं लोकं कोणते प्रकारन आसत, ता मय तुम्हाला आखं, 32 तुम्हू ते पोऱ्याने सारखं असत जा मोकळे जागामं खेळत ऱ्हइत, आन आखत आम्हू तुम्ह्ने साठी आनंदना गाणा आख्या आन तुम्हू नाचणं नाहात, आन आम्हू तुम्ह्ने साठी दुखःना गाना आख्या, आन तुम्हू रडनत नाहा. 33 योहान न खाता आन न पिता वन्हां आन तुम्हू त्यान्हा नकार कऱ्या आन आख्या त्याला द्रुष्ट आत्मा लागीत. 34 मनुष्यना पुत्र न खाता आन न पिता वन्हां, त्यान्हां पण तुम्हू नकार कऱ्या, आन आख्या हाय खादाड आन मद्यपी आसं, 35 पण देवना ज्ञान त्यान्हां पालन करणारं प्रगट करत. 36 एक दिवस ऐके परुशीनं ज्यान्हा नाव शिमोन आसनाल, येशूला जेवानी घर बोलवणा. म्हणी येशू त्यान्हे घर जेवानी बसणा 37 ते नगरमं एक पापी स्री आसनेल. जीला सगळं लोकं ओळखतत. येशू ते परुशीने घर आसं हाय ऐकी ती त्यान्हे घर गयी. 38 येशूने पायपण उभी ऱ्हइ रडवा लागणी, आश्रूवार पाय भीजवी आन आपले केसासवार पुसू लागणी. आन येशूने पायना पुष्कळ चुंबन ल्हिनी आन त्यान्हे पायला सुगंधी त्याल लावनी. 39 जव्हा पारुष्यसं हाय जोध्या का ती स्री का करत ऱ्हइत, तो मनमं विचार करू लागणा, “जर हाय भविष्य वक्ता आसनाल तर हाय ओळखता का जी स्री पायला स्पर्श करत ऱ्हइत ती कोण आसं, म्हणजी पापी आसं" 40 येशून त्याला आखणा, ”शिमोन मला तुन्हे संग काही बोलावणी आसं, त्यान आखणा का गुरुजी? ” 41 येशून त्याला हि गोष्ट आखणा, “एके सावकारन दोन देणेदार आसनलत, एकानं पाचशे चांदीन शिक्क व दुसरान पन्नास चांदीन शिक्क ल्हीनाल. 42 ते दोघं पण देवाणी समर्थ नसनलत, म्हणी सावकारन दया करी त्यासाला कर्ज माफ करणा. तर मग मला आखं, त्यासा मधला कोण जास्त ते सावकारवर प्रेम करही? 43 "शिमोनन आखणा, “मला वाटं, ज्यान जास्त पैसा उधार लीन्हाल, तो जास्त प्रेम करही. “येशूनं त्याला आखणा ", तू बरोबर आसस. 44 येशू ते स्रीत्याव वळी शिमोनला आखणा, ” विचार कर हे स्र्त्रीनं का करनी आसं, मय तुन्हे घर वन्हां, आन जसं पाहुणासना स्वागत यजमान करत, तसा तुन्ह करना नाहां. तुन्ह मला पाय धुवानी पाणी दिन्हा नाहा, पण यीन्ह आपले आश्रूवार मान्हः पाय धुवणी, आन केसासवार पुसनी 45 तुन्ह मला आलिंगन दिन्हा नाहा, पण जव्हा पहिन मय उथी यीत, तिन्ह मान्हे पायना चुंबन ल्हेवानी थांबवनी नाहा. 46 तुन्ह मान्हे डोकाला जैतूनना त्याल लावणा नाहा, तिन्ह मान्हे पायला सुगंधी त्याल लावनी. म्हणी मय तुला आखं, 47 तिन्ह जे पुष्कळ पाप क्षमा व्हयनत. कारण तिन्ह पुष्कळ प्रेम करणी. पण जो माणूस विचार करं का त्यान पाप कमी आसत त्यान कमी पाप क्षमा व्हत, व तो मजवर खूप कमी प्रेम करं. 48 येशुनं ते स्त्रीला आखणा, “तुन्हे पापनी क्षमा व्ह्यनी आसं" 49 जे त्यान्हे संग जेवानी बसनलत, ते त्यासाम आखू लागणत, “हाय कोण आसं, जो पापनी क्षमा करं? 50 पण येशुनं ते स्त्रीला आखणा, “ तुन्ह मजवर विश्वास करनी म्हणी देवन तुला सोडवना आसं. ” शांतीनं जा!.