अध्याय ६

शब्बाथना पालन 1 मग एके शब्बाथने दिवस आसा व्ह्यना का, येशू त्यान्हे शिष्यास्ने संग कणसासने शेत महीन जात असता, त्यान्हे शिष्यासं काही कणसं मोड्या व हातवर चोळी खाऊ लागनत. 2 काही परुशी हाय सगळा जोही, आख्या, “ शब्बाथने दिवस तुम्हू हाय करणा योग्य नाहा? 3 येशून त्यासाला आखणा, असा शास्रामं लिहलेला नाहा का, दावीद राजा आन त्यान्हे संग आसलेले लोकासला भूक लागणी तव्हा त्यासं का कऱ्या ! 4 हाय तुम्हाला माहित आसं, का तो मंदिरम गया आन मोशेने नियमनुसार तो देवला आर्पण केलेली भाकर, याजकच खाऊ शकं त्या स्वता खायनां आन इतरासला पण खावानी दिन्हा. 5 येशून त्यासाला आखणा, आशे प्रकारे मनुष्यने पुत्राला अधिकार आसं. जा लोकास्नेसाठी योग्य आसं ता शब्बाथने दिवस करवा ! 6 नंतर दुसरे दिवस, येशू सभास्थानम लोकासला शिकवत आसतानी तय उजवा हात सुकलेला आसा एक माणूस आसनाल. 7 तव्हा येशू शब्बाथने दिवस रोग बरा करं आन नियमना उल्लंगण करं का, हाय जोवान्ही परुशी त्याजवर दोष लावानी तयार आसंनलत. 8 पण येशून त्यास्न विचार ओळखी, त्यान ते मानुसला आखणा, “उठ आन मधी उभा ऱ्ह !”मग तो उठी उभा ऱ्हयना. 9 मग येशून त्यासाला आखणा, “मे तुम्हाला विचारं, मोशेने नियमनुसार शब्बाथने दिवस लोकासला बरा करणा बरा आसं का वाईट आसं. शब्बाथने दिवस जीव वाचवानी योग्य का नाश करवानी? 10 कोणीही त्याला उत्तर देऊ शकणा नाहा. मग त्यान सगळासत्याव जोयन्हा. आन ते मानुसला आखणा "आपला सुकलेला हात लांब कर आन ते मानुस्न तसा करणा आन त्यान्हा हात पूर्ण बरा व्ह्यना. 11 पण धर्मिक पुढारी हाय जोही रागवणत, आन एकमेकासने संग बोली येशुना का करवानी हाय त्यसामं विचार करू लागनत. 12 ते दिवसमं येशू एकदा प्रार्थना करवानी डोंगरवर गया व रातभर देवणी प्रार्थना करत ऱ्हयना. 13 मग दुसरे दिवस त्यान सगळे शिष्यासला बोलवणा, व त्यासामहित बारा जनासला निवडी त्यासाला प्रेषित आसा नाव दिन्हा. 14 त्यसामधला शिमोन, हाय नाव पेत्रला दिन्हा व त्यान्हा भाऊ आंद्रिया, याकोब, योहान, फिलीप बर्थमय, 15 मत्य, थोमा, अल्फिना पुत्र याकोब, जीलोट म्हणजी शिमोन. 16 याकोबना पुत्र यहूदा आन जो पुढ द्रोही निघणा तो यहूदा इस्कर्योत. 17 येशू त्यास्ने संग खाली उतरी समतोल जागावं उभा ऱ्हयणा आन तय शिष्यासना मोठा समुदाय आसनाल. व सर्व यहुदिया व येरुश्लेममहित व सोर व सिदोन हे समुद्र किनारा पहित 18 त्यान्हा ऐकवानी व आपलं रोग बरा करी ल्हेवानी, जे लोकं वन्ह्त, त्यासना मोठा समुदाय आसनाल. तव्हा जे अशुद्ध आत्मासवार आसनलत, त्यासाला त्यान बरा करणा. 19 समुदाय मधला प्रत्येकजण त्याला स्पर्श करवानी जोता कारण त्यान्हे द्वारे लोकं बरं होतत. 20 त्यान्हे नंतर तो त्यान्हे शिष्यासत्याव जोत आखणा, “हाय आशीर्वादना आसं का तुम्हापैकी काही गरीब आसत, कारण देव त्यान्हा ताबा ल्ही. 21 तुम्हापैकी काही उपाशी आसत, हाय चांगला आसं का देव त्यास्नी गरज भागवी, हाय चांगला आसं कि तुम्हापैकी काही दुखी आसत, कारण ते आनंदवार हासीत. 22 हाय आशीर्वादना आसं कि लोकं तुम्ह्ना द्वेष करत, तुम्हाला नाकारत, व देवने पुत्रमूळं तुम्ह्ना नाव वाईट म्हणी घोषित करत. 23 हाय जव्हा घडी, तव्हा तुम्हू आनंदी व्हा ! कारण देवने जवळ तुम्ह्ने साठी मोठा बक्षीस आसं. हाय विसरू नका कि त्यासं तुम्ह्ने पूर्वजासना व देवने भविष्यवक्तासना अशीच दुर्दशा कऱ्या. 24 पण तुम्हू धनवानासनी केवढी दुर्दशा व्हणार कारण तुम्हाला तुम्ह्ना सुख मिळणा आसं. 25 हाय किती दुखाना आसं का तुम्हू आसा विचार करत का तुम्हू तृप्त व्हयनत. कारण तुम्हू जा आता हासत पण तुम्हाला दुखं व्हई व रडहित. 26 हाय किती दुखःना आसं कि लोकं तुम्ह्ने विषयी चांगला आखत. कारण आशे प्रकारे त्यासं तुम्ह्ने पूर्वजासमं जे लोकासला चांगला आखतत ते पैकी काही खोटे देवनं भविष्य वक्ता आसा ठरव्या. 27 मग मय तुम्हा सगळासला जे मान्हा ऐकत ऱ्हईत, त्यासाला आखं कि तुम्ह्ने मित्रने संग नाहा तर तुम्ह्ने वैरीने बरोबर प्रीती करां. जे तुम्ह्ना वैर करत त्यास्ने साठी चांगला करा! 28 जे तुम्हाला शाप देत त्यासाला आशीर्वाद द्या. जे तुम्ह्ना वाईट करत त्यास्ने साठी प्रार्थना करा. 29 जर कोण्ही तुम्ह्ना तिरस्कार करं तर आन ऐके गालवर मारत आशी तर त्याला तुम्ह्ना दुसरा गाल द्या. 30 जर कोण्ही तुम्ह्ना अंगरखा हिसकी लेत अशी तर त्याला तुम्ह्नी बंडी पण द्या. जो कोण्ही मागं त्यासाला द्या. जर कोनही तुम्हाला तुम्ह्नी वस्तु माघ तर त्याला, न परत ल्हेता दीही टाका. 31 लोकासं तुम्ह्ने संग जा वर्तन करवानी पाहिजे, तसाच दुसराने संग करा. 32 जर तुम्हू जे तुम्हावर प्रीती करत त्यसावर प्रीती करत तर देव तुम्ह्नी स्तुती करणार नाहा कारण पापी लोकं पण तसाच करत. 33 जर तुम्हू चांगला काम करत, जे तुम्ह्ने संग चागला करत तर दे तुम्हाला काही बक्षीस देणार नाहा, कारण पापी पण तसाच करत, 34 जर तुम्हू दुसरासला काही पैसं देत उधार देत व त्यासपहिन परत ल्हेवानी अपेक्षा करत, तर देवपहिन तुम्हाला काही बक्षीस मिळणार नाहा! कारण पापी लोकं पण आसाच करत. 35 पण तुम्हू शत्रूवर प्रीती करा! त्यास्ने साठी चांगला काम करा ! द्या आन परत ल्हेवानी अपेक्षा करू नका. तव्हा देव तुम्हाला मोठा बक्षीस दीही. तव्हा तुम्हू उंच देवनं लेकर म्हणी ओळखले जाणार कारण देव दयाळू आसं तो वाईट लोकासवर पण द्या करं. 36 म्हणी तुम्हू दुसरासने संग दयानं वागा, जसा स्वर्गीय पिता लोकासवर दयां करं. 37 तुम्हू लोकास्न्या चुका काढू नका मग देव पण तुम्ह्न्या चुका काढणार नाहा. दुसरासन दोष काढू नका म्हणजी तुम्ह्नं पण दोष काढलं जाणार नाहा. वाईट करणाऱ्यासला क्षमा करा म्हणजी देव पण तुम्हाला क्षमा करही. 38 चांगल्या वस्तू दुसरासला द्या, मग देव पण तुम्हाला चांगल्या वस्तू दीही. ता आशे प्रमाणे व्हई कि तो तुम्हाला जा काही देय ता एखादे पिशवीमं काही धान्य भऱ्या तर ता पूर्ण दाबी, हालवी शीग भरी असले पाहिजे! लक्षांम आसू द्या का जे मापवार आम्हू लोकासना न्याय करत व त्यासाला आशीर्वाद देत तसाच देव पण आम्ह्ने संग करहि. 39 मग त्यान त्यान्हे शिष्यासला एक दाखला दिन्हा. “एक आंधळा दुसरे आंधळे माणुसला मदत करू शकं नाहा. कारण आसा व्ह्यना तर ते दोघ पण खड्डाम पडहित. 40 शिष्य गुरूने पेक्षा मोठा नाहा, पण जव्हा तो पूर्ण प्रशिक्षित व्हई तर तो गुरुने सारखा व्हउ शकं, म्हणी तुम्हू मान्हेसारखा व्हा. 41 कजा तुम्हू दुसरासनं दोष लक्षांम ल्हेत आन आपलं दोष लपवत? त्यान्हा आसा कि दुसराने डोळा मधला मुसळ जोत आन आपले डोळा मधला कुसळ जोत नाहा. जर तुम्हू आसा करत तर तुम्हू ढोंगी असत! 42 आधी तुम्हू तुम्ह्ने डोळा मधला कुसळ काढा, मग दुसराना मुसळ ज्वा. ता आसा कि तुम्हू आधी स्वता पाप करवानी थांबवा मग दुसरासला पापी स्वभावमहित बाहेर काढाल. 43 सगळासला माहित आसं कि चांगला झाड वाईट फळ देय नाहा व वाईट झाड चांगला फळ देय नाहा. आन कोण्ही पण फळ जोही कोणते झाडना आसं ता समजू शकं. 44 उदा काटेरी झाड अंजीर देऊ शकं नाहा तसाच कोणताच झाड द्राक्षे देऊ शकं नाहा. तसाच कोणी एके मानुसणे कृत्यासला जोही तो कसा आसं हाय कळं. 45 चांगला माणूस जा चांगला काम करं त्यावर त्यान्ह चांगल विचार दिसी येत व वाईट माणूस वाईट काम करी वाईट विचार दिसी येत. मानुसणे मनंम जा काही आसं ता त्यान्हे बोलना व कामवरीत दिसी येय. 46 येशून लोकासला आखणा, 'तुम्हू मला प्रभू कजा आखत, ” जव्हा तुम्हू मय का आखं ता करत नाहा. 47 मला हाय आखू द्या का लोकं मान्हे जवळ येत, मान्हा शिक्षण ऐकत व पाळत. 48 ते कोणी एके घर बांधणारे मानुसणे सारखं असत, ज्यान्ह खोल खणी खडकवर पाया घालणा. त्यान हाय लक्षांम ल्हीना कि घरना पाया कठोर खडकवर घालवा. मग पूर वन्हा व लाटा वन्ह्या पण घरला हालू शकनत नाहा. कारण ता मजबूत बांधनाल. 49 पण काही लोकं जे मान्हा शिक्षण ऐकत व तसा करत नाहा, ते हे मानुसणे सारखा असत, जो आपला घर पाया न घालता बांध व नदीला पूर येय तव्हा, ते घरला लाग व ता घर पडी जाय.