अध्याय ५

1 एक दिवस आसा व्ह्यना कि सगळा लोकसमुदाय त्याने जवळ यी देवना वचन ऐकत असता गेनेसरेत सरोवरने किनारी उभा आसनोल. 2 तव्हा त्यान सरोवरने किनारे जवळ दोन नावा जोयन्हा कोणतरी खाली उतरी जाळं धूत ऱ्हयनाल. 3 ते पैकी एक शिमोनना आसनाल; त्याजवर तो बशी समुदायला शिक्षण देऊ लागणा. 4 जव्हा त्यान शिक्षण देवानी संपणा, त्यान शिमोनला आखणा खोल पाणीम नाव ल्हे आन मासं पकडवनीसाठी तुन्ह जाळं पाणीम सोड. 5 शिमोनन उत्तर दिन्हा, गुरुजी सगले रातभर आम्हू खूप मेहनत लीध्या पण, काहीच मासं सापडनत नाहा. तरी आपुन आखत म्हणी मय परत जाळं पाणीम सोड. 6 आन जव्हा त्यासं तसा कऱ्या तव्हा त्यासाला खूप मासं सापडनत, व तेमुळं जाळा तुटू लागणा. 7 तव्हा त्यासं दुसरे जहाज मधले आपले जोडीदारासला बोलव्या. ते वन्ह्त आन इतक मासं भरणत कि, दोन्ही जहाज बुडू लागणत. 8 शिमोन पेत्रनं जे वेळेस हाय जोयन्हा तव्हा तो येशूने पाया पडणा आन आखणा, प्रभू मान्हे पहिन लांब जा कारण मय पापी माणूस आसं. 9 त्यान आसा आखणा कारण, त्याला आन त्यान्हे जोडीदारासला एवढ मासं मिळनलत. सगळ जे त्यान्हे संग आसनलत आन याकोब, योहान आन जब्दीना मुलगा हे पण त्यान्हे सारखा चकित व्हयनत. 10 येशून शिमोनला आखणा, भिऊ नको, आता मासं एकत्र करस, पण उथीन पुढ माणसं एकत्र करहीस मान्हा शिष्य बनावनेसाठी. 11 त्यास त्यासना जहाज कडला आणल्यावर, त्यासं मासेमारी आन सगळा काही सोड्या आन त्यान्हे संग गयत. 12 येशू ऐके गावम आसतानी, तय एक चामडी रोगवार भरलेला माणूस आसनाल ज्याला कुष्ठरोगी आखतत. त्यान येशूला जोयन्हा, तव्हा जमीनवर उपडा पडणा आन त्यान्हे समोर विनंती करना, प्रभू कृपा करी मला बरा करा, कारण तुन्ही इच्छा आशी तर तू मला बरा करवानी समर्थ आसस. 13 नंतर येशून हात पुढ करी त्याला स्पर्श करणा. त्यान आखणा, मान्ही इच्छां आसं आन मय आता तुला बरा करं, तेच क्षणी तो माणूस बरा व्ह्यना. त्याना कोड निघी गयत. 14 येशून त्यासाला आखणा, तू लवकर बरा व्ह्यना हाय कोणालाच आखू नको, पहिल्यांदा स्वता येरुश्लेमम मधले याजकला दाखव, तुन्हे शुद्धतेबद्दल मोशेन आज्ञा केल्याप्रमानं आर्पण कर. त्यासाला समजी का तू बरा व्ह्यनां असस, त्यान्हेसाठी हाय पुरावा म्हणी कर. 15 बरेच लोकास ऐक्या का, येशून ते माणुसला कसा बरा कऱ्या. त्यान्हा परिणाम बरेच लोकास गर्दी करी येशुत्याव ऐकवानी व शिकवानी आन त्यास्ने आजार पहिन बरा व्हवाणी येतत. 16 येशू नेहमी एकांतम जाता आन प्रार्थना करता. 17 एक दिवस जव्हा येशू शिक्षण देत ऱ्हयनाल, तय परुशी लोकं त्यान्हे जवळ बसनलत. त्यांपैकी काही यहुदी कायदानं पारंगत शिक्षक आसनलत. ते गालील, यहुदिया आन येरुश्लेमने बरेच भागमहित वन्हलत. ते वेळेस प्रभुना सामर्थ आसनाल त्यानेमूळं येशू लोकासला बरा करता. 18 येशू तय आसनाल, काही मनुष्यस तय लखवा झालेला माणूस आण्या. त्याला बिछानामं घाली त्यासं मधी घरमं आनव्हानी आन येशूने पुढ खाली ठेवानी प्रयत्न कऱ्या. 19 लोकास्ने गर्दीमुळं त्याला घरमं आन्हू शकनत नाहा. म्हणी ते घरने वर काौलवर गयत. कौल काढी बरोबर मध्यभागी खाट खाली येशूने पुढ सोड्या. 20 त्यास्ना विश्वास जोही येशू त्यासाला आखणा, मित्रा तुन्हे पापनी क्षमा व्ह्यनी आसं. 21 यहुदी नियमशास्रानं अनुभवी शिक्षक आन परुशी स्वता विषयी विचार करू लागनत, हाय माणुस जा देवन आखीत त्यान्हा अपमान करं, देवने शिवाय कोण पापनी क्षमा करं. 22 येशू यास्न विचार जाणी आसनाल. त्यासाला आखणा तुम्हू आपले अंतकरनमं आसा विचार कजा करत. 23 हाय बोलणा सोपा आसं का तुन्हे पापनी क्षमा व्ह्यनी आसं, कारण त्यान्हे पापनी व्ह्यनी का नाहा हाय दिसं नाहा, पण हाय बोलणा सोपा नाहा, “उठ आन चालू लाग", कारण लोकं लगेच जोत का तो बरा व्ह्यना का नाहा. 24 तुम्हाला कळवा का मनुष्यने पुत्रला बरा करवानी व पापनी क्षमा करवानी अधिकार आसं. त्यान ते मनुष्याला आखणा, मय तुला आखं "उठ आपली खाट उचली घर जा". 25 तेच क्षणी ता माणूस बरा व्ह्यना, त्यास्ने पुढ उभा ऱ्हयणा. त्यान आपली खाट उचलना आन देवनी स्तुती करत आपले घर गया. 26 ते सगळ आश्चर्यचकित व्हयनत, आन भीतीवार देवनी स्तुती करू लागनत. ते आखतत "आज आश्चर्य कर्म जोध्या आसं". 27 येशू बाहेर गया आन त्यान लेवी नावने माणुसला जोयन्हा जो रोमी राज्याना जकातदार आसनाल. तो तय बसणा जय जकात कर भरत. येशून त्याला आखणा शिष्य मन्ही मान्हे बरोबर ये. 28 लेविनं आपला काम सोडणा आन तो त्यान्हे संग गया. 29 ते नंतर लेविनं आपले घर येशू आन त्यान्हे शिष्याससाठी एक मोठी मेजवानी दिन्हा. तय जकातदार आन इतर लोकासना मोठा जमाव त्यास्नेसंग जेवत ऱ्हयनाल. 30 काही परुशी आन यहुदी नियमशास्रानं शिक्षक यासं येशुत्याव तक्रार कऱ्या त्यासं आख्या, तुम्हू जकातदार आन इतर पापी लोकास्ने संग कजा जेवत? 31 येशून त्यासाला आखणा, “जे बरं असत त्यासला वैध्यानी गरज नाहा, पण जे आजारी आसत त्यासाला वैध्यानी गरज आसं". 32 मय स्वर्गामहित जे धर्मिक आसत आसा विचार करत असास्नेसाठी नाहा तर जे पापी आसत आसा विचार करत असास्नेसाठी पश्चाताप करवानेसाठी बोलावण्यात वन्हा आसं. 33 यहुदी अगुवा येशूला आखणा, योहानन शिष्य नेहमी उपास आन प्रार्थना करत, परुश्यासनं शिष्य पण तसा करत, पण तुन्ह शिष्य नेहमी खातपीत ऱ्हत. ते इतरासने सारख उपास कजा करत नाहा? 34 येशून उत्तर दिन्हा, आखणा, वर मुलगा बरोबर आसतानी त्यान्हे पाहुणासला तुम्हू उपाशी ठेवाल का? कोण्ही तसा करणार नाहा. 35 आसं दिवस येत ऱ्हयीत कि, वर त्यासापहीत ल्ही जाहीत ते दिवसमं ते उपास कऱ्हीत. 36 येशून त्यासाला एक दाखला आखणा त्यान आखणा, कोण्ही नवा कपडा फाडी जुने कपडाला लावं नाहा, जर ता लावणा तर तो नवा कपडा फाडं पण नवे कपडाना ठिगाळ जुने कपडाला बरोबर दिसणार नाहा. 37 कोणीही माणूस नवा द्राक्षरस जुने द्राक्षरसने चामडी पिशवीमं ठेव नाहा, जर आसा करं तर नवा द्राक्षरस चामडी पिशवी फाडी बाहेर निघी, ती पिशवी खराब व्हई. 38 नवा द्राक्षरस नवे चामडे पिशवीमच ठेवले पाहिजे. 39 कोणालाही जुना द्राक्षरस पेल्यावर नवा द्राक्षरस नको वाटं, कारण तो आखं, जुना द्राक्षरस चांगला आसं.