अध्याय ४

अरण्यामं येशुनी परीक्षा 1 येशू पवित्र आत्मान परिपूर्ण आसा यार्देन पहिन परतणा, आन त्याला आत्मनं चाळीस दिवस रानम ल्हीजायना; 2 तय सैतानन त्यानी परीक्षा ल्हीन्हा. ते दिवसमं त्यान काही खायना नाहा. ता संपल्यावर त्याला भूक लागणी. 3 तव्हा सैतानन त्याला आखणा, तू देवना [पुत्र आसस तर हे धोंडाला भाकर हो आसा आख. 4 येशून त्याला उत्तर दिन्हा, ' मनुष्य केवळ भाकरीवार जगही आसा नाहा, ' आसा शास्राम लिहलेला आसं. 5 मग सैतानन त्याला उंचावर ल्ही गया त्याला जगमधल राज्य एके क्षणमं दाखवणा; 6 आन त्याला आखणा, यान्हेवरचा सगळा अधिकार व हाय वैभव मय तुला दिसू, कारण हाय मला सोपी दिलेला आसं मान्हे मनला यीहि त्याला मय हाय देय. 7 म्हणी तू मला नमन करहीस तर हाय सगळा तुन्हां व्हई. 8 येशून त्याला उत्तर दिन्हा, ' परमेश्वर तूंह देव ह्याला नमन कर व त्यानीच सेवा कर, 'आसा शास्रामं लिहलेला आसं. 9 नंतर त्यान त्याला येरुश्लेमम ल्हीजाई मंदिरने शिरोभागी उभा करना व त्याला आखणा, तू देवना पुत्र आसस तर उथीन खाली उडी टाक, कारण शास्रामं आसा लिहलेला आसं कि, 10 तुन्हां राखाण करवानी तो आपले दुतासला तुन्हेविषयी आज्ञा दीही'. 11 आन तुन्हां पाय धोंडावर आपटावा नाहा मन्ही ते तुला हातवर झेली धरीत. 12 येशून त्याला उत्तर दिन्हा कि, 'परमेश्वर जो तूंह देव त्यानी परीक्षा जऊ नको ' आसा आखलेला आसं. 13 मग सैतान सगळ्या परीक्षा संपवी संधी मिळेपर्यंत त्याला सोडी गया. 14 नंतर येशू आत्मने सामर्थवार गालीललमं परत वन्हां व त्यांनी कीर्ती सगळीकडले प्रदेशमं पसरायनी. 15 तो त्यास्ने सभास्थानमं शिक्षण देता आन सगळजण त्यान्हा महिमा वर्णतत. 16 मग जे नासरेथमं ती लहानना मोठा व्ह्यना त्य तो वन्हां आन आपले परिपाठप्रमाणं शब्बाथने दिवस सभास्थानम जाई वाचावनी उभा ऱ्हयना. 17 तव्हा यशया संदेष्टाना ग्रंथपट त्याला द्यावणी वन्हां; त्यान ता उलगाडी जा स्थळ काढणा त्याजमं आसा लिहलेला आसं: 18 'परमेश्वरना आत्मा मजवर वन्हां आसं, कारण दिनासला सुवार्ता आख्वानी त्यान मला अभिषेक करणा; त्यान मला पाठवणा आसं; ता आशेसाठी कि धरून न्हेलेल्यासनी सुटका व आंधळ्यासला परत दृष्टीना लाभ यानी घोषणा करवा, ठेचलं जात असत त्यासाला सोडवी पाठवावा; 19 परमेश्वरने प्रसादने वर्षानी घोषणा करवा' 20 मग ग्रंथपट गुंडाळी तो सेवकासला परत दि तो खाली बसना आन सभास्थानमधले सगळे लोकास्नी दृष्टी त्याजवर खीळनी. 21 मग तो त्यासाला आखू लागणा कि, हाय शस्रलेख आज तुम्हू ऐकत आसतानी पूर्ण व्ह्यना आसं. 22 तव्हा सगळ त्यानी वाहवा करू लागनत आन जी कृपावचनं त्यान्हे मुख महित निघतत त्यानेविषयी ते आश्चर्य करू लागणत; ते आखू लागनत, हाय योसेफना पुत्र न? 23 त्यान त्यासाला आखणा, खरोखर तुम्हू मला हि म्हण लागू कराल का, कफर्णहुमंम ज्या गोष्टी तुन्ह करणास आसा आम्हू ऐकीत त्या उथीपण आपले गावला कर. 24 पुढ त्यान आखणा, मे तुम्हाला खचित आखं, कोणताही सादेष्टा स्वदेशमं मान्य व्ह्य नाहा. 25 आणखी मे तुम्हाला खरा ता आख का, एलियाने काळमं साडेतीन वर्ष आकाश बंद ऱ्हई सगळे देशमं मोठा दुष्काळ पडणाल, ते काळी इस्रायलमं पुष्कळ विधवा आसनाल्यात; 26 तरी त्यामधले एकीत्याव पण एलियाला पाठवनाल नाहा; तर सिदोन प्रदेशमधले सारफथ मधले एके विधवात्याव त्याला मात्र पाठवणाल. 27 तसाच आलीशा संदेष्टाने काळमं इस्रायलमं पुष्कळ कुष्ठरोगी आसनलत, तरी त्याजमधला कोणीही शुद्ध व्ह्यनां नाहा; तर सुरीयाना नामान मात्र शुद्ध व्ह्यना. 28 हाय ऐकी सभास्थानमधलं सगळ लोकं संतापयंनत, 29 त्यासं उठी त्याला गावनेबाहेर काढ्या, आन जे डोंगरवर त्यान्हा गाव आसनाल त्यान्हे कडावरीत त्याला लोटी द्यावाणी ल्ही गयत; 30 पण तो त्यासामहित निघी गया. 31 तो गालील मधले कफर्णहुम गावला खाली वन्हां. तो शब्बाथने दिवस त्यासाला शिक्षण देता. 32 त्यान्हे शिक्षणवरी ते थक्क व्हयनत, कारण त्याना बोलना अधिकारयुक्त आसनाल. 33 तव्हा अशुद्ध भुतने आत्मानं पछाडलेला कोन्ही एक माणूस सभास्थानमं आसनाल; तो मोठ्यान आरडी आखणा, 34 आरे येशू नासरेथकरा ! तू आम्ह्ने मधी कजा पडस? तू आम्ह्ना नाश करवानी वन्हास का? तू कोण आसस हाय माहित आसं मला, देवना पवित्र पुरुष ता. 35 तव्हा येशू त्याला धमकावी आखणा, गप्प बस आन याजमहित नीघ. मग भूत ते माणुसला त्यासामं खाली आपटी काही उपद्रव न करता त्याजमहित निघणा; 36 तव्हा सगळ विस्मित व्हई एकमेकासला आखू लागनत, काय हाय बोलना? हाय अधिकारनं व सामर्थ्यवार अशुद्ध आत्मासला आज्ञा करं आन ते निघी जात ! 37 नंतर त्यान्हे विषयनी ख्याती सगळे प्रदेशमं पसरत गई. 38 मग तो सभास्थानमहित उठी शिमोनने घर गया. शिमोननी सासू कडक तापवार पडणेल, तीन्हेसाठी त्यासं तिला विनंती कऱ्या. 39 तव्हा त्यान तिजवर ओणवी तापला दटावना, तव्हा तिन्हा ताप निघणा व लगेच ती उठी त्यास्नी सेवा करू लागणी. 40 मग सुर्यास्तने वेळेस, जे सर्वासनं माणसं नाना प्रकारने रोगवार पिडलेल आसनलत त्यास त्यासाला त्यासत्याव आण्यां आन त्यान त्यासामधले प्रत्येकावर हात ठेवी त्यासाला बरा करणा. 41 तू देवना पुत्र आसस, आसा आरडत भूतं पण पुष्कळ लोकासमहित निघणत; पण त्यान त्यासाला धमकावना व बोलू दिन्हा नाहा; कारण तो ख्रिस्त आसं हाय त्यासाला माहित आसनाल. 42 मग दिवस उगल्यावर तो निघी रानमं गया; तव्हा लोकसमुदाय त्याना तपास करत त्यासत्याव वन्ह्त, आन आपले पहिन त्यान जावा नाहा म्हणी ते त्याला आडवतत. 43 पण त्यान त्यासाला आखणा, मला इतर गावासला पण देवने राज्यानी सुवर्ता आखवानी पाहिजे, कारण त्यानेसाठीच मला पाठवीत. 44 मग तो यहुदियाने सभास्थानमं उपदेश करत फिरणा.