अध्याय १८

आत्याग्रही विधवा 1 येशूनं त्यान्हे शिष्यासला एके वेगळे गोष्टमहीन शिकवना, त्यासं खची जावा नाहा म्हणी, देव आपले प्रार्थनाना उत्तर देय नाहा म्हणून सर्वदा प्रार्थना करवा. 2 त्यांन्ह आखणा, एके शहरमं एक न्यायाधीश आसनाल तो देवला घाबरता नाहा आन माणसासनी काळजी करता नाहा. 3 तेच नगरमं एक विधवा ऱ्हती ती ते न्यायधीशत्याव यी आखती, ' कृपया मान्हां न्याय करा मान्हे विरुद्ध जे माणूसन मला उथी आणणा. 4 बरेच वेळपर्यंत तो डावलता, पण बरेच वेळनंतर त्यान्ह् स्वता त्याला आखणा, मय देवला घाबरं नाहा आन माणसासनी काळजी ल्हेय नाहा. 5 पण हाय विधवा मला सारखी त्रास देय म्हणी मय तिन्हा न्याय करसू नाहातर ती मला आणखी त्रास दी भयभीत करही, कारण जर मयं आसा करणा नाहा, तर ती मला नेहमी यी नकोसा करही! 6 मग प्रभू येशूनं आखणा, 'काळजीपूर्वक ऐका का हाय अन्यायी कारभारी का आखं, 7 तर देवनं जे निवडलेलं, का जे लोकं रात्रदिवस त्यान्हा धावा करत! त्यासना तो न्याय करणार नाहा? 8 मय तुम्हाला आखं, देव त्यान्हे निवडलेल्या प्रत्येक लोकासना न्याय लवकर करही! परंतु जव्हा मय, मनुष्यना पुत्र म्हणी परत हे पृथ्वीवर यीसुक, तव्हा मजवर विश्वास ठेवणारं लोकं मला मिळहीत का? 9 मग येशूपण खालील काही गोष्टी लोकासला आखू लागणा, का जे स्वताला धार्मिक समजी इतर लोकासत्याव खालचे नजरवार जोत. 10 त्यान्ह् आखणा, दोन माणसं वर मंदिरमं प्रार्थनाने साठी येरुश्लेममं जात आसनलत. तेपैकी एक परुशी आसनाल. व दुसरा कोण्ही रोमन सरकार मधले लोकासपहिन जकात गोळा करणारा आसनाल. 11 ते रस्तानं जात असता तो परुशी उभा ऱ्हइ स्वतः अशी प्रार्थना करू लागणा, हे देवा, मय तुन्हां आभार मानं का मय इतर लोकासने सारखा नाहा. काही इतरासनं पैसा चोरत, काही इतरासवर अन्याय करत आन काही व्यभिचार करत. मय हे एकानेपैकी नाहा. आन मय खात्रीनं हे पापी जकातदारने सारखा लोकासपहिन फसवी पैसा ल्हेणारा नाहा. 12 मय प्रत्येक आठवडामहित दोन दिवसं उपास करं आन मय मान्हे सगळे मिळकतमहीन मंदिरमं दशांश देय! 13 पण हाय जकातदार इतर लोकासने सारखा मंदिरपहिन दूर उभा ऱ्हयना. स्वर्गात्याव न जोता तेच ठिकाणी उभा ऱ्हइ आपले छातीवर मारत आखू लागणा, हे देवा, कृपया मला क्षमा कर, कारण मय खूप पापी आसं! 14 मग येशूनं आखणा, मय तुम्हाला आखं; का हाय जकातदार क्षमा पावी घर निघी गया, पण परुशी नाहा. हाय आसा आसं कारण जा कोण्ही स्वताला उंच करं तो नमविला जाही, आन जा कोण्ही स्वताला नमवं तो उंच केला जाही. 15 एक दिवसं लोकासं आपलं लहान मुलं येशुत्याव ल्ही वन्ह्त आशेसाठी का त्यान्ह् आपला हात त्यासावर ठेवी त्यासाला आशीर्वाद द्यावा. तव्हा शिष्यासं हाय जोध्या, ते आखू लागणत तुम्हू तसा करू नका. 16 पण येशूनं ते लेकरासला आपल्यात्याव बोलवानी आखणा. त्यान्ह् आखणा, लहान लेकरासला मजत्याव येऊ द्या! त्यासाला थांबवू नका ! ते विश्वासू लोकास्नं आवडतं मुलं असत. देवना राज्य आसासनाच आसं. 17 खरोखर मय तुम्हाला आखं, जा कोण्ही हे लेकरासने सारखा देवने नियमना स्वीकार करणार नाहा, तो पण त्यासना स्वीकार करणार नाहा. 18 एके यहुदी पुढारीन येशूला विचारणा, “उत्तम गुरुजी, का केल्यान मला सार्वकालिक जीवन मिळही? '” 19 येशूनं त्याला आखणा, “मला उत्तम कजा आखस? जो खरा उत्तम आसं फक्त तो देव आसं! 20 तुन्हे प्रश्नना उत्तर, तुला खात्रीन माहित आसं देवनं पाळवानी आम्ह्नेसाठी मोशेला आज्ञा दिन्हा, व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, तुन्हे आई व बापना मान राख. 21 माणूसनं आखणा, “मय तरूण आसनाल तव्हपहिन मय ह्या सगळ्या आज्ञा पाळत वन्हां आसं. 22 ”जव्हा येशूनं त्यान्हां म्हणणा ऐकणा, तव्हा त्यान्ह् त्याला आखणा, “आता तुला आणखी एक गोष्ट करवानी गरज आसं. जा सगळा तुन्हां आसं ता सगळा विकी ज्यासात्याव थोडा आसं ते लोकासला पैसा दे. त्यान्हा मोबदला आशी तुला स्वर्गामं आध्यात्मिक संपती मीळही. ये आन मान्हां शिष्य व्ह. 23 माणूस खूप दुखी व्ह्यना जव्हा त्यान्ह् हाय ऐकणा, कारण तो फार श्रीमंत आसनाल. 24 तव्हा येशूनं जोयन्हां तो माणूस फार दुखी कसा व्ह्यनाल. त्यान्ह् आखणा, “जे श्रीमंत आसत त्यासाला देवने राज्यामं प्रवेश व्हवानी लय कठीण आसं. ” 25 श्रीमंतानं देवने राज्यामं प्रवेश करणा यान्हेपेक्षा उंटन सुईने नाकमहीन जाणा सोपा आसं. ” 26 ज्यासं येशुना बोलना ऐक्या त्यासं आख्या, मग आम्हू कसं वाचणार!” 27 परंतु येशूनं आखणा, “जा माणूसला अशक्य ता देवला शक्य आसं. 28 ”तव्हा पेत्रनं आखणा, “ज्वा, आम्हू तुन्ह् शिष्य व्हवाने साठी सगळा काही सोड्या आसं. 29 येशूनं त्यासाला आखणा, “हा, आन मय पण तुम्हाला आखं जे कोन्ह् देवने राज्यानेसाठी त्यास्ना घर, बायको, भाऊ, आईबाप, किंवा लेकरं सोडेल आसं, 30 ज्यासं सोड्या त्यासाला हे जीवनमं पुष्कळ पटीनं आन येणारे युगमं सार्वकालिक जीवन मिळही. 31 येशूनं स्वता बारा शिष्यासला जवळ ल्हीना आन त्यासाला आखणा, लक्षपूर्वक ऐका, आपुन आता येरुश्लेममं जात ऱ्हइत. तव्हा तय जाऊ, फार पूर्वी मान्हे विषयी ज्या प्रत्येक गोष्टी संदेष्टासं आख्याल, मनुष्याने पुत्र बद्दल त्या पूर्ण व्ह्यीत. 32 म्हणजी त्याला परराष्ट्रीयासने स्वधीन करवानी येही, त्यान्ही कुचेष्टा व विटंबना व्हई, त्याजवर थुकहीत, 33 त्याला फटक मारहीत, त्यान्हा जीव ल्हीत, आन तो तिसरे दिवस परत उठही. 34 त्यासाला हे गोष्टीने विषयी काहीच कळना नाहा, आणि हाय वचन त्यासापहिन गुप्त ठेवानी वनाल आन आखलेल्या गोष्टी त्यास्ने लक्षामं वन्या नाहा. 35 तो यरीहोपण वन्हा तव्हा आसा व्ह्यना का, एक आंधळा वाटवर भिक माघत बसनाल; 36 त्यान्ह जवळून चाललेले लोकसमुदायना आवाज ऐकी विचारना, हाय का आस? 37 त्यास त्याला आख्या, येशू नासरेथकर जवळून जात रहित. 38 तव्हा तो ओरडी आखणा, आहो येशू, दावीदना पुत्र, मजवर दया करा. 39 तव्हा त्यान्ह गप रहावा म्हणी पुढ चालणारास त्याला दटव्या; तरी तो आधिकच ओरडू लागणा, आहो दावीदना पुत्र, मजवर दया करा. 40 तव्हा येशून उभा रही त्याला आपल्यात्याव आनवाणी आज्ञा करना. तो जवळ आल्यावर त्यान्ह त्याला विचारणा, 41 मह्य तुन्हेसाठी का करवा म्हणी तुन्ही इच्छा आस? त्यान्ह आखणा प्रभू, मला परत दृष्टी यावी. 42 येशून त्याला आखणा, तुला दृष्टी येवो. तुन्हे विश्वासन तुला बरा करणा आस. 43 तत्क्षणी त्याला दृष्टी वन्ही आन तो देवना महिमा वर्णीत त्यान्हे माघ चालू लागणा; तव्हा सगळे लोकांस हाय पाही देवना स्तवन कऱ्या.