येशुना काही वचनं 1 येशूनं त्यान्हे शिष्यासला आखणा, ज्या गोष्टी माणुसला पापमं पाडत त्या निश्चित घडहीत, परंतु जो ह्या गोष्टी व्हवानेसाठी कारणीभूत ठरही त्यान्ही केवढी दुर्दशा ! 2 त्यान्हेपेक्षा त्याला हाय चांगला का, कोण्हतरी त्यान्हे गळाने भोवती मोठा दगड बांधी त्याला समुद्रामं फेकी द्यावा, जर तो एखादे विश्वासमधले अशक्त माणूसला पापनेसाठी कारणीभूत ठरंत आशी तर. 3 तुम्हू कशी कृती करत याने बद्दल काळजीपूर्वक आसा. जर तुम्ह्ना भाऊस पापमं आसं तर त्याला तू धमकाव. जर त्यान्ह् तुला ते पापने बद्दल क्षमा माघना तर त्याला क्षमा कर. 4 जर त्यान्ह् तुन्हे विरुद्ध दिवसं महित सात वेळा पाप करणा, आन त्यान्ह् प्रत्येक वेळेस क्षमा माघना, मय जा करणा तेबद्दल मला क्षमा कर, “तर तुन्ह् नेहमी त्याला क्षमा करवानी पाहिजे. 5 ” त्यान्हे नंतर प्रेषितासं त्याला आख्या, “आम्हाला आजून विश्वास द्या, ” 6 जर तुम्हू मोहरीने दानाने एवढा विश्वास ठेवत, जर तुम्हू तुतीने झाडला तू उपटी समुद्रामं टाकला जा आसा आखाल तर तसा व्हइ!” 7 आणखी येशूनं आखणा, “जर तुम्हाला एक सेवक आसं जो शेतीना किंवा शेरडा मेंढरासनी काळजी ल्हेय. तो शेतमहित जे वेळेस घर येय, तुम्हू आसा आखणार नाहा, ये बस आन लगेच जेवानी बस!” 8 त्यान्हे ऐवजी, तुम्हू त्याला आसा आखाल, मान्हे साठी जेवाण तयार कर ! तुन्ह् वाढवानी कपडां घाली मला आधी जेवाण वाढ म्हणजी मय जेवसु. आन त्यान्हे नंतर तुन्हेसाठी ल्हे. ' 9 जा काम तुन्ह् त्याला आखनास त्यान्हे बद्दल तू त्यान्हा आभार मानणार नाहा, 10 त्यान्हेसारखाच, देवनं जा काही तुम्हाला करवानी आखीत, ते बद्दल तुन्ह् आखवा, ' आम्हू देवनं सेवक आसत, आन त्यान्ह् आम्ह्ना आभार मानवां याला आम्हू पात्र नाहा. त्यान्ह जा आम्हाला करवानी आखणा ताच आम्हू कऱ्या आसं. 11 ”येशू आन त्यान्ह् शिष्य येरुश्लेमने रस्तावरीन जात आसनलत, ते शमरोन व गालीलने प्रांतमहित जात ऱ्हयनलत. 12 जसा येशूनं ते गावंमं प्रवेश करणा, 'दहा कोडी त्यासत्याव वन्ह्त, आन काही आंतरवर उभं ऱ्हइ, 13 त्यासं आख्या, ”येशू, गुरुजी, आम्हावर दया करा!” 14 तव्हा त्यान्ह् त्यासात्याव जोयन्हा आन आखणा, “जा आन मुख्य याजकासला दाखवा. “ते जात असतानीच बरं व्हयनत. 15 मग त्यास्ने पैकी एक जा बरा व्ह्यणाल, ता मोठ्यानं देवनी स्तुती करत माघं वन्हां, 16 त्यान्ह् यी आपला डोका येशूने पायवर ठेवणा, आन त्यान्हा आभार मानणा. हाय माणूस शमरोनी आसनाल. 17 त्यान्हे नंतर येशूनं आखणा, “मयं दहा जणासला बरा करणाल ! बाकीनं नऊ कय आसत? 18 हे परकाने वाचून कोणीच देवना आभार मानवानी वन्हां नाहा!” 19 ते नंतर त्यान्ह् ते माणूसला आखणा, ” तुन्हे घर जा. तुन्ह् मजवर विश्वास ठेवलेमुळं देवनं तुला बरा करणा आसं. ” 20 एक दिवस परुश्यासंपैकी काहीजणासं येशूला विचाऱ्या "प्रत्येकने साठी देव त्यान्हे राज्यानी सुरवात कधी करही"? त्यान्ह् त्यासाला उत्तर दिन्हा "लोकास्ने डोळासला दिसही आसा ता नसही". 21 लोकं आसा आखू शकत नाहा, 'ज्वा! तो उथी राज्य करत ऱ्हइत ! आन तो तय राज्य करत ऱ्हइत! कारण, देवनं आधीच तुम्हामं त्यान्हे राज्यानी सुरवात करणा आसं, ' तुम्हू विरोधी विचार कजा करत. 22 येशूनं आपले शिष्यासला आखणा, ' आशी वेळ यीही का, जो मनुष्यना पुत्र, सामर्थ्यन राज्य करणारा आसा जो मय त्याला जवानी तुम्हू इच्छा कराल". परंतु तुम्हू ता जऊ शकणार नाहा. 23 लोकं तुम्हाला आखीत, ” ज्वा, मसीहा तय आसं! आन ते परत आखीत, ज्वा, तो उथी आसं! ते आसा आखहीत, तव्हा त्यास्ने माग जाऊ नका. 24 कारण जसा प्रकाश चमकाय तसाच प्रकाश आकाशमं एके बाजूनं दुसरे बाजूला जाय, तो प्रत्येकजण जऊ शकं. तसाच मनुष्यने पुत्रना परत येणा व्हइ, प्रत्येकजण मला जोही. 25 पण ते आगोदर का व्हइ, मला पुष्कळ दु:खने मार्गमहीन जाणा गरजेना आसं, तसाच लोकासपहिन मय नाकारला जायसू. 26 परंतु मय मनुष्यना पुत्र, परत यीसु, तो पर्यंत नोहाने काळमं लोकं जसा विचार करतत तसाच ते करणार. 27 नोहा आन त्यान्हां कुटुंब ते मोठे जहाजमं गयत ते काळपर्यंत लोकं खातपीत आसनलत, लगीन करी देतत आन ल्हेतत, पण तव्हा पाणिना पूर वन्हां जे कोण्ही ते जहाजमं नसनलत ते सगळासना नाश व्ह्यना 28 तेच प्रमाणं, लोट सदोम शहरमं असतानी व्ह्यना, लोकं खातपीत आसनलत. विकात ल्हेतत, आन विकतत. लागवड करतत, घर बांधतत. 29 परंतु लोट जे दिवसं सदोममहित बाहेर पडणा, आकाशमहित अग्नी आन गंधक यास्ना वर्षाव खाली पडू लागणा, आन ते सगळं जे ते शहरमं थांबणलत ते सगळासना नाश व्ह्यना. 30 तेच प्रमाणं, मय जो मनुष्यना पुत्र, परत हे पृथ्वीवर यीसु, लोकं तयार नसहीत. 31 ते दिवसं, जे घरने बाहेर आसहीत, त्यासं आपला सामान ल्हेवाने साठी मधी जावा नाहा, मधी जावानी वेळ घालवा नाहा, तेच प्रमाणं, जो शेतमं काम करत आशी त्यान्ह् माग फिरवा नाहा; त्यानी जाणीव लगेचच व्ह्वानी गरजेना आसं. 32 लोटने बायकोनी आठवण करा! 33 कोण्ही आपले स्वत:नेसाठी जगही तो मरही. परंतु जो कोण्ही मान्हे उद्देशने साठी जगही तो कायमना जगही. 34 मय तुम्हाला आख, जे राती मय यीसुक, तव्हा दोघ पलंगवर झोपलेलं आसहीत. ते मधला एक जो मजवर विश्वास ठेवणारा आशी त्याला मय ल्हीसू आन दुसराला तयच ठेवसुक. 35 - 36 दोन बायका जातावर दळत आशीत ते मधली एक घेतली जाही व दुसरी ठेवली जाही. 37 त्यान्ह् शिष्यासं त्याला आख्या, “प्रभू हाय कय व्हई? ” त्यान्ह् त्यासाला उत्तर दिन्हा, “जय कय मेलेला शरीर आसं, ता खावानी गिधाडं जमहीत. ”