अन्यायी कारभारीना शहानपण 1 मग त्यन्ह् शिष्यासला पण आखणा, एक श्रीमंत माणूस आसनाल व त्यान्हा एक कारभारी आसनाल; त्याजवर, हाय तुम्ह्ना द्रव्य उडवं, आसा त्यान्हे जवळ आरोप करवानी वन्हां. 2 तव्हा त्यान्ह् त्याला बोलवी आखणा, तुन्हे विषयी मय हाय का ऐकं? तू आपले कारभारना हिशोब दे; कारण याने पुढं तुला कारभार जवानी नाहा. 3 मग कारभारीनं आपले मनमं आखणा, मान्हा धनी मजपहिन कारभार काढी लेणार आसं, तर मय आता का करू? खणवानी मला शक्ती नाहा; भीक मागवानी लाज वाटं 4 तर कारभारवरीन काढल्यावर लोकांस आपले घरमं ल्यावा म्हणी मय का करवा हाय आता मला सूचना. 5 मग त्यान्ह् आपले धनीने प्रत्येक देणेकऱ्यासला बोलवना आन पहिलाला आखणा, मान्हे धनीना तुला किती देणा आसं? 6 त्यान्ह आखणा, शंभर मण तेल. त्यान्ह त्याला आखणा, हाय तुन्हा रोखा ल्हे आन लवकर बशी याजवर पन्नास मांड. 7 नंतर दुसराला आखणा, तुला किती देणा आसं? त्यान्ह आखणा, शंभर खंड्या गहू त्यान्ह त्याला आखणा, हाय तुन्हां रोखा ल्हे व ऐंशी मांड. 8 अन्यायी कारभारीनं शहाणपण करणा याजवरीन धनीन त्यान्ही वाहवा करणा; कारण हे युगन लोकं आपले सारखानेविषयी प्रकाशने लोकासपेक्षा शहाणे आसत. 9 आणखी मय तुम्हाला आख, अनितीकारक धनवार तुम्हू आपलेसाठी मित्र जोडा; यानेसाठी का, ता नाहीसा व्हइ तव्हा त्यासं तुम्हाला सार्वकालिक वस्तीमं ल्ह्यावा. 10 जो आगदी थोडकाने विषयी विश्वासू तो पुष्कळने विषयी विश्वासू आसं; आन जो थोडकाविषयी अन्यायी तो पुष्कळने विषयी अन्यायी असं. 11 म्हणी तुम्हू अनितीकारक धनने विषयी विश्वासू व्हयनत नाहा 12 तर जा खरा धन ता तुम्हाला कोण सोपवी दीही? 13 कोणतेही चाकरला दोन धन्यासनी सेवाचाकरी करता येय नाहा; कारण तो एकाना द्वेष करही व दुसरावर प्रीती करही; अथवा एकाला धरी रही व दुसराला तुच्छ मान्ही. तुम्हाला देवनी आन धननी सेवाचाकरी करता येय नाहा. 14 धनलोभी परुशी हाय सगळा ऐकतत आन त्याला हासतत. 15 त्यान्ह त्यासाला आखणा, तुम्हू स्वताला लोकासने पुढं, नीतिमान म्हणी लेणार आसत, पण देव तुम्हना अंतकरण ओळखं; कारण माणसासला जा उच्च वाटं ता देवने दृष्टीनं वाईट आसं. 16 योहानने पर्यंत नियमशास्त्र व संदेष्ट आसनलत; तव्हा पहिन देवने राज्यानी घोषणा केली जात ऱ्हइत आन प्रत्येक माणूस त्याजवर आक्रमण करं. 17 नियमशास्त्रमधला एकही कानामात्रा रद्द होण्यापेक्षा आकाश पृथ्वी नाहीशी व्हना सोपा आसं. 18 जो कोणी आपली बायको टाखी दुसरीनेबरोबर लगीन करं तो व्याभिचार करं; आन नावरासनं टाकलेले बायकोने बरोबर जो लगीन करं तो व्यभिचार करं. 19 कोणीएक श्रीमंत माणूस आसनाल; तो जांभळ व तलम वस्त्र घालता, आन दररोज थाटमाटमं ख्यालीखुशाली करता. 20 त्यान्हे दारजवळ फोडासवार भरलेला लाजर नावना एक दरिद्री माणूस टाकवानी वन्हाल; 21 ते श्रीमंताने मेजवरीन खाली पडही त्याजवर आपला पोट भरवा आशी त्यान्ही इच्छा आसनेल, शिवाय कुत्रं यी त्यान्ह् फोडं चाटत आसत. 22 पुढं आसा व्ह्यना का, तो दरिद्री माणूस मरणा आन देवदूतासं त्याला अब्रहामने उरपण जाई ठेव्या; श्रीमंत पण मरणा व त्यान्ही उतरक्रिया करवानी वन्ही. 23 तो अधोलोकांसमं यातना भोगत असतानी त्यान्ह आपली दृष्टी वर करी अब्रहाम व त्यान्हे उरपण बसलेला लाजर यासाला दुरून जोयन्हा. 24 तव्हा त्यान्ह हाक मारी आखणा, हे बापा आब्राहाम, मजवर दया करी लाजरला पाठव, यानेसाठी का त्यान्ह आपले बोटना टोक पाणीमं बुडवी मान्ही जीभ थंड करवा; 25 अब्राहामन आखणा, मुला, तू आपले आयुष्यामं आपला सुखं भरी पावनासं, तसा लाजर आपला दुखः भरी पावना, यान्ही आठवण करं; आता याला उथी समाधान मिळत ऱ्हइत व तू क्लेश भोगत ऱ्हइत; 26 एवढाच नाहा तर जे इकडून तुम्हात्याव पार जावानी जोत त्यासाला जाता यावा नाहा व तिकडून कोण्ही आम्हात्याव यावा नाहा म्हणी आम्ह्ने व तुम्ह्ने मधी मोठी दरी स्थापलेली आसं. 27 मग त्यान्ह् आखणा, तर बापा, मय विंनंती करं का, त्याला मान्हे बापने घर पाठव; 28 कारण मला पाच भाऊ आसत त्यासं तरी हे यातनाने स्थळी यावा नाहा म्हणी त्यान्ह् त्यासाला इकडची साक्ष द्यावी. 29 पण अब्राहामन त्याला आखणा, त्यास्ने जवळ मोशे व संदेष्टं आसत, त्यास्ना त्यासं ऐकवा. 30 त्यान्ह् आखणा, हे बापा आब्राहाम, आसा नाहा; पण मेलेलेमहित जर कोण्ही त्यासात्याव गया तर ते पश्चाताप करीत. 31 तव्हा त्यान्ह त्याला आखणा, ते मोशेना व संदेष्टासना ऐकत नसहित तर मेलेलेमहित कोण्ही उठना तर त्यासनी खातरी होणार नाहा.