हरवलेला मेंढरू 1 पापी लोकासमं गणना असलेलं सर्व जकातदार येशुनी शिकवण ऐकवानेसाठी त्यासत्याव येतत. 2 यहुदी नियमशास्त्र पाळणारं परुशी व शास्त्री कुरकुर करू लागणत का हाय मनुष्य पाप्यासना स्वीकार करं व त्यास्ने बरोबर जेवं. त्यास्ने मते आसा केल्यावर येशू स्वताला अशुद्ध करी ल्हेत ऱ्हइत. 3 तव्हा येशूनं त्यासाला हाय दाखला आखणा: 4 तुम्ह्ने कोणाएकात्याव शंभर मेंढर आशी त्याजमधला एक हारवना, तर खात्रीवार शंभर मेंढर रानमं सोडी हारावलेला एक मेंढरू सापडासपर्यंत ता सापडावनी जाय, 5 आन जे वेळेस, ता त्याला सापडाय तव्हा तो आनंदवार त्याला खांदावर ल्ही घर येय. 6 घर आल्यावर तुम्हू मित्रासला व शेजाऱ्यासला आखत, मान्हां मेंढरू सापडायना आसं मान्हे बरोबर आनंद करा. 7 मय तुम्हाला आख तसेच प्रकारे स्वताला पापी म्हणवणारे व पश्चतापनी गरज नाहा आसा विचार करणाऱ्यास मधले एके पापी व्यक्तीन आपले पापने साठी पश्चाताप केल्यास स्वर्गामं अधिक आनंद व्हइ. 8 किंवा समजा एके स्त्री त्याव दहा मौल्यवान चांदीन नाण आसत व त्याजमधला एक हारवाय, तर ती खत्रीवार दिवा लावी घर झाडी, व ता सापडासपर्यंत त्यान्ह् शोध करही. 9 आन जव्हा ता तिला सापडाही तव्हा ती आपले मित्रासला व शेजाऱ्यासला बोलवी आखही, “मान्हे बरोबर आनंद करा मान्हां हारावलेला नाणा सापडणा आसं. ” 10 मय तुम्हाला आख, ”असेच प्रकारे एके पापी व्यक्तीन त्यान्ह् पापने साठी केलेले पश्चातापनेमूळं स्वर्गामं देवदूत अत्यंत आनंद करहीत. ” 11 मग येशूनं पुढ आखणा, “एके माणुसला दोन मुलं आसनलत. 12 एक दिवसं लहान मुलनं त्यान्हे बापला आखणा, “ बाबा तुम्ह्ने मृत्युनंतर दिला जाणारा मान्हां मालमत्ताना वाटा मला द्या. ' तव्हा बापनं त्यान्ही मालमता दोघासला वाटी दिन्हा. 13 थोडेच दिवसमं, धाकटा मुलगा सर्व काही गोळा करी दूर देशी निघी गया. तय त्यान्ह् आपला सगळा पैसा मूर्खने सारखा व्यर्थ, अनैतिक जीवन जगवानी खर्च करणा. 14 त्यान्हां सगळा पैसा संपल्यावर तय सगळे देशमं फार मोठा दुष्काळ पडणा, आन त्यासत्याव काहीच उरणा नाहा. 15 म्हणी तो त्यान्हे देशमधले एके रहिवाशीत्याव गया. ते माणूसनं त्याला त्यान्ह् डुकरं चारवानी पाठवाना. 16 थोडे वेळन त्याला खूप भूक लागल्यामुळ डुकरं खात असलेले शेंगा तरी खावानी मिळाव्या आसा वाटना, तरी कोणही त्याला काही दिध्या नाहा. 17 शेवटी आपुन किती मुर्खाने सारखा वागणा यान्हा विचार करी तो स्वताशीच आखणा: मान्हे बापने घर सगळे नोकरासला भरपूर अन्न आसं, आन मला खावानी काही नसलेमुळे मय उपाशी मरत ऱ्हइत. 18 तर आता मय उठी मान्हे बापत्याव जायसू, त्याला आखसू, “बाबा मय तुम्ह्ने विरुद्ध व देवनेविरुद्ध पाप करणा आसं. 19 तुम्ह्ना मुलगा म्हणी लेवानी मय योग्य नाहा. तुम्ह्ने एके नोकरनेसारखा मला ठेवा. 20 तहीन निघी तो आपले बापने घर जावानी निघणा. तो दूर आसं तोच त्यान्हे बापनं दुरून ओळखणा आन त्यान्ही त्याला खूप दया वन्ही. तो पळत आपले पोऱ्यात्याव गया व त्यान त्यान्हा मुकं ल्हीना. 21 पोऱ्यान त्याला आखणा, बाबा मय तुम्ह्ने विरुद्ध व देवने विरुद्ध पाप करणा आसं, म्हणी मय तुम्ह्ना मुलगा आखवानी योग्य नाहा. 22 पण त्यान्हे वडीलन त्यान्हे नोकरासला आखणा, 'लवकर जाई उत्तम झगा आन्ही मान्हे पोऱ्याला घाला, त्यान्हे पायमं वाहणा व बोटमं अंगठी घाला. 23 चांगले समारंभने साठी ठेवलेलं उत्तम वासरू आन्ही कापा म्हणजी आपण ता खाई आनंद करू ! 24 कारण हाय मान्हा पोऱ्या मरणाल तो जिवंत व्ह्यना आसं, हारवायनाल, पण आता सापडना आसं !'म्हणी ते सगळं आनंद करू लागणत. 25 हाय सगळा घडत असतानी बापना मोठा मुलगा शेतमं काम करत ऱ्हयनाल. काम संपवी घरने जवळ येतानी त्यान्ह् नाच गाणासंना आवाज ऐकणा. 26 त्यान्ह् एके नोकरला बोलवी का चालीत ता विचारना, 27 नोकरन त्याला आखणा, 'तुन्हां भाउस घर वन्हां आसं. तुन्हां भाऊस सुखरूप घर आल्यामूळं बापनं आम्हाला उत्तम वासरू कापी आनंद करवानी आखीत. 28 पण मोठे भाऊसला राग वन्हां तो घरमं गया नाहा म्हणी त्यान्हे बापनं त्याला बाहेर यी घरमं येवानी विनंती करणा. 29 पण त्यान्ह् त्याला उत्तर दिन्हा, “ऐका, आतापर्यंत त्यास्नेसाठी मय नोकरने सारखा कष्ट करणा आसं, मय तुम्ह्ना प्रत्येक गोष्टीमं आज्ञापालन करणा आसं, परंतु मित्रासने बरोबर मेजवानी करवा म्हणी तुम्हू मला कधी वासरू दिध्या नाहा. 30 पण आता तुम्ह्ना हाय मुलगा; वेश्यासवर सगळा पैसा उधळी घर आल्यावर तुम्हू आनंद करवाने साठी नोकरासला उत्तम कापवानी आख्या. 31 पण त्यान्हे बापनं त्याला आखणा, “मान्हे मुला, तू सतत मान्हे बरोबर आसस, आन मान्हां सगळा काही तुन्हाच आसं 32 परंतु तुन्हां भाऊस मरणाल तो आता जिवंत व्ह्यना आसं, म्हणी आनंद व उत्सव करणा आपल्याला योग्य आसं. जणू काही तो हारवायनाल व आता सापडना आसं.