अध्याय १४

जलोदर झालेले माणूसला शब्बाथने दिवस बरा करणा 1 एके शब्बाथने दिवसं, येशू परुशी आधीकारीने घर भोजनने साठी गया, ते त्याला लक्ष दी जोतत्त. 2 तेठिकाणी येशूने समोर हातवर आन पायवर सूज असलेला एक आजारी माणूस आसनाल. 3 येशूनं तय जमलेले शास्त्री आन परुशी अधिकाऱ्यासला विचारणा का "शब्बाथने दिवसं आजारी लोकासला बरा करणा नियममं आसं का नाहा? ” 4 ते सगळ गप्प ऱ्हयनत, येशूनं ते आजारी माणूसवर हात ठेवी त्याला बरा करी त्याला जावानी आखणा. 5 मग त्यान्ह ते सगळासला आखणा, जर शब्बाथने दिवसं तुम्ह्नेपैकी एखादाना मुलगा किंवा बैल विहीरमं पडल्यावर तो त्याला ते दिवसं लगेच बाहेर काढी का नाहा? ६ 6 परत ते त्याला काहीच उत्तर देऊ शकनत नाहा. 7 जे लोकांस येशूला घर भोजनने साठी बोलव्याल ते कसं मुख्य आसनं बसवानी ल्हेत आसत ता जोही त्यान्ह् त्यासाला एक दाखला आखणा, 8 जर कोण्ही तुम्हाला लगीनने भोजनला आमंत्रण दिध्या तर तुम्हू मुख्य आसनवर जाई बसू नका; कदाचित तुम्ह्ने पेक्षा अधिक महत्वाने आमंत्रित व्यक्तीने साठी ती जागा आशी, 9 ज्यान्ह् तुला व त्याला आमंत्रण दिन्हा तो यी तुला आखही का ही जागा याला दे आन तुला लाजेन खालचे जागांवर जाई बसवा लागही. 10 तुला भोजनने साठी आमंत्रित केल्यावर तू आगदी सर्वासमं खालची जागावर जाई बसं, म्हणजी ज्यान्ह् तुला आमंत्रण दिन्हा; तो तुजत्याव यी आखी मान्हे मित्रा वर यी बसं आन तुन्हे बरोबर भोजनला बसलेले सर्वासनेपुढ तो तुन्हां सन्मान करही. 11 परंतु देव जे स्वताला उंच करत त्यासाला खाली करही आन जे स्वताला खाली करत त्यासाला तो उंच करही. 12 जे परुशीन भोजनने साठी आमंत्रित करणा, त्याला त्यान्ह् आखणा, तुम्हू दुपारी किंवा संध्याकाळी आपलं मित्र, नातेवाईक आन श्रीमंत शेजाऱ्यासला भोजनला आमंत्रित करू नका कदाचित ते परतफेड म्हणी तुम्हाला पण भोजनला बोलव्हीत. 13 तर जव्हा तू मेजवानी करहीस तव्हा तू लुळं, पांगळं, अंधाळं आन गरीब लोकासला भोजनला आमंत्रित कर. 14 देव तुला आशीर्वादित करही कारण ते परतफेड करू शकत नाहा! तरी धार्मिकासने पुनरुत्थाननेवेळेस तुन्ही परतफेड व्हयी. 15 त्यास्ने संग भोजनला बसलेले एकानं ह्या गोष्टी ऐकी येशूला आखणा, देवने राज्यामं त्यान्हे बरोबर अन्न खाणाऱ्यासनी केवढी मोठी धन्यता. 16 येशूनं त्याला आखणा, एके मनुष्यान मोठी मेजवानी द्यावणी ठरवना; त्यान्ह् बरेच जनासला मेजवानीला येवानी आमंत्रण दिन्हा. 17 मेजवानीने दिवसं आत या! सगळी तयारी व्ह्यनी आसं आसा आमंत्रित लोकासला आखवाणेसाठी त्यान्ह् आपले दासासला बाहेर पाठवना. 18 परंतु दासांस हाय केल्यावर सगळ आमंत्रण दिलेलं लोकं दासासला न येवानी कारणं आखू लागणत, पहिल्यान त्याला उत्तर दिन्हा, मय आताच शेत ल्हीना आसं मला ता जाई जऊ दे मय विनंती कर का मला माफ कर. 19 दुसरानं उत्तर दिन्हा मय आताच बैलासन्या पाच जोड्या विकात ल्हीना आसं, मला जाई त्या तपाशी ल्हेऊ दे मय विनंती करं का मला माफ कर. 20 आणखी एकानं उत्तर दिन्हा का मान्हां आताच लगीन व्ह्यना आसं म्हणी मय येऊ शकत नाहा. 21 मग ते दासनं यी हाय सगळा वर्तमान आपले धनीला आखणा. तव्हा घरधनी रागवी आपले दासला आखणा, तुम्हू लगेच नगरने रस्तासवर व गल्ल्यासमं जाई आंधळ, लुळं, पांगळं आन सगळे गरीब लोकासला बाहेरून मान्हे घर मेजवानीने साठी ल्ही या. 22 मय तुम्हाला आखं का पहिल्यांदा आमंत्रण दिलेल्यासमधला कोणताच माणूस मान्हे हे भोजन मधला अन्न खाणार नाहा. 25 येशूने बरोबर मोठा लोकसमुदाय चालनाल त्यासात्याव वळी त्यान्ह् आखणा, 26 जर कोण्ही मजत्याव येय आन आपली आई, बाप, भाऊ, बहीण, बायको आन मुलं यास्ने पेक्षा मजवर अधिक प्रीती करं नाहा तर तो मान्हां शिष्य होऊ शकत नाहा. 27 त्यान्ह् आपले स्वताने जीवनेपेक्षा मजवर अधिक प्रीती करवा. जो कोण्ही आपला वधस्तंभ ल्ही मान्हे पाठीमाघं येय नाहा तो मान्हां शिष्य होऊ शकत नाहा. 28 जर कोण्ही बुरुज बांध, तो आधी बशी ता बांधवानी किती खर्च लागही व ता पुरा करवाने साठी आपल्यात्याव पुरेसा पैसा असत का यान्हां अंदाज करं नाहा आसा कोण्ही आसं का? 29 कदाचित त्यान्ह् पाया घाली ता काम अर्धवट पडही, तर सगळ लोकं ता जुही त्यान्ही गंमत करहीत आन आखीत, 30 यान्ह् हाय बुरुज बांधवानी सुरु करणा पण तो पुरा करू शकणा नाहा. 34 येशूनं त्यासाला आखणा, तुम्हू मीठने सारखं असत, जा उपयोगी आसा आसं. पण जर मीठनं आपला खारटपणा सोडणा तर त्यांला परत कशावार चव आणता यीही? मीठनं जर खारटपणा सोडणा तर ता 35 जमीनला व खतला काहीच उपयोग व्हणार नाहा. लोकं त्याला बाहेर फेकी दीहीत. ज्याला ऐकवाणी कान आसत त्यान्ह् कान दी मान्हा लक्षपूर्वक ऐकवा.