विधवान दोन पैस 1 मग त्यांन दृष्टी वर करी धनवानासला आपल दान मंदिरने भांडारम टाकताना पाहिले. 2 त्यांन एके दरिद्री विधवेला पण तय दोन टोल्या टाकतानी पाहीना; 3 तव्हा त्यान्ह आखणा, मय तुम्हाला खरा आख, हे दरिद्री विधवान सगळासने पेक्षा जास्त टाकनि आस. 4 कारण ते सगळास आपले समृद्धी महीन दानम टाकेल आस, हिने तर आपले कमाई महित आपली सर्व उपजीविका टाकनि आस. 5 मंदिर उत्तम पाषाणास व अर्पणास कसा सुशोभित केलेला आस, हे विषयी कित्येकजन बोलत असता त्यान्ह आखणा, 6 आस दिवस येतील का, जा तुम्हू जोत आसत त्याजमधला पाडला जाणार नाहा आसा चीरावर चिरा राहणार नाहा. 7 तव्हा त्यास त्याला विचाऱ्या, गुरुजी, ह्या गोष्टी कधी घडीत? आन जे काळम ह्या गोष्टी घडीत ते काळन चिन्ह का? 8 त्यन्ह आखणा, तुम्हाला कोण बहकावा नाहा म्हणी सावध राहा; कारण मान्हे नावन पुष्कळ लोकं यी मयच तो आस आन तो काळ जवळ आलेला आस, आस आखीत; त्यास्ने नादी लागू नका. 9 आन जेवेळेस तुम्हू लढाया व दंग हेविषयी ऐकाल तव्हा घाबरू नका; कारण ह्या गोष्टी प्रथम होण आवश्य आसत, तरी एवढाम शेवट व्ह्य नाहा. 10 मग त्यान्ह त्यासाला आखणा, राष्ट्रासवर राष्ट्र व राज्यासवर राज्य उठीत; 11 मोठमोठ भूकंप होईत, जागोजागी मऱ्या येहीत व दुष्काळ पडही, आन भयंकर उत्पात व आकाक्षम मोठी चिन्ह घडी येहीत; 12 पण हाय सगळा व्हवाने आधी ते तुम्हासवर हात टाकहीत व तुम्ह्ना छळ करहीत; तुम्हाला सभास्थाने व तुरुंग यासने स्वाधीन करहीत, आन राजे व अधिकारी यास्नेपुढ मान्हे नावनेसाठी नेतील. 13 यान्हेमूळ तुम्हाला साक्ष देवानी संधी मिळही. 14 तव्हा उत्तर कसा द्यावा यान्हेविषयी आधीच विचार करवानी नाहा असा मनना निर्धार करा; 15 कारण मय तुम्हाला आशी वाचा व बुद्धी दिसू की तिला आडवानी किवा तीन्हेविरुद्ध बोलवानी तुम्ह्ना कोणीएक विरोधक समर्थ होणार नाहा. 16 आईबाप, भाऊबंध, नातलग व मित्र हे देखील तुम्हाला धरी दीहीत; आन तुम्हामधले कित्येकासला जीवं मारीत, 17 आन मान्हे नावनेमूळ सगळ तुम्हना द्वेष करीत; 18 तरी तुम्ह्ने डोकाने एके केसंना पण नाश होणार नाहा. 19 तुम्हू आपले धीरान आपला जीव मिळवाल. 20 पण यरुशलेमला सैन्यासना वेढा पडत आस आसा पाहाल तव्हा ती ओसाड पडवाणी वेळ जवळ वन्ही आस आसा समजा. 21 ते वेळेस जे यहूदाम आसहीत त्यास डोंगरम पळी जावा, जे यरुशलेमम आसहीत त्यास बाहेर निघी जावा व जे शिवारम आशीत त्यास तीन्हे आत यावा नाहा. 22 कारण शास्त्रलेख मधल्या सर्व गोष्टी पूर्ण व्हवानेसाठी हे 'सूड लेव्हानी दिवस' आसत. 23 ते दिवसमं ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया आसहीत त्यास्नी केवढी दुर्दशा होणार! कारण देशवर मोठा संकट येही व हे लोकासवे कोप व्हई. 24 ते तरवारने धारवार पडहीत, त्यासाला बंदिवान करी सगळे राष्ट्रासमं नेतील, आन परराष्ट्रीयासनी सद्दी संपेपर्यंत 'परराष्ट्रीय यरुशलेमला पायने खाली तुडवहीत'. 25 तव्हा सूर्य, चंद्र व तार यासमं चिन्ह घडी यीहीत, आन पृथ्वीवर समुद्र व लाटा यास्ने गर्जनावार राष्ट्र घाबर होईत पेचमं पडहीत; 26 भयवार व जगवर कोसळणारे अरिष्टासनी धास्ती घेतलेमूळ माणस मरणोन्मुख व्हइत. आकाशमधलं बळ डळमळीत होईत'. 27 ते काळी 'मनुष्यना पुत्र' पराक्रमन व मोठे वैभवमं 'मेघमहित येतानी' लोकासने दृष्टीला पडही. 28 हे गोष्टीसला आरंभ होई तव्हा सरळ उभं राहा आन आपली डोकी वर करा; कारण तुम्ह्ना मुक्तीसमय जवळ वन्हा आस. 29 त्यान्ह त्यासाला एक दाखला आखणा; अंजीरना झाड व इतर सगळ झाड पाहा; 30 त्यासाला पालवी फुटू लागणी म्हणजी ता पाही तुम्ह्न तुम्हूच ओळखत का, आता उन्हाळा जवळ वन्हां आंस. 31 तसाच ह्या गोष्टी घडतानी पाहाल तव्हा तुम्हू ओळखा कि, देवना राज्य जवळ वन्हां आस. 32 मय तुम्हाला खचित आख का, सर्व गोष्टी पूर्ण होईत तोपर्यंत हाय पिढी नाहीशी होणार नाहा. 33 आकाश व पृथ्वी नाहीशी होईत; पण मान्हा वचन मुळीच नाहीसा होणार नाहा. 34 तुम्हू सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दरुबाजी व संसारन्या चिंता यान्ह तुम्हना अंतकरण भरून जाई तो दिवस तुम्हावर 'पाशाप्रमाण' अकस्मात येही; 35 कारण तो आवघे पृथ्वीने पाठीवर राहणारे सर्व लोकासवर तेप्रमाणच येही 36 तुम्हू तर होणारे ह्या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याने पुत्रने समोर उभा रवानी समर्थ व्हावा म्हणी सर्व प्रसंगी प्रार्थना करत जाग राहा. 37 तो दिवसा मंदिरम शिक्षण देता आन रात्री बाहेर जाई ज्याला जैतूनना डोंगर आखत त्यावर राहत आसे. 38 सर्व लोक त्यान्हा ऐकवानी मोठे पाहाटच त्यासत्याव मंदिरमं येतत.