उत्तम मेंढपाळ 1 तुम्हाला मय खरा खरा आख, जो मेंढवाडाम दारान न जाता दुसरी कडून चढी जाय तो चोर व लुटारू आस. 2 जो दारान मधी जाय तो मेंढपाळ आस. 3 त्यान्हेसाठी द्वारपाळ दार उघड;मेंढर त्यान्ही वाणी ऐकत आन तो आपले मेंढरासला ज्यान्हे त्यान्हे नवान हाका मार व त्यासाला बाहेर ली जाय. 4 तो आपल सगळ मेंढर बाहेर काढल्यावर त्यास्ने पुढ चाल व मेंढर त्यान्हे माघ चालत;कारण ते त्यान्ही वाणी ओळखत. 5 ते परकासने माघ कधीच जाणार नहात, तर ते त्याजपहिन पळीत;कारण ते परकानी वाणी ओळखत नहा. 6 हो दृष्टांत येशून त्यासाला आखणा, तरी ज्या गोष्टी तो त्यास्ने बरोबर बोलणा त्या का आसत हाय त्यासाला समजायन्या नहा. 7 म्हणी येशून परत त्यासाला आखणा, मय तुम्हाला खरा खरा आख का, मय मेंढरासना दार आस. 8 जे मान्हे आधी[पूर्वी] वन्हत ते चोर व लुटारू आसत;त्यासना मेंढरास ऐक्या नहा. 9 मय दार , मान्हे द्वारे मधी कोन्ही जाई तर त्याला तारण प्राप्ती व्हयी;तो मधी यी व बाहेर जाई आन त्याला खावानी मिळी. 10 चोर येय तो केवळ चोरी, घात व नाश करवानी येय;मय तर त्यासाला जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणी वन्हा आस. 11 मयच उत्तम मेंढपाळ आस;उत्तम मेंढपाळ मेंढरासने करता आपला प्राण देय. 12 जो मेंढपाळ नहा तर मोलकरीच आस, ज्यान्ह स्वतः न मेंढर नहात तो लांडगाला येत असलेला जोई मेंढर सोडी पळी जाय आन लांडगा त्यासावर झडप घाली त्यासनी दाणादाण कर. 13 मोलकरी पळी जाय कारण तो मोलकरीच आस आन त्याला मेंढरासनी काळजी नहा. 14 मय उत्तम मेंढपाळ आस;जसा पिता मला ओळख व मय पिताला ओळख, 15 तस जे मान्ह आसत त्यासाला मय ओळख व जे मान्ह आसत ते मला ओळखत;आन मेंढरासने साठी मय आपला प्राण देय. 16 हे मेंढवाडामधल नहात अस मान्ह दुसर मेंढर आसत, ते पण मला आणले पाहिजेत;ते मान्ही वाणी ऐकीत;मग एक कळप, ऐक मेंढपाळ असा व्हयी. 17 मय मान्हा प्राण परत लेवानी करता देय म्हणी पिता मजवर प्रीती कर. 18 कोन्ही तो मज पहिन लेय नहा, तर मय व्ह्यीच तो देय. मला तो देवानी अधिकार आस व परत लेवानी पण अधिकार आस. हि आज्ञा मला मान्हे पिता पहिन प्राप्त व्ह्यनी आस. 19 हे शब्दाने वरून यहुद्यासम परत फुट पड्नी. 20 त्यासामधले पुष्कळ जन आखवानी लागनत, त्याला भूत लागणा आस व तो वेडा आस;त्यान्हा तुम्हू कजा ऐकत? 21 दुसरास आख्या, हे वचन भूतग्रस्तानी नहात;भूतला आंधळासन डोळ उघडता येत का? 22 तव्हा यरुश्लेम म परत पुन स्थापनाना सण आसी हिवाळा आसनाल; 23 आन येशू मंदिर मधले शलमोनने देवडीम फिरत आसनाल. 24 तव्हा यहुद्यास त्याला गराडा घाली आख्या, तुन्हू कवर आमन मन संशयम ठुणार? तुन्हू ख्रिस्त आंसश्याल तर आम्हाला उघड आखा. 25 येशून त्यासाला उत्तर दिन्हा, मय तुम्हाला आखणा तरी तुम्हू विश्वास ठुवत नहा;जे कृत्य मय मान्हे पिताने नावान कर ते मान्हे विषयी साक्ष देत. 26 तरी तुम्हू विश्वास ठुवत नहात. कारण तुम्हू मान्हे मेंढरास पैकी नहात. 27 मान्ह मेंढर मान्ही वाणी ऐकत;मय त्यासाला ओळख व ते मान्हे माघ येत; 28 मय त्यासाला सार्वकालिक जीवन देय;त्यासना कधीच नाश व्हणार नहा आन त्यासाला मान्हे हात महीन कोन्ही हिसकी लेणार नहा. 29 पितान जा मला दिन्हा ता सगळास पेक्षा मोठा आस;आन पिताने हात महीन ता कोन्ही हिसकी लेऊ शकत नहा. 30 मय आन पिता एक आसत. यहुद्यास दाखवलेला शत्रुत्व 31 तव्हा यहुद्यास त्याला दगड मार करवानी परत दगड उचल्या. 32 येशून त्यासाला आखणा, मय पिता कडच पुष्कळस चांगल कृत्य तुम्हाला दाखवणा आस त्याजमहीन कोणते कृत्याने मूळ तुम्हू मला दगड मार करत? 33 यहुद्यास त्याला उत्तर दिध्या, चांगले कृत्यासने साठी आम्हू तुम्हाला दगड मार करत नहा, तर दुर्भाषणने साठी;कारण तुम्हू मानव आसी स्वतः ला देव आखत. 34 येशून त्यासाला आखणा, तुन्हू देव आस असा मय आखणा हाय तुमने शास्राम लिहेल नहा काय? 35 ज्याला देवना वचन प्राप्त व्ह्यना त्यासाला जर त्यान्ह देवच आखणा, आन शास्रलेखना भंग व्ह्य नहा, 36 तर ज्याला पितान पवित्र कार्यास्तव नेमी जगम पाठवणा ते मला, मय देवना पुत्र आस असा आखलाने वरून तुम्हू दुर्भाषण करत असा तुम्हू आखत काय? 37 मय मान्हे पितान कृत्य करत नसल्यावर मजवर विश्वास ठेऊ नका; 38 परंतु जर मय ते कर तर मजवर विश्वास न ठुव्या तरी ते कृत्यासवर विश्वास ठुवा;अशाने साठी का, मजम पिता व पिताम मय आस हाय तुम्हू ओळखी समजी लेवा. 39 ते परत त्याला धरवानी जोवानी लागनतपरंतु तो त्यासने हाती न लागता निघी गया. 40 मग तो परत यार्देन ने पलिकड, योहान पहिलान बाप्तिस्मा करता ते ठिकाणी गया व तय रहीना. 41 तव्हा त्यास त्याव पुष्कळ लोक वन्हत;त्यास आख्या, योहान न काही चिन्ह करणा नहा खरा, तरी योहान न ह्यान्हे विषयी जा काही आखणा ता सगळा खरा आस. 42 तय पुष्कळ लोकास त्याजवर विश्वास ठुव्या.