1 आता मृरत्या च्या स्मोसर च्या वस्तूच्या विषयात आम्हाले मालूम हाय, कि आता आम्हाले सर्वव्याई ले मालूम हाय कि ज्ञान गर्व उत्पन्न करते, 2 जर ओक्नी समजीन कि मी काही ना काही मालूम आहे, त जस मालूम पाहिजे कि ते आतापर्यंत मालूम नाई, 3 जर कोणी देवावर प्रेम करतो त त्याले देव वळखतो, 4 व मूर्ती च्या समोरची बलीकेलेली वस्तू खायच्या विषयात आम्हाले मालूम आहे.कि मरती जगातली कोणती वस्तू नाई,अन् एकाले सोडून कोणी दुसरा देव नाही, 5 जर आभायात व पुर्थीवर लय देव हात,जस कि लय देव अन् प्रभू हात 6 तरी आपल्या जवळ एकच देव आहे,म्हणजेच-बाप ज्याच्या इकून सगळ्या वस्तू हात,अन् आम्ही त्याच्याच साठी अन् एकच प्रभू आहे, म्हजेच-येशू ख्रिस्त त्याच्या पासून सगळ्या वस्तू झाल्या,अन् आम्ही पण त्याच्या पासून , 7 पण सर्वायले हे ज्ञान नाही,प लय झन आतापर्यंत मुर्त्याइच्या समोरचं बली केलेल्या वस्तू समजून खाता, अन् त्याईचा विवेक कमजोर होऊन अशुद्ध झाले, 8 जेवण आपल्याले देवाचा जवळ नाई, घेऊन जात,जर आपण नाई खाल्ल त आमच काही नुकसान नाई,अन् जर खाल्ल त कोणता फायदा नाई, 9 पण तैय्यार राहा अस नाई, झाल पाहिजे कि तुमची हे आजादी कमजोराय साठी हानी कर्क नाई बनल पाहिजे, 10 काऊन कि जर कोणी तुम्ही ज्ञान्याले मूर्ती च्या मंदिरात जेवण करताना पायल त अन् तो कमजोर माणूस असला तर काय त्याच्या मनात मूर्तीच्या समोरची बली केलेली वस्तू चा खायची हिम्मत नाई होईन, 11 अश्या प्रकारे तुया ज्ञाना च्यान तो कमजोर भाऊ ज्याच्या साठी ख्रिस्त मेला तो नाश होऊन जाईन 12 आणि भावांच्या विरुद्ध पाप करून अन् त्याच्या कमजोर विवेकले धक्का देल्या पेक्षा तुम्ही ख्रिस्ताचा विरुद्ध पाप करता, 13 याच्या चान जर जेवण तुमच्या भावासाठी ठोकराच कारण बनीन त मी कधीच कोण्याच पधतीन मास नाई खाईन,अस नाई झाल पाहिजे कि मी आपल्या भाव साठी थोकरच कारण बनू,