1 हे भावनो मी तुम्हाले तोच समाचार देतो कि जे पहिले तुम्ही आयकले हा ज्याले तुम्ही अंगीकार पण केला,होता अन् ज्याच्यात तुम्ही थिर पण हा 2 त्याच्याच पशून तुमचा तारण पण होते,जर त्या सुवर्थेले कि जे म्या तुम्हाले सांगतली,आठोवन करतो नाई तन तुमचा विश्वास कर्ण व्यर्थ आहे, 3 याच्याचन म्या तुम्हाले सगळ्यात पहिले हे गोस्त सांगतली कि जे मले पोहचली होती कि पवित्र शास्र्ता च्या वचनाच्य अनुस्वार येशू ख्रिस्त आपल्या पापा साठी मेल्या गेला, 4 अन् रोय्ल्या गेला अन् पवित्र शास्त्राच्या अनुस्वार तिसऱ्या दिवशी जिवंत पण झाला, 5 अन् कईफा ले तवा बारा झनायले दिसला, 6 मंग पाचशे च्या अधिक भावायच्या संग दिसून आला, ज्याच्यातून ली झन वर्तमान हात व किती झोपून गेले, 7 मंग याकुब ले दिसला तवा सगळ्या प्रेषितांइले दिसला. 8 अन् सगळ्याइच्या बाद मले पण दिसला,जसा कि मी अधुर्या दिवसाचा जल्मला आहो, 9 कौन कि मी प्रेषितांन पेक्षा लहान आहो,पण पेरीत म्हण्याच्या योग्य नाई, कौन कि म्या देवाच्या मंडलीले सतावल, 10 पण मी जे काही आहे,देवाच्या द्याने आहो,अन् त्याची द्या माह्यावर आहे तो व्यर्थ नाई झाला,पण म्या त्या सगळ्या च्या परिश्रम पण केला,तरी पण हे माह्या इकून नाई झाल पण देवाच्या द्यान माह्या वर होता, 11 अन् ते मी अशो कि ते आम्ही तोच प्रचार करतो अन् याच्यावरच तुम्ही विश्वास पण केला. 12 व ज्वा कि ख्रिस्ताचा प्रचार केल्या जातो कि तो मेल्याल्यातून जिवंत झाला, त तुमच्यातून कितीकायन म्हटल कि कि मेलेल्या च पुंरुस्थान हाय कि नाई, 13 जर मेलेल्याचा पुनुरूस्थान नाई,त ख्रिस्त पण जिवंत नाई झाला, 14 अन् जर कोणी ख्रिस्त पण नाई,जिवंत उठलात आमच प्रचार कर्ण व्यर्थ आहे, अन् तुमचा विश्वास पण व्यर्थच आहे, 15 पण आम्ही देवाचे खोटे साक्षीदार झालो,काऊन कि आम्ही देवाच्या विषयात हे साक्षी डेली कि त्यां ख्रीस्तले जिवंत केलं,जर नाई जीत केल त त मेलेले नाई जिते झाले असते, 16 अन् जर मुर्दे जर जिवंत नाई झाले असते त ख्रिस्त पण जिवंत झाला असता, 17 अन् जर ख्रिस्त जर जिवंत नाई झाला,त आमचा विश्वास व्यर्थ आहे,अन् तुम्ही आता पर्यंत आपल्या पापात फसेल आहा, 18 पण जे ख्रीस्तात झोपले,ते पण नाश झाले, 19 जर आम्ही फक्त याच जीवनात ख्रीस्तात आशा ठुतो,त आपण सगळ्या माणसाउन अभागे आहो, 20 पण खर्च ख्रिस्त मेलेल्या तून जिवंत झाला, अन् जे झोपउन गेले त्याईच्या साठी फिल फल आहे, 21 अन ज्वा माणसाच्या दारे मरण आल व अन् मानसाच पासून मेलेल्याच पुंरुस्थान आल, 22 अन् जसे आद्मात सगळे मरतात,तसेच ख्रीस्तात सगळे जिवंत केल्या जातात, 23 पण हर एक आप आपल्या वाडीतून पहिलं फल अन् मंग ख्रिस्त आल्यावर त्याचे लोक, 24 त्याच्या बाद अंत होईन, त्या वक्ती सारी प्रदांत व सारा अधिकार व समर्थ च अंत करून राज्याले देवाच्या हाती सोपून देईन, 25 काऊन कि तवा पर्यंत कि तो आपल्या शतृले आपल्या पायाखाली नाई करीन तत पर्यंत त्याच राज्य कर्ण आवशकत आहे, 26 सगळ्यात आखरी शत्रूचा नाश होईन तेच मरण आहे, 27 काऊन कि देवान सगळ काही त्याच्या पाया पाशी केल आहे, पण जव अतो म्हणते कि सगळ काही करून अधिन केल आहे,त प्रतेक्ष आहे कि त्यान सगळ काही त्याच्या आदिन करून देल,तो स्वता अलग राहिला, 28 अन् ज्वा सगळ त्याच्या अधीन होऊन जाईल त पोरगा स्वताच त्याच्या आधी होऊन जाईन,जयान सगळ काही त्याच्या आधीन केल्या गेल,काऊन कि देवच सगळ काही आहे, 29 नाई तन लोक मेलेल्या साठी बाप्तिस्मा घेतात,त ते काय करतीन, ?अन् जर मुर्दे जिते झाले नसते ?त मंग कायले त्याच्या साठी बाप्तिस्मा घेतात 30 अन् आपण पण कायले त्रासात पडलो असतो? 31 हे भावनो मले त्या घमंडा त जे आमच्या ख्रिस्त येशुत मी तुमच्या विषयात म्हणतो,कि मी दररोज मरतो, 32 पण जर मी माणसाच्या रितीन इफिसुस सात वनातले पाखराय संग भांडलो त मले काय फायदा झाला ?अन् जर मुरडे जिते नाई झाले त या खाऊ पिऊ काऊन कि उद्या मरून जाऊ. 33 धोखा नोक खाऊ बेकार संगती चांगल्या चरित्राले खराब करते, 34 धर्म साठी जागी व्हा,अन् पाप नोका करू काऊन कि कितीक असे हात जे देवळे नाई वयखत मी तुम्हाले खाली पाया साठी नाई म्हणत. 35 अन् आता कोणी अस म्हणीन कि मुर्दे कसे जिवंत होतीन अन् कोण्या शरीरा संग येतात, 36 हे निरबुदी जे काही तू पेर्शीन ज्वा पर्यंत तो नाई मरीन तो जिता नाई केल्या जाईन. 37 अन् जे तू पेरत ते हे शरीर आहे,जे निर्माण करणारी आहे,नीरा दानाजो गवाचा ग्वाचाया दुसर्या दाण्याचा,असो, 38 पण देव आपल्या इच्छाच्या अनुस्वार त्याले शरीर देते,अन्न प्रत्येक बि ले त्याची वेगळ शरीर, 39 सगळे शरीर एका सारखे नाई, पण मानसाच शरीर देसर आहे,पाखरायच शरीर दुसर मासोयाच शरीर दुसर हाय, 40 स्वर्गीय शरीर आहे एक पार्थी शरीर आहे,पण स्वर्गीय शरीरच तेज अलग आहे व पार्थिवच दुसर आहे 41 सूर्याचा तेज दुसरा आहे व चंद्राचा तेज अलग हाय अन् ताऱ्यायच तेज अलग हाय, 42 हे भावनो मले त्या घमंडा त जे आमच्या ख्रिस्त येशुत मी तुमच्या विषयात म्हणतो,कि मी दररोज मरतो, मेलेल्याच जिवंत होण असच आहे,शरीर नाशमान वाक्ती पेरल्या जाते व व अविनाशी रुपात जिवंत उठते, 43 ते अनादरा सारख पेरल्या जाते अन् तेज्याच्यान जीवंत होते कमजोराय संग पेरल्या जाते व अन् सामर्थ्या संग जीत होते, 44 स्वभाविक शरीर प्रेरल्या जाते,अन् आत्मिक शरीर जिवंत होते,ज्वा कि स्वभाविक शरीर आहे, अन् आत्मिक शरीर पण आहे, 45 असच लीव्लेल आहे कि प्रथम माणूस म्हणजे आदम जीवंत प्राणी बनला,अन् आखरी आदम जीवन देणारा आत्मा बनला, 46 पण पयले आत्मिक नोता पण स्वभाविक होता,त्याच्या बाद आत्मिक झाला, 47 पहिला माणूस जमिनीउन म्हणजे मातीचा होता,दुसरा माणूस स्वर्गातला आहे, 48 जसा तो मातीचा होता तसेच अजून मातीचे होते,अन् जसा तो स्वर्गातला होता तसेच अगुण पण स्वर्गातले होते, 49 अन् जस आम्ही त्याचा स्वरूप जे मातीच धरण केल तसच त्या स्वर्गीय स्वरूप धारण करीन. 50 हे भावंनो मी हे म्हणतो कि मास अन् रक्त हे देवाच्या राज्याचे अधिकारी नाई,होऊ शकत अन् नाई विनाश अविनाशीचा अधिकारी होऊ शकत, 51 पहा मी तुम्हाले रह्श्याची गोस्त सांगतो कि आपण सगळे नाई झोपू पण सगळे बदलून जाऊ, 52 अन् या शणात पातळ हलत असताना मागची तुरी फुकल्या जाईन 53 काऊन कि तुरी फुकल्या जाईन अन् मेलेले अविनाशी दशेत उठवल्या जातीन अन् आपण बदलून जाऊ, काऊन कि आवश्य आहे कि नाश्मान शरीर अविनाशिले घालून घेईन,अन् हे मरण हार शरीर अम्र्तले घालून घेईन, 54 अन् जवा हे नाश्मान अविनाशिले घालून घीन अन् हे मरण हार अम्र्तले घालून घेईन,तवा ते वचन लिवल आहे पूर्ण होईन,कि जय न मरणाले गीऊन घेतल, 55 हे मरणा तुई जय कुठी आहे? 56 हे मरण तुया डंनक कुटीसा रायली,? मरणाचा डंक पाप आहे,अन् पापाची शक्ती व्यवस्था आहे, 57 पण देवच धन्यवाद असो,जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या दाव्रे आपल्याले जयवंत करते, 58 व हे माह्या आवडत्या भावानो मजबूत अन् अटल राहा,अन् देवाच्या कामात नेहमी वाढत जा काऊन कि हे मालूम आहे कि तुमचा परिश्रम पराभूत व्यर्थ नाई,